संग्रहित फोटो
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनमधील अधिकारी आणि कर्मचारी परिमंडळ सातच्या हद्दीत नियमित गस्त घालत होते. यावेळी वडगाव शेरी परिसरातील प्रथमेश जाधव याच्याकडे पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती पोलीस शिपाई गणेश खरात आणि अनिल कुसाळकर यांना मिळाली. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पथकाने तातडीने हालचाली सुरू केल्या.
पोलिसांनी जाधव याला पकडण्यासाठी परिसरात सापळा रचला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने घराशेजारील एका झुडपात पिशवी लपवून ठेवल्याचे समोर आले. पोलिसांनी त्या ठिकाणी तपासणी केली असता पिशवीमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस आढळून आले. पोलिसांनी दोन्ही वस्तू जप्त केल्या.
हे सुद्धा वाचा : घरातून बाहेर पडले अन् परतलेच नाहीत! कळंब तालुक्यात दोन तरुणांच्या अपहरणाने खळबळ
दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगल्याची कबुली
प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपीने परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तूल बाळगल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. आरोपीने हे पिस्तूल कोणाकडून मिळवले, त्याचा वापर यापूर्वी कोणत्या गुन्ह्यात केला आहे का आणि त्याच्यासोबत अन्य कोणी सहभागी आहे का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील पोलीस कर्मचारी गणेश खरात, अनिल कुसाळकर, घावटे आणि वाघमारे यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे वडगाव शेरी परिसरात बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Ans: प्रथमेश उर्फ दाद्या धनंजय जाधव (वय २६, रा. सोपाननगर, वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
Ans: पोलिसांनी आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले आहे.
Ans: पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनने वडगाव शेरी परिसरात सापळा रचून आरोपीला अटक केली.






