Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

District Bank Election 2026: जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! सात दिग्गजांचे अर्ज कायम राहणार की माघार? सीमोल्लंघनानंतर फैसला

District Bank Election 2026: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सात दिग्गज उमेदवारांचे अर्ज कायम राहणार की ते माघार घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दसऱ्याच्या सीमोल्लंघनानंतरच उमेदवारीबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमध्ये सावंत, वीर आणि धुमाळ यांच्या उमेदवारीकडे विशेष लक्ष लागले

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 19, 2026 | 03:02 PM
जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! सात दिग्गजांचे अर्ज कायम राहणार की माघार? सीमोल्लंघनानंतर फैसला

जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! सात दिग्गजांचे अर्ज कायम राहणार की माघार? सीमोल्लंघनानंतर फैसला

Follow Us
Follow Us:
  • जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट!
  • सात दिग्गजांचे अर्ज राहणार की माघार?
  • निर्णय “सीमोल्लंघन”नंतरच
 

दत्तात्रय पवार, मेढा : महाबळेश्वर सोसायटी मतदार संघातील राजेंद्र राजपुरे व मजूर-विणकर मतदार संघातील उमेदवार अनिल देसाई या दोन दिग्गजांचे अर्ज रिझर्व बॅंकेच्या दहा वर्षांच्या संचालक कार्यकाळाच्या नियमांमुळे अवैध ठरल्याने जिल्हा बँकेतील इतर सात दिग्गजांचे आता अर्ज राहणार की माघार घेतली जाणार? याचा निर्णय सीमोल्लंघनानंतरच होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. मात्र या नियमामुळे सर्जेराव सावंत, सत्यजित वीर, काका धुमाळ यांना संचालकपदाची लॉटरी लागणार आहे.

सलग दहा वर्ष संचालक राहिलेल्यांना पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही या रिझर्व बँकेच्या अधिनियमाने सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांना मोठा फटका बसला आहे. अनिल देसाई, राजेंद्र राजपुरे या दिग्गजांचे अर्ज सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्याने उर्वरित सात दिग्गज उमेदवारांच्या उमेदवारीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र हा नियम लागू शकतो हे ओळखून आधीच अशा दिग्गज उमेदवारांनी पर्याय अर्ज भरले असल्याने नेमकी अर्ज माघारी घेण्याच्या २१ ऑक्टोबर दिवशीच हे चित्र स्पष्ट होईल. (District Bank Election 2026)

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये चारा टंचाईचे संकट? पशुपालकांनी आतापासूनच करा हे नियोजन, कृषी तज्ज्ञांनी दिला सल्ला

या उमेदवारी अर्ज कायम?

बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, विद्यमान बँक चेअरमन नितीन काका पाटील, माजी मंत्री रामराजे नाईक- निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, माजी आ. प्रभाकर घार्गे, प्रदीप विधाते, कांचन साळुंखे यांना देखील दहा वर्षे कार्यकाल झालेला आहे.त्यामुळे यातील काही जणांनी काळजी म्हणून आधीच पर्याय अर्ज भरलेले आहेत. त्यामुळे सातारा तालुक्यातून सर्जेराव सावंत, वाई तालुक्यातून मंत्री मकरंद पाटील तसेच सत्यजित वीर,फलटण मधून संजीवराजे नाईक-निंबाळकर तसेच गृहनिर्माण दूध संस्था मधून प्रतापगड प्राधिकरणाचे सदस्य काका धुमाळ यांचे उमेदवारी अर्ज कायम राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

नितीनकाका पाटील यांनी अर्ज माघार घेतलाच तर मंत्री मकरंद पाटील नेमके सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढतात की खरेदी विक्री संघातून लढतात हे चित्र देखील २१ ऑक्टोबरला स्पष्ट होईल. दहा वर्षांच्या नियमामुळे अनेक दिग्गजांनी आपल्या उमेदवारी सोबत पर्यायी अर्ज भरलेले आहेत. त्यामुळे दहा वर्षांचा मुद्दा निघाल्यास पर्याय उपलब्ध करून ठेवलेला आहे. त्यामुळे काहींना बिनविरोधची संधी तर काही नवीन चेहऱ्यांना बँकेचे संचालक होण्याचा मान मिळणार आहे.

सीमोल्लंघनानंतर अनेकांचे उठणार घट

अतिशय प्रतिष्ठेचे ही निवडणूक ठरली असून भाजप,सेना,राष्ट्रवादी यांची अधिकाधिक उमेदवार मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे.२१ ऑक्टोबर ही अर्ज माघारीची अंतिम तारीख असल्याने गेली दहा ते बारा दिवसांपासून उमेदवार निश्चिती बाबत अनेक बैठकातून चर्चा झडल्या. अशा परिस्थितीतच सर्वोच्च न्यायालयाने राजपुरे,देसाई यांचे अर्ज अवैध ठरवल्याने उर्वरित सात दिग्गज आता अर्ज माघार घेणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर त्यांच्या जागी नेमके कोण निवडणूक लढवणार याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. जिल्हास्तरावरील आरक्षित १० जागांवर कोणाला संधी मिळणार तर कोणाचे घट या सीमोल्लंघनात उठणार याचे अंतिम चित्र २१ ऑक्टोबरला समजणार असल्याने सर्वांचेच या दिवसाकडे लक्ष लागून राहिले आहे.

Mumbai: विद्याविहार उड्डाणपुलाच्या नामकरणावरून वाद पेटला; नाना पाटेकर की स्मित मच्छार? नावाच्या मागणीवरून संघर्ष

💡

Frequently Asked Questions

  • Que: जिल्हा बँक निवडणुकीत सात दिग्गजांच्या उमेदवारीचा निर्णय कधी होणार?

    Ans: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सात दिग्गज उमेदवारांचे अर्ज कायम राहणार की ते माघार घेणार, याबाबतचा निर्णय दसऱ्याच्या सीमोल्लंघनानंतर होण्याचे संकेत आहेत.

  • Que: जिल्हा बँक निवडणुकीत सावंत, वीर आणि धुमाळ यांची नावे चर्चेत का आहेत?

    Ans: सात दिग्गज उमेदवारांच्या माघारीच्या निर्णयामुळे निवडणुकीतील समीकरणे बदलू शकतात. त्यामुळे सावंत, वीर आणि धुमाळ यांना संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे.

  • Que: जिल्हा बँक निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेतल्यास काय परिणाम होऊ शकतो?

    Ans: उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणुकीतील उमेदवारांची संख्या कमी होऊ शकते. काही जागांवरील लढतीचे स्वरूप बदलू शकते किंवा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

Web Title: District bank election seven leaders nomination withdrawal decision after dussehra sawant veer dhumal sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • Bank
  • Bank Election
  • maharashtra

संबंधित बातम्या

MD Drugs Case: एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी पोलीस हवालदारालाच अटक! प्रकाश पवारसह दोघांना बेड्या; ९.२ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त
1

MD Drugs Case: एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी पोलीस हवालदारालाच अटक! प्रकाश पवारसह दोघांना बेड्या; ९.२ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त

Maharashtra Drought 2026: दुष्काळाची भीषण कुऱ्हाड! ‘आम्हाला सांभाळता येत नाही, तुम्हीच वाचवा’; अश्रू ढाळत शेतकरी सोडतायत गोवंश
2

Maharashtra Drought 2026: दुष्काळाची भीषण कुऱ्हाड! ‘आम्हाला सांभाळता येत नाही, तुम्हीच वाचवा’; अश्रू ढाळत शेतकरी सोडतायत गोवंश

गणेश भक्तांना लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला बेड्या; फरासखाना पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई
3

गणेश भक्तांना लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला बेड्या; फरासखाना पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई

Gondiya News: १०८ रुग्णवाहिकेचा ३ लाख रुग्णांना लाभ! रुग्णांना मिळाली तातडीची मदत, गोंदियात आपत्कालीन रुग्णवाहिकासेवेचा विस्तार
4

Gondiya News: १०८ रुग्णवाहिकेचा ३ लाख रुग्णांना लाभ! रुग्णांना मिळाली तातडीची मदत, गोंदियात आपत्कालीन रुग्णवाहिकासेवेचा विस्तार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.