Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BGMI प्लेयर बनले गेम निर्माते! ‘World of Wonder’मध्ये महाराष्ट्र ठरले गेमिंगचे महत्त्वाचे केंद्र

BGMI World of Wonder : BGMI गेममध्ये एक नवा क्रांतीकारी बदल घडून आला आहे. खेळाडू आता केवळ गेम न खेळता 'वर्ल्ड ऑफ वंडर' या इन-गेम प्लॅटफॉर्मद्वारे स्वतःचे गेम नकाशे तयार करत आहेत. या नव्या प्रवाहात महाराष्ट्र हे गेमिंगचे प्रमुख केंद्र ठरला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 02, 2026 | 06:15 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • BGMI प्लेयर बनले गेम निर्माते!
  • ‘World of Wonder’मध्ये महाराष्ट्राता दणका
  • ठरले गेमिंगचे महत्त्वाचे केंद्र
BGMI World of Wonder : बीजीएमआयच्या प्रवासात एक नवा टप्पा पाहायला मिळत आहे. लाखो खेळाडू खेळत असलेल्या गेमपासून आता बीजीएमआय हे खेळाडूंना एकमेकांसाठी नवे गेमिंग अनुभव तयार करण्याचे व्यासपीठ बनत आहे. या बदलाच्या केंद्रस्थानी बीजीएमआयचे इन-गेम गेम निर्मिती व्यासपीठ असलेले ‘वर्ल्ड ऑफ वंडर’ आहे. या माध्यमातून देशभरातील खेळाडू स्वतःचे गेम तयार करत असून त्यांना ‘वॉव मॅप्स’ असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील निर्माते या क्षेत्रात आघाडीवर असून, त्यांच्या तयार केलेल्या वॉव मॅप्सवर देशभरातील खेळाडूंनी 7.5 कोटींहून अधिक सामने खेळले आहेत. ( BGMI World of Wonder )

Amazon मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! सणासुदीच्या काळात 160000 हून अधिक जागांची भर्ती, मिळणार विशेष लाभ

या प्रवाहातून भारतीय गेमर्स बीजीएमआयशी कशा प्रकारे जोडले जात आहेत, यामध्ये व्यापक बदल झाल्याचे दिसून येते. वाढत्या प्रमाणात खेळाडू केवळ लोकप्रिय बॅटल रॉयल नकाशांवर स्पर्धा करण्यापुरते मर्यादित न राहता, स्वतःचे गेम मोड तयार करणे, नवे गेमिंग अनुभव विकसित करणे आणि इतर खेळाडूंना पुन्हा पुन्हा खेळण्यासाठी आकर्षित करणारा आशय तयार करण्यासाठी वेळ देत आहेत.

स्वतःचे गेम नकाशे तयार करून प्रकाशित

‘वर्ल्ड ऑफ वंडर’च्या निर्मिती साधनांमुळे बीजीएमआयच्या पात्र खेळाडूंना कोडिंग किंवा व्यावसायिक गेम निर्मितीचा अनुभव नसतानाही स्वतःचे गेम नकाशे तयार करून प्रकाशित करता येतात. प्लॅटफॉर्म सुरू झाल्यापासून आतापर्यंत 50 हजारांहून अधिक नकाशे तयार करण्यात आले आहेत.

गेमिंग अनुभवांची वाढती लोकप्रियता स्पष्ट

तसेच 2.3 कोटींहून अधिक बीजीएमआय खेळाडूंनी ‘वर्ल्ड ऑफ वंडर’चा अनुभव घेतला आहे, तर दररोज जवळपास 10 लाख खेळाडू निर्मात्यांनी तयार केलेल्या आशयाचा वापर करतात. समुदायातील निर्मात्यांनी तयार केलेल्या अनेक नकाशांवर स्वतंत्रपणे कोट्यवधी वेळा खेळले गेले आहे. यावरून खेळाडूंनी तयार केलेल्या गेमिंग अनुभवांची वाढती लोकप्रियता स्पष्ट होते.

खेळाडूंच्या बदलत्या वर्तनाची झलक

महाराष्ट्रात खेळल्या जाणाऱ्या आशयातून खेळाडूंच्या बदलत्या वर्तनाची झलक पाहायला मिळते. बॅटल रॉयल ट्रेनिंग, पार्कर आणि टीम डेथ मॅच यांसारखे जलद आणि संघावर आधारित गेमिंग अनुभव खेळाडूंमध्ये लोकप्रिय आहेत. स्पर्धात्मक गेमिंगच्या पलीकडे जाऊन खेळाडू आता कथानकावर आधारित साहस, झॉम्बी सर्व्हायव्हल अनुभव आणि भारतीय पौराणिक कथांपासून प्रेरित गेमिंग अनुभव देखील मोठ्या प्रमाणात शोधत आहेत. यामुळे बीजीएमआयच्या निर्मात्यांच्या विश्वात निर्माण होत असलेली विविधता अधोरेखित होते.

गेम खेळण्यापलीकडे जाऊन निर्माते

क्राफ्टन इंडियाच्या मार्केटिंग आणि बीजीएमआय उत्पादन व्यवस्थापन विभागाचे संचालक श्रींजॉय दास म्हणाले, “वर्ल्ड ऑफ वंडर हे खेळाडू बीजीएमआयचा अनुभव कशा पद्धतीने घेतात, यातील महत्त्वपूर्ण बदल दर्शवते. आमच्या समुदायातील खेळाडू आता केवळ गेम खेळण्यापलीकडे जाऊन निर्माते बनत आहेत. ते असे गेमिंग अनुभव तयार करत आहेत, जे लाखो इतर खेळाडू शोधू शकतात आणि त्याचा आनंद घेऊ शकतात”.

महाराष्ट्र ठळक उदाहरण बाजारपेठांपैकी एक

“महाराष्ट्र हे या बदलाचे विशेषतः ठळक उदाहरण असलेले बाजारपेठांपैकी एक आहे. येथील निर्माते स्थानिक समुदायांना आवडणाऱ्या जलद, सामाजिक आणि वारंवार खेळता येणाऱ्या गेमिंग अनुभवांना प्रतिबिंबित करणारे नकाशे तयार करत आहेत. अधिकाधिक खेळाडू गेम निर्मितीचा प्रयोग करत असताना, वर्ल्ड ऑफ वंडरच्या माध्यमातून बीजीएमआय हे स्वतःच्या समुदायाच्या सहभागातून विकसित होणाऱ्या एका उत्साही व्यासपीठात रूपांतरित होत आहे.”

गेम डिझाइन करणाऱ्या निर्मात्यांना बक्षिसे

आज ‘वर्ल्ड ऑफ वंडर’वरील नकाशे समुदायातील निर्माते, गेमिंग आशय निर्माते आणि व्यावसायिक स्टुडिओ अश्या तीन वेगवेगळ्या गटांकडून तयार केले जातात. पीव्हीपीमध्ये गोल्ड व्ही रँक मिळवलेले खेळाडू इन-गेम अर्ज प्रक्रियेद्वारे निर्माते होण्यासाठी अर्ज करू शकतात. तसेच क्राफ्टन इंडिया नियमितपणे निर्मात्यांसाठी विविध आव्हाने आणि स्पर्धांचे आयोजन करते. या माध्यमातून नावीन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन दिले जाते आणि वैशिष्ट्यपूर्ण गेम डिझाइन करणाऱ्या निर्मात्यांना प्रोत्साहन व बक्षिसे दिली जातात.

आता AI बुक करणार तुमची तिकीटं आणि भरणार बिलं! UPI पेमेंट्सचे Rules होणार सोपे; जाणून घ्या नवीन फीचर्स

Web Title: Bgmi world of wonder maps transform players maharashtra emerges hub marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • Business News
  • Gaming Smartphone
  • maharashtra
  • online games

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: शिक्षणासाठी ९० हजार कोटींची तरतूद; शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावल्याचा फडणवीसांचा दावा
1

Devendra Fadnavis: शिक्षणासाठी ९० हजार कोटींची तरतूद; शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावल्याचा फडणवीसांचा दावा

Maharashtra Farmers: पाच हजारांच्या मदतीला कागदपत्रांचे ग्रहण! शेतकऱ्यांचा सरकारकडे मोठा आग्रह
2

Maharashtra Farmers: पाच हजारांच्या मदतीला कागदपत्रांचे ग्रहण! शेतकऱ्यांचा सरकारकडे मोठा आग्रह

Atal Pension Yojana: ४० वयानंतरही पेन्शन मिळवण्याची संधी! सरकारी योजनेत दरमहा भरा ‘इतके’ पैसे
3

Atal Pension Yojana: ४० वयानंतरही पेन्शन मिळवण्याची संधी! सरकारी योजनेत दरमहा भरा ‘इतके’ पैसे

District Bank Election 2026: जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! सात दिग्गजांचे अर्ज कायम राहणार की माघार? सीमोल्लंघनानंतर फैसला
4

District Bank Election 2026: जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! सात दिग्गजांचे अर्ज कायम राहणार की माघार? सीमोल्लंघनानंतर फैसला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.