Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today : शेअर बाजारात हाहाःकार! Kospi 8% नी कोसळला, Nikkei पण लुढकला; भारतीय शेअर बाजारात काय होणार?

Stock Market Today : जागतिक संकेतांमुळे आशियाई शेअर बाजारात आज प्रचंड घसरण झाली असून गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दक्षिण कोरियाचा Kospi निर्देशांक तब्बल ८ टक्क्यांनी तुटला आहे. तर जपानचा Nikkei देखील मोठा खाली घसरला आहे. या आंतरराष्ट्रीय हाहाकारामुळे भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचीही धडधड वाढली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 15, 2026 | 08:50 AM
भारतीय शेअर बाजारात काय होणार? ( सौजन्य - सोशल मीडिया )

भारतीय शेअर बाजारात काय होणार? ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • शेअर बाजारात हाहाःकार!
  • Kospi 8% नी कोसळला, Nikkei पण लुढकला
  • भारतीय शेअर बाजारात काय होणार?
Stock Market Today :  भारतच नाही तर संपूर्ण जगातील शेअर बाजार महागाईच्या आगीत होरपळत आहेत. अमेरिकेपासून जपानपर्यंत महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. गुरुवारी आशियाई शेअर बाजारांमध्ये मोठी विक्री झाली. दक्षिण कोरियाचा कोस्पी तब्बल 8 टक्क्यांनी घसरला, तर जपानच्या निक्केई 225 मध्ये 4 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. त्याच वेळी, अमेरिकेचा नॅसडॅकवरही परिणाम झाला. यासगळ्या परिस्थितीचा भारतीय देशांतर्गत शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स – निफ्टीवर काय परिणाम होणार? ( Stock Market Today ) 

Railway Bonus 2026: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ७८ दिवसांचा बोनस मंजूर; कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या…

अमेरिकेतील अपेक्षेपेक्षा जास्त महागाईचे आकडे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) शी संबंधित कंपन्यांमधील गुंतवणुकीबद्दल वाढत्या चिंतेमुळे जागतिक बाजारांचे वातावरण कमकुवत झाले. त्यामुळे अमेरिकन मार्केटला त्याचा फटका बसला आहे. आज आशियाई बाजारांमधील घसरण विशेषतः तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर कंपन्यांच्या शेअर्समध्ये थेट दिसून येणार आहे. जपान वगळता MSCI चा आशिया-पॅसिफिक बाजार निर्देशांक देखील सुमारे १.२% ने घसरला.

अमेरिकेतील गुंतवणूकदारांची चिंता वाढली

अमेरिकेतील वार्षिक ग्राहक महागाईचा दर ऑगस्टमधील ३.४% वरून सप्टेंबरमध्ये ३.७% पर्यंत वाढला. या महागाईच्या आकडेवारीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे की, अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदर कमी करण्याऐवजी ते आणखी वाढवू शकते.वाढलेल्या व्याजदरांच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदार अधिक जोखमीच्या मालमत्तांमधील आपली गुंतवणूक कमी करू शकतात. हा दबाव विशेषतः टेक्नोलॉजी कंपन्यांवर जाणवतो, ज्यांची भविष्यातील कमाई आणि विस्ताराच्या योजना मोठ्या भांडवली गुंतवणुकीवर अवलंबून असतात.

AI आणि चिप कंपन्यांच्या शेअर्सची विक्री

AI शी संबंधित कंपन्यांच्या शेअर्सच्या जागतिक बाजारपेठेत विक्रीचा दबाव आणखीनच वाढला आहे. कंपन्यांनी एआय पायाभूत सुविधा, डेटा सेंटर्स आणि चिप निर्मितीवर केलेल्या मोठ्या खर्चातून मिळणारा परतावा अपेक्षेनुसार असेल की नाही, याबद्दल गुंतवणूकदारांना चिंता वाटत आहे. अमेरिकन बाजारात तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर कंपन्यांचे शेअर्सही कमजोर राहिले. याचा परिणाम आशियाई बाजारांवर झाला, जिथे अनेक मोठ्या कंपन्या AI आणि चिप पुरवठा साखळीमध्ये गुंतलेल्या आहेत. बाजारात सेमीकंडक्टर कंपन्यांचा मोठा वाटा असल्यामुळे दक्षिण कोरियामध्ये ही घसरण अधिक तीव्र होती.

भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम होईल?

आशियाई बाजारांमधील कमजोरी आणि अमेरिकन बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे, भारतीय शेअर बाजाराची सुरुवातही सावध किंवा कमजोर राहण्याची शक्यता आहे. सकाळी ७:५० वाजता गिफ्ट निफ्टी केवळ १३ अंकांनी घसरून २२६०९ वर होता. परिणामी, देशांतर्गत बाजाराची सुरुवात थोडी कमजोर राहू शकते. पण गिफ्ट निफ्टीचे संकेत केवळ सुरुवातीचे कल दर्शवतात.

( Desclaimer : हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजार जोखमीच्या अधीन असतो. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या विवेकबुद्धीचा वापर करा किंवा आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. )

Mangal Prabhat Lodha: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी! रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी वनस्टेप फाउंडेशन आणि NSDC सोबत सामंजस्य करार

Web Title: Asian stock market crash kospi down 8 percent impact on sensex nifty marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 08:50 AM

Topics:  

  • BSE Sensex
  • Indian Stock Market
  • Nifty

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.