Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank of India: ग्राहकांसाठी बँकिंग होणार आणखी सोपे! UPI Tap & Pay ते AI पेमेंट्स; Bank of India कडून 12 डिजिटल उपक्रम

Bank of India: बँक ऑफ इंडियाने मुंबईत आयोजित Global FinTech Fest 2026 मध्ये पेमेंट्स, कार्ड्स, डिजिटल करन्सी, सेल्फ-सर्व्हिस बँकिंग, अनुपालन, ग्राहक सहभाग आणि फिनटेक सहकार्याशी संबंधित 12 डिजिटल उपक्रम सुरू केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 11, 2026 | 05:08 PM
ग्राहकांसाठी बँकिंग होणार आणखी सोपे! UPI Tap & Pay ते AI पेमेंट्स; Bank of India कडून 12 डिजिटल उपक्रम

ग्राहकांसाठी बँकिंग होणार आणखी सोपे! UPI Tap & Pay ते AI पेमेंट्स; Bank of India कडून 12 डिजिटल उपक्रम

Follow Us
Follow Us:
  • Bank of India ची डिजिटल भरारी!
  • Global FinTech Fest 2026 मध्ये 12 नव्या डिजिटल बँकिंग उपक्रमांचा शुभारंभ
  • बँकिंगमध्ये AI-CBDCचा नवा अध्याय!
Bank of India: बँक ऑफ इंडियाने Global FinTech Fest (GFF) 2026 मध्ये डिजिटल बँकिंगच्या क्षेत्रात मोठे पाऊल टाकत 12 डिजिटल उपक्रम सुरू केले आहेत. मुंबईत 9 ते 11 सप्टेंबरदरम्यान आयोजित या कार्यक्रमात पेमेंट्स, कार्ड्स, डिजिटल करन्सी, सेल्फ-सर्व्हिस बँकिंग, अनुपालन, ग्राहक सहभाग आणि फिनटेक सहकार्याशी संबंधित नव्या सुविधा सादर करण्यात आल्या. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रजनीश कर्नाटक यांच्या उपस्थितीत बँकेच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.

UPI व्यवहारांसाठी नव्या सुविधा

बँकेने डिजिटल पेमेंट्सच्या क्षेत्रात सहा महत्त्वपूर्ण उपक्रम सादर केले आहेत. यातील UPI Help 2.0 द्वारे ग्राहकांना UPI व्यवहारांचा इतिहास पाहणे, तक्रार नोंदवणे आणि तिचा मागोवा घेणे तसेच बँक ऑफ इंडियाच्या खात्यांशी संबंधित UPI मँडेट्सचे व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे. ही सुविधा Omni Neo मोबाइल अॅपमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. याशिवाय Transaction Replay सुविधेमुळे ग्राहक पूर्वी केलेला UPI व्यवहार पुन्हा सुरू करू शकतात. बँकेने UPI Tap & Pay on PoS सुविधाही सुरू केली आहे. NFC-सक्षम स्मार्टफोन समर्थित PoS मशीनवर टॅप करून कॉन्टॅक्टलेस UPI पेमेंट करता येणार आहे.

DILRMP 3.0: जमीनाचाही आता ‘Aadhaar Number’, सरकारच्या ‘या’ निर्णयावर प्लॉट खरेदीदार होणार खुश

AI एजंट करणार बिल पेमेंट?

बँकेने UPI आणि RuPay कार्डसाठी AI-सक्षम पेमेंट सोल्यूशन्सही सादर केली आहेत. ग्राहकाने आवश्यक पडताळणी आणि अधिकृतता दिल्यानंतर AI एजंट बिल भरणे, सबस्क्रिप्शनचे नूतनीकरण किंवा लहान खरेदी यांसारखी कामे स्वयंचलितपणे करू शकतो. ग्राहकांना या परवानग्या बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार असेल. कॉर्पोरेट ग्राहकांसाठी NPCIच्या सहकार्याने IMPS Bulk Payment सुविधाही सुरू करण्यात आली आहे. याद्वारे मोठ्या संख्येने पेमेंट रिक्वेस्ट एकाचवेळी पाठवता येणार आहेत.

Programmable CBDC चे वैशिष्ट्य काय?

डिजिटल करन्सीच्या क्षेत्रात बँक ऑफ इंडियाने User-level Programmable Central Bank Digital Currency (CBDC) सुविधा सुरू केली आहे. डिजिटल टोकन्सचा वापर कोणत्या कारणासाठी, कोणत्या भौगोलिक क्षेत्रात किंवा किती कालावधीपर्यंत करता येईल, अशा विशिष्ट अटी त्यामध्ये निश्चित करता येतात. या तंत्रज्ञानाचा लक्ष्यित अनुदान, मदत निधी, उद्देश-आधारित लाभ आणि Direct Benefit Transfer योजनांसाठी वापर होऊ शकतो. निधी ज्या कारणासाठी देण्यात आला आहे, त्याच कारणासाठी त्याचा वापर होत असल्याची खात्री करण्यास हे तंत्रज्ञान मदत करू शकते.

Terra Mastercard World Credit Card

GFF 2026 मध्ये बँकेने Terra Mastercard World Credit Card देखील सादर केले. हे कॉन्टॅक्टलेस इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड असून प्रवास, लाइफस्टाइल आणि जागतिक पेमेंट सुविधांवर भर देण्यात आला आहे. ATM, PoS आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हे कार्ड वापरता येणार आहे. कार्डधारकांना विमानतळ लाउंज प्रवेशासह प्रवास, मनोरंजन, डायनिंग, मोबिलिटी, वेलनेस आणि डिजिटल सबस्क्रिप्शनशी संबंधित विविध लाभ मिळतील. कार्डसाठी इश्यूअन्स शुल्क नाही; मुख्य कार्डाचे वार्षिक सदस्यत्व शुल्क ₹990 आणि अॅड-ऑन कार्डासाठी ₹750 असल्याचे बँकेने म्हटले आहे.

ATM मधून तत्काळ डेबिट कार्ड

Hitachiच्या सहकार्याने बँक ऑफ इंडियाने Android-based Cash Recycler Machineचा Proof of Concept सादर केला. पारंपरिक ATM सेवांबरोबर UPI आधारित कार्डलेस कॅश विथड्रॉवल, Green PIN निर्मिती आणि रिअल-टाइम डेबिट कार्ड जारी करण्यासारख्या सुविधा या मशीनमध्ये असतील. ग्राहक अर्ज आणि प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करून मशीनमधून वैयक्तिकृत फिजिकल डेबिट कार्ड तत्काळ मिळवू शकतील.

आवाजाद्वारेही करता येणार बँकिंग

बँकेने E-Kosha 2.0 हे ToneTag-सक्षम Conversational Banking सोल्यूशनही सादर केले. यामुळे ग्राहकांना आवाजाच्या माध्यमातून बँकेशी संवाद साधता येईल. भविष्यात खातेविषयक सेवा, पेमेंट्स, निधी हस्तांतरण, कर्ज, विमा, गुंतवणूक आणि ग्राहक सेवांपर्यंत या प्रणालीचा विस्तार होऊ शकतो. यासोबत ALPHA PLUS, FinTech Connect Portal आणि Markytics यांसारखे प्लॅटफॉर्मही बँकेने सादर केले आहेत. FinTech Connect Portal द्वारे फिनटेक कंपन्यांना कोणतेही शुल्क न देता बँकेसमोर प्रस्ताव सादर करता येणार आहेत. बँक ऑफ इंडियाच्या मते, या सर्व उपक्रमांमागे भविष्यासाठी सज्ज, सुरक्षित आणि सर्वसमावेशक बँकिंग परिसंस्था विकसित करण्याचा उद्देश आहे.

EPFO New PF Withdrawal Rules: PF मधून पैसे काढायचेत? आता नियम झाले सोपे; EPFO च्या नव्या नियमांमध्ये काय बदललं?

Web Title: Bank of india launches 12 digital banking initiatives at global fintech fest 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • Bank
  • Bank of India
  • UPI

संबंधित बातम्या

Bank Strike Today: बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! आज संप, शनिवार-रविवार सुट्टी; सलग 4 दिवस बँकिंग सेवांवर परिणाम?
1

Bank Strike Today: बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! आज संप, शनिवार-रविवार सुट्टी; सलग 4 दिवस बँकिंग सेवांवर परिणाम?

Bank of India Recruitment 2026: बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती! स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या २०५ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू!
2

Bank of India Recruitment 2026: बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती! स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या २०५ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू!

ग्राहकांनो लक्ष द्या! 11 September ला Bank ची कामे अडकणार, कर्मचारी Strike वर; ‘या’ बँका राहणार बंद
3

ग्राहकांनो लक्ष द्या! 11 September ला Bank ची कामे अडकणार, कर्मचारी Strike वर; ‘या’ बँका राहणार बंद

Bank of Baroda Recruitment 2026: सरकारी बँकिंग नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बडोदामार्फत १,१०० जागांसाठी भरती जाहीर
4

Bank of Baroda Recruitment 2026: सरकारी बँकिंग नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बडोदामार्फत १,१०० जागांसाठी भरती जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.