162 गावांना फटका, 1593 हेक्टर शेतीचे नुकसान
Budget 2025 News Marathi : अर्थमंत्री निर्मला सीतारमण या १ फेब्रुवारी २०२५ ला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात आयकर सवलतीसह अनेक नवीन घोषणा केल्या जाऊ शकतात. मोदी ३.० चा हा दुसरा पूर्ण अर्थसंकल्प असेल. मोदी ३.० चा पहिला अर्थसंकल्प गेल्या वर्षी २३ जुलै रोजी सादर करण्यात आला होता. यावेळी निर्मला सीतारामन यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प असेल. या अर्थसंकल्पात सरकार मुलांसाठी आणि महिलांसाठी काही विशेष घोषणा करू शकते. त्याचबरोबर, मोठ्या उद्योजकांपासून ते सामान्य लोकांपर्यंत, सर्वांना या अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत. आता सरकार या अर्थसंकल्पात काय खास सादर होणार हे पाहणे बाकी आहे.
यंदाचे Budget 2025 असेल मध्यमवर्गीयांसाठी खास, अर्थमंत्री करू शकतात ‘ही’ मोठी घोषणा
देशातील शेतकऱ्यांबद्दल बोलायचं झालं तर गेल्या अनेक वर्षांपासून सरकार देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत अशी अपेक्षा आहे की या अर्थसंकल्पातही सरकार शेतकऱ्यांसाठी काहीतरी खास सादर करणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.
या अर्थसंकल्पात सरकार किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवू शकते. सध्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाख रुपये आहे. या अर्थसंकल्पात सरकार ही रक्कम ५ लाख रुपयांपर्यंत वाढवू शकते. किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना १९९८ मध्ये सुरू झाली होती. या योजनेद्वारे सरकार शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज देते.
या अर्थसंकल्पात सरकार शेतीत वापरल्या जाणाऱ्या बियाणे आणि कीटकनाशकांवरील जीएसटीतून सवलत देऊ शकते. सरकार वेगवेगळ्या बियाण्यांवर वेगवेगळा जीएसटी लावते. या अर्थसंकल्पात सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जीएसटी कमी करू शकते अशी अपेक्षा आहे.
२०२५ च्या अर्थसंकल्पात, सरकार कृषी योजनांसाठीची तरतूद वाढवू शकते. गेल्या अर्थसंकल्पात सरकारने कृषी योजनांसाठी ६५,५२९ कोटी रुपयांची तरतूद केली होती.
तसेच देशाच्या एकूण GDP मध्ये अन्नदाता शेतकरी १५% हून अधिक योगदान देतात तर ४५% हून अधिक भारतीयांना याच क्षेत्रातून रोजगारही मिळतो. भारताच्या कृषी क्षेत्राने गेल्या पाच वर्षांत सरासरी वार्षिक ४.१८% विकास दर गाठला असून प्रथमदर्शनी ही आकडेवारी भारतीय शेतीसाठी चांगली दिसते. देशातील कष्टकरी शेतकऱ्यांचे योगदान लक्षात घेऊन यावेळचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांचे नशीब बदलणारा ठरू शकतो.