Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बजेट सादर झाले! अन् मुकेश अंबानींना बसला 9,206 कोटींचा फटका! वाचा नेमके कारण…

अर्थसंकल्पाच्या दिवशी रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी यांना फटका बसला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये घसरण झाल्याने अंबानी यांच्या नेटवर्थमध्ये तब्बल 1.1 अब्ज डॉलरची अर्थात 9,206 कोटींनी घसरण झाली आहे. याउलट गौतम अदानी यांच्या संपत्तीत 75.1 कोटी डॉलरने वाढ झाली आहे. अर्थसंकल्प सादर करतेवेळी अदानी समूहाच्या शेअरमध्ये ५ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 24, 2024 | 03:05 PM
बजेट सादर झाले! अन् मुकेश अंबानींना तब्बल 9,206 कोटींचा फटका! वाचा नेमके कारण...

बजेट सादर झाले! अन् मुकेश अंबानींना तब्बल 9,206 कोटींचा फटका! वाचा नेमके कारण...

Follow Us
Close
Follow Us:

मंगळवारी (ता.२४) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. सरकारकडून विविध क्षेत्रासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. अशातच तिकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करताना देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना मात्र तब्बल 9,206 कोटींचा फटका बसला आहे. आता तुम्ही विचारात पडला असाल असे नेमके काय झाले की अंबानी यांचे इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर रिलायन्सच्या शेअर घसरणीमुळे त्यांना फटका बसला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये घसरण

देशातील सर्वाधिक व्हॅल्युएबल कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये अर्थसंकल्पाच्या दिवशी मोठी घसरण नोंदवली गेली. कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाल्याने, चेअरमन मुकेश अंबानी यांच्या नेटवर्थमध्ये तब्बल 1.1 अब्ज डॉलरची अर्थात 9,206 कोटींनी घसरण झाली आहे. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सच्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांची संपत्ती आता 112 अब्ज डॉलरपर्यंत घसरली आहे.

हेही वाचा : ईशा अंबानींचे वडिलांच्या पाऊलावर पाऊल; देशातील 180 शहरांत उघडणार..!

अलीकडेच वाढली होती संपत्ती

दरम्यान, मुकेश अंबानी यांनी मागील आठवड्यात आपल्या धाकट्या मुलाचे लग्न मोठ्या थाटात केले होते. ज्यामध्ये झालेल्या खर्चाची खूप चर्चा देखील झाली होती. इतकेच नाही तर रिजार्चवाढीनंतर १० दिवसांत त्यांच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली होती. ज्यामुळे नुकतीच जागतिक श्रीमंतांच्या यादीत त्यांनी ११ व्या स्थानी झेप घेतली होती. मात्र, आता अर्थसंकल्प सादर होताच रिलायन्सच्या शेअरने गटांगळी खाल्ल्याने मुकेश अंबानी यांना 9,206 कोटींचा फटका बसला आहे.

अर्थसंकल्पाच्या दिवशी अदानींच्या संपत्तीत मोठी वाढ

याउलट देशातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्ये मोठी वाढ झाली आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत तब्बल 75.1 कोटी डॉलरने वाढ झाली आहे. अर्थसंकल्प सादर करतेवेळी इकडे अदानी समूहाच्या शेअरमध्ये ५ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. दरम्यान, गौतम अदानी हे 102 अब्ज डॉलरच्या वाढीसह जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत १४ व्या स्थानावर आहे.

Web Title: Budget 2024 mukesh ambani losses 9206 crores

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 03:00 PM

Topics:  

  • Budget
  • Budget 2024
  • Mukesh Ambani
  • Reliance Industries
  • Viksit Bharat
  • Viksit Bharat Budget 2024

संबंधित बातम्या

Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिकेत लोकशाहीचा गळा आवळला? अर्थसंकल्पीय महासभेत पत्रकारांना चित्रीकरणास बंदी; भाजपवर टीका
1

Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिकेत लोकशाहीचा गळा आवळला? अर्थसंकल्पीय महासभेत पत्रकारांना चित्रीकरणास बंदी; भाजपवर टीका

Raigad News : ग्रामीण विकासासाठी शैक्षणिक सुविधांवर भर, रायगड जिल्हा परिषद अर्थसंकल्पात 175 कोटींची तरतूद
2

Raigad News : ग्रामीण विकासासाठी शैक्षणिक सुविधांवर भर, रायगड जिल्हा परिषद अर्थसंकल्पात 175 कोटींची तरतूद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.