India आणि Russia एकत्र बनवणार 'सिव्हिल जेट SJ-100'; HAL आणि UAC मध्ये ऐतिहासिक करार (Photo Credit - X)
India Russia News: भारताची हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि रशियाची पब्लिक जॉइंट स्टॉक कंपनी युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (PJSC-UAC) यांनी ‘सिव्हिल कम्यूटर विमान’ SJ-100 च्या उत्पादनासाठी एक ऐतिहासिक सामंजस्य करार (MOU) केला आहे. हा महत्त्वपूर्ण करार २७ ऑक्टोबर २०२५ रोजी रशियातील मॉस्को येथे संपन्न झाला. HAL कडून प्रभात रंजन आणि PJSC-UAC कडून ओलेग बोगोमोलोव यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या. यावेळी HAL चे सीएमडी डॉ. डी. के. सुनील आणि PJSC-UAC चे डायरेक्टर जनरल वादिम बडेका हे देखील उपस्थित होते.
या भागीदारीनुसार, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला घरगुती ग्राहकांसाठी SJ-100 विमानाचे उत्पादन करण्याचा अधिकार मिळेल. दोन्ही संस्थांमधील हा करार दोन्ही देशांमधील सखोल विश्वासाचे आणि भारतीय विमान वाहतूक उद्योगासाठी एका मोठ्या यशाचे प्रतीक आहे.
HAL and UAC Sign MoU in Moscow for Production of SJ-100 Hindustan Aeronautics Limited (HAL) and Public Joint Stock Company United Aircraft Corporation (PJSC-UAC) Russia signed an MoU for production of civil commuter aircraft SJ-100 in Moscow, Russia on October 27, 2025. Shri… pic.twitter.com/2keV9C0rVE — Press Trust of India (@PTI_News) October 28, 2025
विमानतळ तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, पुढील दहा वर्षांत भारतीय एव्हिएशन सेक्टरला प्रादेशिक कनेक्टिव्हिटीसाठी या श्रेणीतील २०० हून अधिक जेट विमानांची गरज असेल, तसेच इंडियन ओशन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांसाठी सुमारे ३५० अतिरिक्त विमानांची आवश्यकता असेल.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (UAC) यांच्यातील हे सहकार्य भारतात संपूर्ण प्रवासी विमानाचे उत्पादन करण्याची पहिली संधी असेल. यापूर्वी HAL ने १९६१ मध्ये AVRO HS-748 चे उत्पादन सुरू केले होते, जे १९८८ मध्ये थांबले होते. SJ-100 विमानाचे उत्पादन भारतीय विमान वाहतूक उद्योगाच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडत आहे. हे पाऊल सिव्हिल एव्हिएशन सेक्टरमध्ये ‘आत्मनिर्भर भारत’चे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने महत्त्वाचे आहे. या उत्पादनामुळे खासगी क्षेत्राला बळकट करण्यासोबतच, एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
टाईडचा नवा उपक्रम! NCMC-सक्षम कार्डसह SME उद्योजकांचा दैनंदिन प्रवास आणि पेमेंट होणार सुलभ






