Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget 2026 Live: “गेल्या वर्षी भारताची आर्थिक स्थिती…”; बजेट मांडताना अर्थमंत्र्यांचे मोठे विधान

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यंदाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये चांगल्या निधीची घोषणा करण्यात आली आहे. विकसित भारताचा अर्थसंकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 01, 2026 | 12:00 PM
Union Budget 2026 Live Updates

Union Budget 2026 Live Updates

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या वर्षी भारताची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे भाष्य 
सरकारचे गुंतवणूक वाढवण्यावर जास्त लक्ष 
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडले बजेट

Nirmala Sitharaman: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यंदाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये चांगल्या निधीची घोषणा करण्यात आली आहे. विकसित भारताचा अर्थसंकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थनसंकल्प सादर करत असताना देशाच्या आर्थिक स्थिती विषयी महत्वाचे विधान केले आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, “मी आज माघ पौर्णिमा आणि गुरू रविदास यांच्या जयंतीच्या शुभ दिनानिमित्त अर्थसंकल्प सादर करत आहे. गेल्या वर्षभरात भारताची आर्थिक स्थिती चांगली आहे. गेल्या 12 वर्षांपासून आमचे सरकार गुंतवणूक वाढवण्यावर भर देत आहे. ”

पुढे बोलताना अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अनेक बदल करण्यात आले आहेत. स्वावलंबन हा आपल्या अर्थव्यवस्थेचा मुख्य मंत्र आहे. सरकारी निर्णयाचा नागरिकांना फायदा व्हावा यासाठी आम्ही सर्वोपरी प्रयत्न केले आहेत. गेल्या वर्षी देशाची अर्थव्यवस्था 7 टक्के विकास दराने वाढली आहे.”

Railway Budget 2026: सात रेल्वे स्पीड कॉरिडॉरची घोषणा, केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय काय मिळालं ?

सात रेल्वे स्पीड कॉरिडॉरची घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रेल्वेसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. २०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलिगुडीसह सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे.

हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर
मुंबई-पुणे
पुणे-हैदराबाद
हैदराबाद-बेंगळुरू
हैदराबाद-चेन्नई
चेन्नई-बेंगळुरू
दिल्ली-वाराणसी
वाराणसी-सिलिगुडी

२० नवीन जलमार्गांची घोषणा

पाच वर्षांत २० नवीन जलमार्ग कार्यान्वित होतील. वाराणसी आणि पटना येथे जहाज दुरुस्ती सुविधा स्थापन केल्या जातील. सीप्लेन व्हीजीएफ योजना सुरू केली जाईल.

Union Budget 2026: अर्थसंकल्पात सेमीकंडक्टरसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा, काय आहे सरकारची योजना?

रेल्वेसाठी २,५५,४४५ कोटी रुपयांची तरतूद

२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २,५५,४४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

कवच प्रणाली: मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी ‘कवच’ या स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणालीच्या विस्तारासाठी तरतूद वाढवण्यात आली आहे.

स्थानक पुनर्विकास: ‘अमृत भारत स्टेशन योजने’ अंतर्गत, आधुनिकीकरणासाठी १,३३७ स्थानके निवडण्यात आली आहेत, त्यापैकी १,१९७ स्थानकांवर काम सुरू झाले आहे.

वंदे भारत आणि बुलेट ट्रेन: नवीन वंदे भारत गाड्या सुरू करणे आणि बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी (NHSRCL) २१,००० कोटी रुपयांची गुंतवणूक सुरू राहील.

लॉजिस्टिक्स आणि मालवाहतूक वाहतूक: मालवाहतूक क्षमता वाढवण्यासाठी ऊर्जा कॉरिडॉर आणि जास्त वाहतूक असलेल्या भागात ट्रॅक दुहेरीकरण आणि विद्युतीकरणावर भर देण्यात आला आहे.

 

Web Title: Finance minister nirmala sitharaman statement about indian economical condition budget 2026 live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • budget 2026
  • India Economy
  • Nirmala Sitharaman
  • union budget 2026

संबंधित बातम्या

Budget 2026: देशात धावणार ७ नवीन बुलेट ट्रेन! मुंबई, पुण्यासह ‘या’ ८ शहरांचा कायापालट होणार; पाहा सरकारचा मेगा प्लॅन
1

Budget 2026: देशात धावणार ७ नवीन बुलेट ट्रेन! मुंबई, पुण्यासह ‘या’ ८ शहरांचा कायापालट होणार; पाहा सरकारचा मेगा प्लॅन

Union Budget 2026: अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे कंटेंट क्रिएटर्सचा होणार फायदा, AVGC सेक्टरमध्ये मिळणार लाखो नोकऱ्या
2

Union Budget 2026: अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे कंटेंट क्रिएटर्सचा होणार फायदा, AVGC सेक्टरमध्ये मिळणार लाखो नोकऱ्या

Budget 2026 : अर्थसंकल्पातून बळीराजाला काय मिळाले? ओतूर परिसरातील शेतकरी अन् व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया वाचा सविस्तर
3

Budget 2026 : अर्थसंकल्पातून बळीराजाला काय मिळाले? ओतूर परिसरातील शेतकरी अन् व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया वाचा सविस्तर

अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल ठरणार; ओबीसी नेते हेमंत पाटील यांचा विश्वास
4

अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल ठरणार; ओबीसी नेते हेमंत पाटील यांचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.