Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Railway News: भारतीय रेल्वेसाठी ७६५ कोटींचा बूस्टर डोस; मुंबईसह अनेक विभागांचे होणार आधुनिकीकरण

केंद्र सरकारने भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी ७६५ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यात मुंबई आणि वडोदरा विभागातील ऑप्टिकल फायबर आणि कवच सुरक्षा प्रणालीचा समावेश आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 10, 2026 | 06:02 PM
भारतीय रेल्वेसाठी ७६५ कोटींचा बूस्टर डोस (Photo Credit- X)

भारतीय रेल्वेसाठी ७६५ कोटींचा बूस्टर डोस (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • भारतीय रेल्वेसाठी ७६५ कोटींचा बूस्टर डोस
  • मुंबईसह अनेक विभागांचे होणार आधुनिकीकरण
  • जाणून घ्या…
भारतीय रेल्वेची पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने ७६५ कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवला आहे. रेल्वेचे संचालन अधिक सुलभ करणे, मालवाहतुकीची क्षमता वाढवणे आणि रेल्वेच्या महत्त्वाच्या विभागांमध्ये आधुनिक दळणवळण यंत्रणा विकसित करणे, हा या प्रकल्पांचा मुख्य उद्देश आहे.

इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सिस्टीमचे होणार अपग्रेडेशन

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी अत्यंत व्यस्त असलेल्या दोन प्रमुख कॉरिडॉरवरील इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सिस्टीम अपग्रेड केली जाणार आहे. यात प्रामुख्याने ईस्ट कोस्ट रेल्वेच्या १०६ किमी लांबीच्या दुव्वाडा-विशाखापट्टणम-विजयनगरम सेक्शनचा समावेश आहे. या कामासाठी सरकारने ३१८.०७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या विभागातील सध्याची १x२५ केव्ही यंत्रणा बदलून तिथे आधुनिक २x२५ केव्ही सिस्टीम कार्यान्वित केली जाईल. यामुळे गाड्यांचा वेग वाढण्यास मदत होईल आणि रेल्वेचे संचालन अधिक विश्वासार्ह होईल. २०२४-२५ च्या रेल्वे बजेटमधील राष्ट्रीय कार्यक्रमाचा हा एक भाग आहे.

Indian Railways approves ₹765+ crore upgrades across key corridors ₹318 cr for Duvvada–Vizag–Vizianagaram freight corridor, ₹259 cr for Raichur–Guntakal traction upgrade, and ₹187 cr for 1,000 km optical fibre network on Western Railway. pic.twitter.com/QKLv9BtzP2 — The News Drill™ (@thenewsdrill) March 10, 2026

रेल्वेमध्ये ‘लोको पायलट’ बनायचंय? जाणून घ्या महिना किती कमावतात आणि कोणत्या मिळतात सुविधा ?

मुंबई-चेन्नई कॉरिडॉरचा वेग वाढणार

साउथ सेंट्रल रेल्वेच्या गुंटकल विभागांतर्गत येणाऱ्या रायचूर-गुंटकल या १२६ किमी लांबीच्या मार्गासाठी २५९.३९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा मार्ग मुंबई-चेन्नई कॉरिडॉरचा एक महत्त्वाचा भाग आहे. या मार्गाचे आधुनिकीकरण झाल्यामुळे मालगाड्यांची ये-जा सुलभ होईल आणि वंदे भारत एक्सप्रेससारख्या हायस्पीड गाड्यांच्या संचालनाला मोठी गती मिळेल.

मुंबई आणि वडोदरा विभागात ऑप्टिकल फायबरचे जाळे

पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) दळणवळण यंत्रणेला बळकटी देण्यासाठी सरकारने १८७.८८ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. याअंतर्गत वडोदरा आणि मुंबई सेंट्रल विभागांमध्ये सुमारे १,००० किलोमीटरहून अधिक अंतरावर ४x४८ कोअर ऑप्टिकल फायबर केबल (OFC) नेटवर्क उभारले जाणार आहे.

  • वडोदरा विभाग: ६९२ किमी
  • मुंबई विभाग: ३०८ किमी

‘कवच’ प्रणालीमुळे सुरक्षा होणार अभेद्य

या आधुनिक कम्युनिकेशन नेटवर्कचा सर्वात मोठा फायदा म्हणजे भारतीय बनावटीची ‘कवच’ ही रेल्वे सुरक्षा यंत्रणा लागू करणे सोपे होणार आहे. ‘कवच’ ही ट्रेनची टक्कर रोखणारी स्वदेशी प्रणाली असून, एलटीई (LTE) आधारित दळणवळणामुळे अपघात रोखण्यात आणि रेल्वे सुरक्षा अधिक भक्कम करण्यात मोठी मदत मिळणार आहे. या सर्व प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वे केवळ वेगवानच नाही, तर तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम होणार आहे, असा विश्वास रेल्वे मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

Pune-Nashik Railwayचा मार्ग बदलणार! GMRT ‘बफर झोन’मुळे केंद्र सरकारचा मूळ आराखड्याला नकार

Web Title: Indian railway infrastructure project 765 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • Business News
  • Central Governement
  • Indian Railway

संबंधित बातम्या

Gold-Silver Rate Today : सणासुदीत सोने झाले स्वस्त! पण चांदीचे भाव वाढले की कमी झाले? पाहा सोने-चांदीचे आजचे ताजे दर!
1

Gold-Silver Rate Today : सणासुदीत सोने झाले स्वस्त! पण चांदीचे भाव वाढले की कमी झाले? पाहा सोने-चांदीचे आजचे ताजे दर!

Bank of Baroda 400 Days FD: पैसे 400 दिवसांसाठी FDमध्ये ठेवले तर किती परतावा मिळेल? Bank of Baroda चे व्याज गणित पाहा
2

Bank of Baroda 400 Days FD: पैसे 400 दिवसांसाठी FDमध्ये ठेवले तर किती परतावा मिळेल? Bank of Baroda चे व्याज गणित पाहा

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?
3

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?

पशुपालनातून कमाईची मोठी संधी! ‘Mukhyamantri Gramin Pashudhan Udyojakta Yojana ’ नेमकी काय? अर्ज, कागदपत्रे आणि फायदे जाणून घ्या
4

पशुपालनातून कमाईची मोठी संधी! ‘Mukhyamantri Gramin Pashudhan Udyojakta Yojana ’ नेमकी काय? अर्ज, कागदपत्रे आणि फायदे जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.