ईशा अंबानीने अमेरिकेतील आलिशान घर विकले; तब्बल इतके कोटी रुपये आहे किंमत?
रिलायन्स उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी उद्योग क्षेत्रात मोठे साम्राज्य उभे केले आहे. अनेक क्षेत्रात त्यांनी मक्तेदारी आहे. हायड्रोकार्बन शोध आणि उत्पादन, पेट्रोलियम शुद्धीकरण आणि विपणन, पेट्रोकेमिकल्स, रिटेल आणि दूरसंचार या क्षेत्रात रिलायन्सचे वर्चस्व आहे. आता मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत आपला उद्योग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
बी टू बी साठी मोठे पाऊल
रिलायन्स रिटेलने मेट्रो कॅश आणि कॅरी टेक ओव्हर केल्यानंतर ईशा अंबानी सातत्याने व्यवसाय वाढवत आहे. एप्रिल ते जून दरम्यान कंपनीने 30 नवीन स्टोअर सुरु केले आहे. मेट्रो मॉलमधून किरणा दुकानदार आणि इतर व्यावसायिकांनी सामान होलसेल पद्धतीने विकले जाते. त्यामुळे बिझनेस टू बिझनेस संकल्पनेच्या दृष्टीने ईशा अंबानी यांचे हे मोठे पाऊल मानले जात आहे.
(फोटो सौजन्य : instagram)
ईशा अंबानी यांनी बदलले मार्केट
रिलायन्स रिटेलने डिसेंबर 2022 मध्ये 2,850 कोटी रुपयांमध्ये मेट्रो कॅश आणि कॅरी मॉल घेतला होता. त्यावेळी मेट्रोची 21 शहरांमध्ये 31 मॉल होते. रिलायन्स रिटेलच्या नवीन रिपोर्टनुसार, कंपनी 180 शहरांत 200 पेक्षा जास्त मेट्रो कॅश आणि कॅरी स्टोअर्स झाले आहेत. ईशा अंबानी रिलायन्स रिटेल वेंचर्समध्ये कार्यकारी संचालक म्हणून लीड करत आहे.
मेट्रो काय आहे?
लहान दुकानदार आणि व्यावसायिकांसाठी मेट्रो हा चांगला पर्याय आहे. या ठिकाणी बी टू बी पद्धतीने ऑर्डर करता येते. रिलायन्सने मेट्रो विकत घेतल्यानंतर देशात 30 लाख बी टू बी ग्राहक होते. त्यातील 10 लाख ग्राहक अॅपच्या माध्यमातून दुकानांमधून सामना मागवत होते. भारतातील रिटेल बाजारात रिलायन्सची पकड मजबूत होत आहे. तसेच या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहे. ईशा अंबानी यांचे लग्न प्रसिद्ध उद्योजक घराण्यातील आनंद पीरामल यांच्यासोबत झाले आहे.