Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank Strike Alert : बँकेची कामं अडकणार… कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत, कधीपर्यंत बंद राहणार सर्व्हिस?

Bank Strike Alert : बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे बँकिंग सेवा ठप्प होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे खात्यातून पैसे काढणे, चेक जमा करणे आणि एटीएम सेवेवर विपरीत परिणाम होऊन सामान्य ग्राहकांची कोंडी होऊ शकते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 24, 2026 | 01:14 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बँकेची कामं अडकणार…
  • कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत
  • कधीपर्यंत बंद राहणार सर्व्हिस?
Bank Strike Alert : आपल्या रोजच्या व्यवहारांचा भाग म्हणजे बँक. जरी आपण ऑनलाईन व्यवहार करत असलो तरीही बरीचशी कामं ही बँकेत गेल्याशिवाय पूर्ण होत नाही. पण आता ही काम जर तुम्ही केली नसतील तर त्याला आणखी विलंब लागण्याची शक्यता आहे. बँक कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांमुळे देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस बँकिंग सेवा ठप्प होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. नेमक्या काय आहेत मागण्या? कधीपर्यंत या अडचणींचा सामना करावा लागणार आहे? ( Bank Strike Alert ) 

Foreign Direct Investment : सरकारचा मास्टस्ट्रोक! भारतात 4895 कोटींची परदेशी गुंतवणूक; FDI नियमांमधील बदलामुळे फायदा?

बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संयुक्त संघटना असलेल्या UFBU ने ११ सप्टेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. या संपाचं मुख्य कारणांचा विचार केला तर आठवड्यातून पाच दिवस बँका उघडण्याच्या निर्णयाला होत असलेला सततचा विलंब, PLI बाबतचे तीव्र मतभेद आणि निवृत्तीवेतनाशी संबंधित अनेक प्रलंबित मागण्यांचा निकाल न लागणं या सगळ्या कारणांमुळे कर्मचारी नाराज आहेत त्यामुळे हा संप पुकारण्यात आला आहे. जर हा संप झाला तर देशभरातील अनेक भागातील बँकिंग सेवांवर याचा परिणाम होणार आहे.

विशेषतः सरकारी बँकांवर याचा परिणाम होणार आहे. वास्तविक 11 सप्टेंबर शुक्रवार आहे. त्यानंतर शनिवार-रविवारची सुट्टी असते. यासोबतच 14 सप्टेंबरला अनेक राज्यांमध्ये गणेश चतुर्थीच्या सुट्टीमुळे बँका बंद राहणार आहेत.

येत्या काळात मोठ्या संपाचा इशारा

UFBU ने पुढे स्पष्ट केलं की, सरकार आणि बँक व्यवस्थापनाने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर 28 सप्टेंबरपासून ते तीन दिवस सतत संपावर जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. महत्त्वाचं म्हणजे हा संप सहामाही आर्थिक हिशोबाच्या काळात होणार आहे. त्यामुळे बँकांच्या व्यवहारांवर आणि ग्राहकांच्या कामांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानंतरही त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 26 ऑक्टोबरपासून अनिश्चित काळासाठी संप सुरु करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कामगार संघटनेने या संपाबाबत स्पष्ट केलं की सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्यांबाबत ‘नकारात्मक भूमिका’ घेतल्यामुळे रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आठवड्यातून पाच दिवस बँका उघडण्याचा मुद्दा काय?

कामगार संघटनांनी हे स्पष्ट केलं की, इंडियन बँक्स असोसिएशनने ८ मार्च २०२४ रोजी १२ व्या द्विवार्षिक कराराचा भाग म्हणून आठवड्यातून पाच दिवस बँका उघडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. यात सोमवार ते शुक्रवार कामकाजाच्या तासांमध्ये ४० मिनिटांची वाढ करण्यात आली आहे. IBA ने हा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. पण २ वर्षांपेक्षा जास्त काळ झाला तरीही हा प्रस्ताव मंजुर होत नसल्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

PLI बाबत प्रमुख वाद काय?

PLI संदर्भात आणखी मोठा वाद निर्माण झाला आहे. सरकारने स्केल IV आणि त्यावरील बँक अधिकाऱ्यांसाठी एक स्वतंत्र PLI योजना तयार केली आहे, ज्याअंतर्गत त्यांना त्यांच्या वैयक्तिक कामगिरीच्या आधारावर ३६५ दिवसांच्या मूळ वेतनावर मोठं बक्षीस मिळू शकतं. पण सामान्य कर्मचारी आणि स्केल III पर्यंतच्या अधिकाऱ्यांना या योजनेचा पूर्ण भाग होता येणार नाही. या योजनेअंतर्गत त्यांना केवळ जास्तीत जास्त १५ दिवसांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता मिळणार आहे.

कामगार संघटनांचा आरोप आहे की हे IBA सोबत झालेल्या पूर्वीच्या कराराच्या पूर्णपणे विरोधात आहे, कारण त्या करारामध्ये असे ठरले होते की बक्षीस संपूर्ण बँकेच्या एकूण कामगिरीवर आधारित असणार आहे. ते स्केल VII पर्यंतच्या सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी एकसमान असेल. पण असं होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे.

Multibagger Stocks : बाजारातील पडझडीतही हे शेअर्स ठरले बाहुबली! दिला 65% पर्यंतचा बंपर रिटर्न; तुमच्याकडे आहेत का हे स्टॉक्स?

Web Title: Bank strike alert nationwide services may be affected check dates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • Bank
  • bank close
  • Employees Strike

संबंधित बातम्या

Bank FD Returns : छोट्या बँका की मोठ्या बँका? FD वर जास्त व्याज कोण देतं? जाणून घ्या कोणता पर्याय आहे बेस्ट?
1

Bank FD Returns : छोट्या बँका की मोठ्या बँका? FD वर जास्त व्याज कोण देतं? जाणून घ्या कोणता पर्याय आहे बेस्ट?

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धा, सोनाली – घुफ्रान सारस्वत चषकाचे मानकरी
2

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धा, सोनाली – घुफ्रान सारस्वत चषकाचे मानकरी

Urban Bank Recruitment 2026: जळगावमधील अमळनेर अर्बन बँकेत ‘या’ पदांची भरती जाहीर; १७ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज!
3

Urban Bank Recruitment 2026: जळगावमधील अमळनेर अर्बन बँकेत ‘या’ पदांची भरती जाहीर; १७ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज!

FD वर जास्त नफा हवा? SBI, HDFC नाही तर ‘या’ स्मॉल फायनान्स बँका देताहेत High Interest; 5 लाखांचे होतील तब्बल इतके
4

FD वर जास्त नफा हवा? SBI, HDFC नाही तर ‘या’ स्मॉल फायनान्स बँका देताहेत High Interest; 5 लाखांचे होतील तब्बल इतके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.