रिफायनरी बांधण्यासाठी 1 लाख कोटींचा नॉन-बाइंडिंग सामंजस्य करार
हैदराबाद: हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या २८ व्या ऊर्जा तंत्रज्ञान परिषद २०२५ मध्ये, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीपीसीएल) ऑइल इंडिया लिमिटेड (ओआयएल ), नुमालीगढ रिफायनरी लिमिटेड (एनआरएल)आणि फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड (एफएसीटी) या तीन कंपन्यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रायलचे सचिव पंकज जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. ही बीपीसीएलच्याच्या रिफायनिंग, पेट्रोकेमिकल्स, ग्रीन एनर्जी आणि लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर मधील एकात्मिक वाढीच्या धोरणामध्ये महत्त्वपूर्ण टप्पे आहेत आणि भारतासाठी शाश्वत आणि स्वावलंबी ऊर्जा भविष्य निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करते.
बीपीसीएल आणि ओआयएलने आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील रामायपट्टणम बंदराजवळ बीपीसीएलच्या प्रस्तावित ग्रीनफिल्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स विकसित करण्यासाठी सहकार्य शोधण्यासाठी नॉन-बाइंडिंग पररस्पर सामंजस्य करावर स्वाक्षरी केली.प्रतिवर्ष ९ ते १२ दशलक्ष मेट्रिक टन (एनएमटीपीए ) शुद्धीकरण क्षमता आणि १ लाख कोटी रुपयांची (११ अब्ज डॉलर्स) अंदाजे गुंतवणूक असलेली प्रस्तावित सुविधा भारताच्या डाउनस्ट्रीम विस्ताराचा आधारस्तंभ ठरणार आहे.
या सामंजस्य करारांतर्गत, कंपन्या प्रस्तावित संयुक्त उपक्रमात ओआयएल अल्प इक्विटी हिस्स्सा घेण्याच्या शक्यतेसह या सहकार्याच्या संधींचे मूल्यांकन करतील. प्रकल्पाला आधीच महत्त्वाच्या वैधानिक परवानग्या आणि आंध्र प्रदेश सरकारकडून ६ हजार एकर जमीन मिळाली असून यामध्ये प्रकल्पापूर्वीची कामे प्रगतीपथावर आहेत.
याप्रसंगी सामंजस्य कराराच्या प्रसंगी बोलताना, बीपीसीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार असलेले संचालक (रिफायनरीज) संजय खन्ना म्हणाले, “दक्षिण भारतात जागतिक दर्जाचे रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या आमच्या प्रवासात हे सहकार्य महत्त्वपूर्ण असा मैलाचा दगड आहे. ओआयएल सोबत सहकार्य करून आम्ही धोरणात्मक प्रमाण आणि शाश्वत प्रकल्प उभारण्यासाठी पूरक शक्ती एकत्र आंत आहोत. रामायपट्टणम कॉम्प्लेक्स केवळ बीपीसीएलच्या पोर्टफोलिओला आकार देईल असे नाही तर आत्मनिर्भर भारतच्या दृष्टिकोनाच्या अनुषंगाने इंधन आणि पेट्रोकेमिकल्समध्ये भारताच्या आत्मनिर्भरतेला बळकट करेल.”
ऑइल इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष तसेच नुमालीगढ रिफायनरी लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. रणजीत रथ म्हणाले, “हे सहकार्य मिडस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीमसाठी विविध धोरणात्मक वैविध्यकरण उपक्रम राबविण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करते. बीपीसीएल सोबत भागीदारी करून ओआयएल आणि एनआरएल मूल्य निर्मिती खुली करण्यासाठी आणि देशाच्या ऊर्जा सुरक्षा आणि वितरण पायाभूत सुविधांमध्ये योगदान देण्यासाठी आमच्या सामूहिक सामर्थ्याचा लाभ घेण्यास उत्सुक आहेत. एकत्रितपणे, दीर्घकालीन मूल्य निर्माण करणे, ऊर्जा सुरक्षितता वाढवणे आणि भारताच्या विस्तारित रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल इकोसिस्टममध्ये सहभागी होण्याचे आमचे ध्येय आहे. हे सहकार्य शाश्वत राष्ट्रीय वाढीला समर्थन देणाऱ्या एकात्मिक ऊर्जा उपक्रमांमध्ये विविधता आणण्याच्या ओआयएलच्या धोरणात्मक हेतूला देखील मूर्त रूप देते”
रामायपट्टणम कॉम्प्लेक्समध्ये १.५ एमएमपीटीए इथिलीन क्रॅकर युनिट असून ३५ टक्के असा देशातील सर्वाधिक पेट्रोकेमिकल तीव्रतेसह दक्षिण भारतातील हे अशा प्रकारचे पहिले युनिट आहे . आंध्र प्रदेश सरकारचा भक्कम पाठिंबा असलेला हा प्रकल्प आर्थिक वर्ष २०३० पर्यंत व्यावसायिक ककजल सुरुवात करेल अशी अशा आहे. यामुळे औद्योगिक विकास, रोजगार निर्मिती आणि प्रादेशिक ऊर्जा सुरक्षा याला चालना मिळेल.
अनु एका दुसऱ्या महत्वाच्या घडामोडीमध्ये बीपीसीएल, ओआयएल आणि नुमालीगड रिफायनरी लिमिटेड (एनआरएल ) एनआरएलच्या ३ एमएमपीटीए वरून ९ एमएमएटीपीए उत्पादन विस्तारानंतर पेट्रोलियम उत्पादनांचे कार्यक्षमतेने निर्वासन सुलभ करण्यासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करार केला. या करारामध्ये सिलीगुडी ते मुघलसराय मार्गे मुझफ्फरपूर या ७०० किलोमीटरच्या क्रॉस-कंट्री उत्पादन पाइपलाइनच्या संयुक्त बांधकामाचा समावेश असून यामध्ये अंदाजे ३,५०० कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित आहे. मोटर स्पिरिट (एमएस), हाय-स्पीड डिझेल (एचएसडी) आणि एव्हिएशन टर्बाइन इंधन (एटीएफ) वाहतूक करण्यासाठी डिझाइन केलेली पाइपलाइन संयुक्तपणे बीपीसीएलच्या (५०) मालकीची असेल आणि उर्वरित ५० टक्के वाटा ओआयएल आणि एनआरएल यांचा असेल.
हरित ऊर्जा आणि कचरा-ते-ऊर्जा उपक्रमांना पुढे नेत, बीपीसीएलने फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड (एफएसीटी )सोबत बीपीसीएलच्या प्रस्तावित कोची रिफायनरीजवळ ब्रह्मपुरम येथील प्रकल्पात म्युनिसिपल प्लॅन सॉलिड कचऱ्यापासून तयार होणारे सेंद्रिय खत (एफओएम) आणि लिक्विड फर्मेंटेड ऑरगॅनिक खताचा (एलएफओएम) पुरवठा आणि व्यापारासाठी सामंजस्य करार केला. हा प्रकल्प दररोज १५० एमटी म्युनिसिपल कचऱ्यावर प्रक्रिया करून ५.६ एमटी सीबीजी बरोबरच २८एमटी एफओएम आणि १०० केएल एलएफओएमचे उत्पादन करेल. या सामंजस्य कराराची देवाणघेवाण मनोज मेनन, व्यवसाय प्रमुख (आय अँड सी) बीपीसीएल आणि एस शक्तीमणी, संचालक (वित्त),एफएसीटी,संजय खन्ना, संचालक (रिफायनरीज) अध्यक्ष आणि व्य्वस्थाकीय संचालक (अतिरिक्त प्रभार), बीपीसीएल आणि श्री पंकज जैन, सचिव, पेट्रोलियम मंत्रालय यांच्या उपस्थितीत करण्यात आली. उच्च दर्जाचे सेंद्रिय खते, भारताच्या कचऱ्यापासून ऊर्जा आणि हरित इंधनाच्या दृष्टीकोनात योगदान देत शाश्वत शेतीला आधार देतात.
हे सहकार्य ऊर्जा पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी, लॉजिस्टिक्स सुव्यवस्थित करण्यासाठी आणि पूर्व आणि उत्तर प्रदेशात विश्वसनीय इंधन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भारतातील आघाडीच्या ऊर्जा सार्वजनिक उपक्रमांच्या सामायिक वचनबद्धतेला अधोरेखित करते.एकत्रितपणे, हे तीन सामंजस्य करार BPCL च्या शुद्धीकरण क्षमतेचा विस्तार, पेट्रोकेमिकल एकीकरण, हरित ऊर्जा उपक्रमांना गती देण्यासाठी आणि मजबूत लॉजिस्टिक नेटवर्क तयार करण्यासाठी सर्वांगीण दृष्टीकोन अधोरेखित करतात.एकत्रितपणे, ते बीपीसीएलच्या राष्ट्रासाठी आत्मनिर्भरता, टिकाऊपणा आणि ऊर्जा सुरक्षा या आत्मनिर्भर भारताच्या केंद्र सरकारच्या दृष्टीकोनाशी प्रतिबिंबित करतात.
ऑइल इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष तसेच नुमालीगढ रिफायनरी लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. रणजीत रथ म्हणाले, “हे सहकार्य मिडस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीमसाठी विविध धोरणात्मक वैविध्यकरण उपक्रम राबविण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करते. बीपीसीएल सोबत भागीदारी करून ओआयएल आणि एनआरएल मूल्य निर्मिती खुली करण्यासाठी आणि देशाच्या ऊर्जा सुरक्षा आणि वितरण पायाभूत सुविधांमध्ये योगदान देण्यासाठी आमच्या सामूहिक सामर्थ्याचा लाभ घेण्यास उत्सुक आहेत. एकत्रितपणे, दीर्घकालीन मूल्य निर्माण करणे, ऊर्जा सुरक्षितता वाढवणे आणि भारताच्या विस्तारित रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल इकोसिस्टममध्ये सहभागी होण्याचे आमचे ध्येय आहे. हे सहकार्य शाश्वत राष्ट्रीय वाढीला समर्थन देणाऱ्या एकात्मिक ऊर्जा उपक्रमांमध्ये विविधता आणण्याच्या ओआयएलच्या धोरणात्मक हेतूला देखील मूर्त रूप देते”
रामायपट्टणम कॉम्प्लेक्समध्ये १.५ एमएमपीटीए इथिलीन क्रॅकर युनिट असून ३५ टक्के असा देशातील सर्वाधिक पेट्रोकेमिकल तीव्रतेसह दक्षिण भारतातील हे अशा प्रकारचे पहिले युनिट आहे . आंध्र प्रदेश सरकारचा भक्कम पाठिंबा असलेला हा प्रकल्प आर्थिक वर्ष २०३० पर्यंत व्यावसायिक ककजल सुरुवात करेल अशी अशा आहे. यामुळे औद्योगिक विकास, रोजगार निर्मिती आणि प्रादेशिक ऊर्जा सुरक्षा याला चालना मिळेल.
अनु एका दुसऱ्या महत्वाच्या घडामोडीमध्ये बीपीसीएल, ओआयएल आणि नुमालीगड रिफायनरी लिमिटेड (एनआरएल ) एनआरएलच्या ३ एमएमपीटीए वरून ९ एमएमएटीपीए उत्पादन विस्तारानंतर पेट्रोलियम उत्पादनांचे कार्यक्षमतेने निर्वासन सुलभ करण्यासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करार केला. या करारामध्ये सिलीगुडी ते मुघलसराय मार्गे मुझफ्फरपूर या ७०० किलोमीटरच्या क्रॉस-कंट्री उत्पादन पाइपलाइनच्या संयुक्त बांधकामाचा समावेश असून यामध्ये अंदाजे ३,५०० कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित आहे. मोटर स्पिरिट (एमएस), हाय-स्पीड डिझेल (एचएसडी) आणि एव्हिएशन टर्बाइन इंधन (एटीएफ) वाहतूक करण्यासाठी डिझाइन केलेली पाइपलाइन संयुक्तपणे बीपीसीएलच्या (५०) मालकीची असेल आणि उर्वरित ५० टक्के वाटा ओआयएल आणि एनआरएल यांचा असेल.
हरित ऊर्जा आणि कचरा-ते-ऊर्जा उपक्रमांना पुढे नेत, बीपीसीएलने फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड (एफएसीटी )सोबत बीपीसीएलच्या प्रस्तावित कोची रिफायनरीजवळ ब्रह्मपुरम येथील प्रकल्पात म्युनिसिपल प्लॅन सॉलिड कचऱ्यापासून तयार होणारे सेंद्रिय खत (एफओएम) आणि लिक्विड फर्मेंटेड ऑरगॅनिक खताचा (एलएफओएम) पुरवठा आणि व्यापारासाठी सामंजस्य करार केला. हा प्रकल्प दररोज १५० एमटी म्युनिसिपल कचऱ्यावर प्रक्रिया करून ५.६ एमटी सीबीजी बरोबरच २८ एमटी एफओएम आणि १०० केएल एलएफओएमचे उत्पादन करेल.