
Bank of India ची दमदार कामगिरी! तिसऱ्या तिमाहीत कामकाजाचा नफा १३ टक्क्यांनी वाढला (Photo Credit- X)
आर्थिक वर्ष २६ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी बँकेचा आरओए आणि आरओई अनुक्रमे ०.९६ टक्के आणि १५.३४ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. आर्थिक वर्ष २६ मधील नऊमाहीसाठी आरओए आणि आरओई अनुक्रमे ०.९० टक्के आणि १४.४९ टक्के होते.
आर्थिक वर्ष २६ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी बँकेचे जागतिक आणि देशांतर्गत निव्वळ व्याजदर मार्जिन (नीम) अनुक्रमे २.५७ टक्के आणि २.८० टक्के होते. आर्थिक वर्ष २६ च्या नऊमाहीसाठी जागतिक आणि देशांतर्गत निव्वळ व्याजदर मार्जिन अनुक्रमे २.५१ टक्के आणि २.७६ टक्के नोंदविले गेले.
बँकेच्या देशांतर्गत कर्जवाटपामध्ये वार्षिक १५.१६ टक्के तर जागतिक कर्जांमध्ये वार्षिक १३.६३ टक्के वाढ झाली. बँकेच्या जागतिक व्यवसायाने १६ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. रिटेल कर्जांमध्ये वार्षिक २०.६४ टक्के वाढ झाली आहे, तर कृषी कर्जांमध्ये वार्षिक १६.६९ टक्के, एमएसएमई कर्जांमध्ये वार्षिक १५.७७ टक्के आणि कॉर्पोरेट कर्जांमध्ये वार्षिक ११.३२ टक्के वाढ झाली आहे. कर्जांमध्ये रॅम टक्केवारी हिस्सा ५८.५४ टक्क्यांपर्यत वाढला. बँकेच्या ठेवींमध्ये वार्षिक ११.६४ टक्के वाढ झाली आणि देशांतर्गत कर्जांमध्ये वार्षिक १२.८० टक्के वाढ झाली. ३१ डिसेंबर २०२५ रोजी कासा ठेवीमध्ये वार्षिक ४.४८ टक्के वाढ झाली आणि कासा(CASA) प्रमाण ३७.९७ टक्के राहिले आहे.
आर्थिक वर्ष २६ च्या नऊमाहीसाठी निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) १८,४४२ कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २६ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी ६,४६१ कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष २६ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी व्याजेतर उत्पन्न गतवर्षाच्या तुलनेत (वाय-ओ-वाय) ३० टक्के वाढून २,२७९ कोटी रुपये झाले आणि आर्थिक वर्ष २६ च्या ९ महिन्यांत वार्षिक २० टक्क्यांनी वाढून ६,६६५ कोटी रुपयांवर झेपावले आहे.
२.२६ टक्क्यांवर असलेल्या ढोबळ एनपीए गुणोत्तरामध्ये गतवर्षाच्या तुलनेत १४३ बिदूंनी (बीपीएस) वाढ झाली. तर ०.६० टक्क्यांवर असलेल्या निव्वळ एनपीए गुणोत्तरामध्ये वार्षिक २५ बीपीएसने वाढ झाली आहे.
पीसीआरमध्ये वार्षिक ११२ बीपीएसने वाढ झाली आणि तो ९३.६० टक्क्यांवर आला आहे. आर्थिक वर्ष २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी थकीत कर्ज (स्लिपेज) गुणोत्तरामध्ये वार्षिक ३ बीपीएसने वाढ झाली आणि तो ०.१६ टक्के झाला. आर्थिक वर्ष २०२६ च्या ९ महिन्यांसाठी बुडीत कर्जाच्या तरतुदीमध्ये (क्रेडीट कॉस्ट) वार्षिक ३० बीपीएसने वाढ होऊन ती ०.४२ टक्के झाली आणि आर्थिक वर्ष २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी क्रेडिट कॉस्टमध्ये वार्षिक ५ बीपीएसने वाढ होऊन ती ०.३४ टक्के झाली आहे.
डिजिटल आणि पर्यायी चॅनेल माध्यमातून, आर्थिक वर्ष २६ च्या तिसऱ्या तिमाहीत सात लाखांहून अधिक नवीन ग्राहक जोडले गेले आहेत. त्यामुळे एकूण युपीआय ग्राहकांची संख्या २ कोटी ४२ लाखांहून अधिक झाली आहे. आर्थिक वर्ष २६ च्या तिसऱ्या तिमाहीत एकूण व्यवहारांमध्ये पर्यायी चॅनेलचा वाटा सुमारे ९६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
Today Gold-Silver Prices: विक्रमांनंतर सोने–चांदी घसरली; गुंतवणूकदारांनी केला नफा वसूल