Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Advertising Guidelines : ग्राहकांची दिशाभूल थांबणार! डीपफेक अन् बनावट जाहिरातींवर आता ASCI ची करडी नजर; लागू होणार नवीन नियम

ASCI AI Advertising Guidelines : ASCI ने जाहिरातींमध्ये कृत्रिमरित्या तयार केलेल्या म्हणजेच AI Generated कंटेंटच्या पारदर्शक आणि जबाबदार वापरासाठी नवी मार्गदर्शकतत्त्वे जारी केली आहेत. ३ महिन्यांनंतर लागू होणाऱ्या या नियमांनुसार बनावट जाहिरातींवर पूर्ण बंदी असणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 29, 2026 | 04:14 PM
डीपफेक अन् बनावट जाहिरातींवर आता ASCI ची करडी नजर ( सौजन्य - सोशल मीडिया )

डीपफेक अन् बनावट जाहिरातींवर आता ASCI ची करडी नजर ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • ग्राहकांची दिशाभूल थांबणार!
  • डीपफेक अन् बनावट जाहिरातींवर आता ASCI ची करडी नजर
  • लागू होणार हे नवीन नियम
ASCI AI Advertising Guidelines : अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया ASCI ने आज जाहिरातींमधील सिंथेटिकली जनरेटेड कंटेंटच्या जबाबदार लेबलिंगसाठी मार्गदर्शकतत्त्वे जारी केली. जाहिरातदारांनी कृत्रिमरित्या तयार केलेल्या कंटेंटचा SGC वापर कधी उघड करणे आवश्यक आहे आणि कोणता कंटेंट वापरण्याला परवानगी नाही, याचे नियम यामध्ये निश्चित करण्यात आले आहेत. मे महिन्यात जारी करण्यात आलेल्या मसुद्यावर भागधारकांसोबत चर्चा करण्यात आली, ज्यानंतर अंतिम मार्गदर्शकतत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. ( ASCI AI Advertising Guidelines ) 

Railway New Rules : फक्त तिकीट किंवा पास असून चालणार नाही! 1 ऑक्टोबरपासून रेल्वे नियम कडक; सोबत ठेवा ‘हे’ कागदपत्रे

ब्रँड्स जाहिरातींची निर्मिती आणि सुधारणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा AI वापर करत आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे कंटेंटचा ग्राहकांवर होणाऱ्या परिणामांवर लक्ष केंद्रित करतात. अवास्तव अपेक्षा निर्माण करणे, दुर्बल घटकांचा गैरफायदा घेणे, असुरक्षित परिस्थिती दाखवणे, संमतीशिवाय एखाद्या व्यक्तीच्या रूपाचा वापर करणे किंवा खोटी व दिशाभूल करणारी माहिती देणे यांमुळे एसजीसी दिशाभूल करणारे किंवा हानीकारक ठरू शकते. SGC चा वापर करणाऱ्या सर्व जाहिरातींना एएससीआय कोडचे पालन करणे बंधनकारक आहे.

ही मार्गदर्शकतत्त्वे प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांनंतर लागू होतील. जाहिरातदारांना माहिती उघड करणे कधी आवश्यक आहे आणि एसजीसीचे कोणते वापर अमान्य आहेत हे समजण्यासाठी मार्गदर्शकतत्त्वांमध्ये चार प्रमुख विभाग स्पष्ट करण्यात आले आहेत:

१. प्रतिबंधित कंटेंट:

बेकायदेशीर असलेल्या, हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या, दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या किंवा एएससीआय कोडचे उल्लंघन करणाऱ्या जाहिरातींवर एआय लेबल वापरले असले तरीही बंदी कायम राहील. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

● बनावट शिफारशी किंवा प्रशंसापत्रे तयार करणे.
● सिंथेटिक सादरीकरणाद्वारे उत्पादनाचे निकाल किंवा वैशिष्ट्ये दिशाभूल करणाऱ्या पद्धतीने सांगणे.
● ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी अस्तित्वात नसलेली ठिकाणे किंवा पार्श्वभूमी खरी म्हणून दाखवणे.
● अनधिकृत कॉपीराइट सामग्रीचा वापर करणे.
● संमतीशिवाय डीपफेक किंवा एखाद्या व्यक्तीच्या फोटोचा वापर करणे.

२. अनिवार्य लेबलिंग आवश्यक:

SGC ग्राहकांच्या निर्णयांवर प्रभाव पाडते आणि खुलासा न केल्यास ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते, तिथे लेबल लावणे अनिवार्य आहे. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

● कृत्रिमरित्या तयार केलेल्या इन्फ्लुएन्सर्स आणि ब्रँड अॅम्बेसेडर्सचा वापर.
● वैयक्तिकृत संदेशासाठी संमतीने एखाद्या खऱ्या व्यक्तीचा चेहरा किंवा आवाजाची नक्कल करणे.
● जाहिरात केलेल्या उत्पादन किंवा सेवेविषयी ग्राहकांवर प्रभाव टाकू शकतील अशा बनावट घटना किंवा पार्श्वभूमी दाखवणे.
● सध्या अस्तित्वात नसलेल्या उत्पादनांचे प्रात्यक्षिक दाखवणे.
● एसजीसी-निर्मित साऊंड इफेक्टस, जे हेडफोन्ससारख्या उत्पादनाच्या मुख्य वैशिष्ट्यांशी अत्यंत संबंधित असतात.
● देय भरलेल्या किंवा प्रायोजित एआय-निर्मित उत्पादन सूचना, ज्यावर स्पष्टपणे “स्पॉन्सर्ड बाय (ब्रँड)” असे लेबल असणे आवश्यक आहे

३. लेबलिंगची आवश्यकता नसलेले कंटेंट:

SGCचा माहितीपूर्ण निर्णय घेण्याच्या ग्राहकाच्या क्षमतेवर कोणताही प्रभाव पडत नाही, तिथे खुलासा करण्याची आवश्यकता नाही. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

● नियमित एडिटिंग, जसे कलर करेक्शन, लाइट अॅडजस्टमेंट, आवाज कमी करणे आणि किरकोळ डाग काढणे.
● सजावटीचे किंवा सभोवतालचे पार्श्वभूमी घटक.
● स्पष्टपणे काल्पनिक असणारे इफेक्ट्स.
● प्रशासकीय आणि मजकूर-आधारित वापर, जसे जाहिरातीचा मसुदा तयार करणे.
● सुलभता वाढवणारे अॅप्लिकेशन्स, जसे उपशीर्षके, भाषांतर आणि अचूक ऑडिओ वर्णन.

४. डिस्क्लोजर लेबल्स आणि अंमलबजावणी:

माहिती उघड करणे आवश्यक आहे, तिथे ब्रँड्स “एआय वापरून ऑडिओ/व्हिडिओ तयार केला आहे” किंवा “एआय वापरून ऑडिओ/व्हिडिओमध्ये बदल केला आहे” यांसारखी जाहिरात प्लॅटफॉर्मने दिलेली लेबल्स वापरू शकतात. ब्रँड्स ग्राहकांना सिंथेटिक कंटेंटचे स्वरूप अचूकपणे समजेल अशी पर्यायी लेबल्स वापरू शकतात. हे खुलासे लागू असलेल्या ठिकाणी अस्वीकृतीवरील एएससीआय कोडच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असणे आवश्यक आहे.

ASCI च्या सेक्रेटरी जनरल आणि सीईओ मनिषा कपूर म्हणाल्या, “जाहिरातींमध्ये एआयचा वापर वेगाने वाढत आहे आणि ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून आमचा दृष्टिकोनही त्यानुसार बदलणे गरजेचे आहे. विशेषतः एआय लेबलशिवाय जाहिरातीबद्दल ग्राहकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे ही मार्गदर्शकतत्त्वे व्यावहारिक पारदर्शकतेची खात्री देतात. महत्त्वाचे म्हणजे, या मार्गदर्शकतत्त्वांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, केवळ एआय लेबल लावल्याने कोणतीही दिशाभूल करणारी जाहिरात स्वीकारार्ह ठरत नाही. संवाद प्रामाणिक, पारदर्शक आणि एएससीआय कोडशी सुसंगत असेल याची खात्री करण्याची जबाबदारी जाहिरातदारांची राहील.”

Advertisement Expenses : स्वतःच्याच प्रसिद्धीसाठी Government ने उधळले कोट्यवधी रुपये? RTI द्वारे खर्चाचा खुलासा

Web Title: Asci issues guidelines for synthetic and ai generated content in ads marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • ai
  • ASCI
  • new rules

संबंधित बातम्या

Railway New Rules : फक्त तिकीट किंवा पास असून चालणार नाही! 1 ऑक्टोबरपासून रेल्वे नियम कडक; सोबत ठेवा ‘हे’ कागदपत्रे
1

Railway New Rules : फक्त तिकीट किंवा पास असून चालणार नाही! 1 ऑक्टोबरपासून रेल्वे नियम कडक; सोबत ठेवा ‘हे’ कागदपत्रे

ChatGPT वापरत असाल तर लक्ष द्या! सुरक्षेवरून मोठा वाद, OpenAI विरोधात कोर्टात धाव
2

ChatGPT वापरत असाल तर लक्ष द्या! सुरक्षेवरून मोठा वाद, OpenAI विरोधात कोर्टात धाव

Rule Changes : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री? 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम! Bank, LPG, ट्रॅफिक चालानबाबत मोठा निर्णय
3

Rule Changes : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री? 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम! Bank, LPG, ट्रॅफिक चालानबाबत मोठा निर्णय

Bank FD Rules Change : 1 ऑक्टोबरपासून बँक FD चे बदलणार नियम! व्याजदरांवर काय होणार परिणाम?
4

Bank FD Rules Change : 1 ऑक्टोबरपासून बँक FD चे बदलणार नियम! व्याजदरांवर काय होणार परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.