Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेरी उसळपासून पुरणपोळी टार्ट… Ganesh Chaturthi निमित्त Cafe Akasa तर्फे खास महाराष्ट्रीयन भोजनाची मेजवानी

Cafe Akasa Ganesh Chaturthi Special Meal : गणेशोत्सवाच्या आनंदी वातावरणात Akasa Air च्या 'कॅफे अकासा'ने प्रवाशांसाठी 'गणेश चतुर्थी स्पेशल मील' ची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यपरंपरेवर आधारित या विशेष मेनूमध्ये पुणेरी उसळ, फराळी पॅटिस आणि पुरणपोळी टार्ट यांसारख्या स्वादिष्ट पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 08, 2026 | 02:49 PM
Cafe Akasa Ganesh Chaturthi Special Meal :

Cafe Akasa Ganesh Chaturthi Special Meal :

Follow Us
Follow Us:
  • विमान प्रवासात मिळणार घरच्या जेवणाची चव!
  • कॅफे अकासाकडून सणासुदीच्या काळात स्पेशल मेनू
  • सप्टेंबर महिन्यात उपलब्ध
Cafe Akasa Ganesh Chaturthi Special Meal : अकासा एअरची विमानातील भोजन सेवा असलेल्या कॅफे अकासातर्फे गणेश चतुर्थीनिमित्त यंदा पाचव्या वर्षी ‘गणेश चतुर्थी स्पेशल मील’ सादर करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यपरंपरेपासून प्रेरणा घेत हे खास भोजन काळजीपूर्वक तयार करण्यात आले आहे. या विशेष मेनूमध्ये पुणेरी उसळीसोबत फराळी पॅटिस, पुरणपोळी टार्ट आणि प्रवाशांच्या पसंतीचे पेय यांचा समावेश आहे. ( Cafe Akasa Ganesh Chaturthi Special Meal )

Blinkit ला मागे टाकणार Flipkart Minutes? 10 मिनिटांत डिलिव्हरी रेससाठी आता मोठा गेमप्लॅन, काय आहे खास?

सप्टेंबर 2026 या संपूर्ण महिन्यात उपलब्ध असलेले हे विशेष भोजन अकासा एअरच्या वेबसाइटवर किंवा मोबाइल अॅपद्वारे आगाऊ बुक करता येणार आहे.

गणेश चतुर्थीच्या उत्सवातून प्रेरणा घेतलेले

महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण खाद्यपरंपरेतील चवींचा आधार घेत, गणेश चतुर्थीच्या उत्सवातून प्रेरणा घेतलेले पारंपरिक, परिचित आणि उत्सवी पदार्थ आता आकाशातील प्रवासातही चाखता येणार आहेत. खमंग आणि गोड पदार्थांचा सुरेख मिलाफ असलेले हे खास भोजन उत्सवाच्या काळातील आपुलकी, उबदारपणा आणि एकोप्याची भावना प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष स्वरूपात तयार करण्यात आले आहे.

कॅफे अकासा प्रवाशांचा विमानातील भोजनाचा अनुभव

वर्षभरात विविध सण-उत्सव आणि खास प्रसंगांच्या निमित्ताने मर्यादित कालावधीसाठी विशेष मेनू सादर करत, कॅफे अकासा प्रवाशांचा विमानातील भोजनाचा अनुभव अधिक समृद्ध करत आहे. हंगामानुसार बदलणाऱ्या ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन तयार करण्यात येणाऱ्या या खास मेनूमुळे, प्रत्येक विमान प्रवासात प्रवाशांना काहीतरी नवीन अनुभवण्याची उत्सुकता कायम राहते.

प्रादेशिक खाद्यपदार्थांचा समावेश

ऑगस्ट 2022 मध्ये विमानसेवा सुरू केल्यापासून अकासा एअर विविध सण-उत्सवांशी संबंधित प्रादेशिक खाद्यपदार्थांचा समावेश असलेले खास भोजन प्रवाशांना उपलब्ध करून देत आहे. मकरसंक्रांत, व्हॅलेंटाईन डे, होळी, ईद, ईस्टर, मदर्स डे, आंतरराष्ट्रीय योग दिन, नवरोज, ओणम, गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी, बालदिन आणि ख्रिसमस अशा विविध प्रसंगी कॅफे अकासाच्या माध्यमातून खास उत्सवी मेनू सादर केला जातो. याशिवाय, आकाशातील प्रवासात आपल्या प्रियजनांसोबत खास प्रसंग साजरा करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी कॅफे अकासाच्या नियमित मेनूमध्ये विविध केक आगाऊ निवडण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

मेनूमध्ये 45 हून अधिक खाद्यपदार्थांचे पर्याय

कॅफे अकासाच्या मेनूमध्ये वारंवार बदल करून विविध प्रकारचे दर्जेदार खाद्यपदार्थ, स्नॅक्स आणि ताजेतवाने पेये समाविष्ट केली जातात. प्रवाशांच्या विविध आहारविषयक गरजा आणि खाद्यपदार्थांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन हा मेनू विशेष पद्धतीने तयार करण्यात आला आहे.मेनूमध्ये 45 हून अधिक खाद्यपदार्थांचे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये फ्यूजन पदार्थ, प्रादेशिक चवीचा ट्विस्ट असलेले अॅपेटायझर्स आणि स्वादिष्ट डेझर्ट्सचा समावेश आहे. हे सर्व पदार्थ भारतातील नामांकित शेफनी विशेष स्वरूपात तयार केले आहेत.

भारतात AI चा तुफान वापर ! कंपन्यांचा मोठा विश्वास… 2027 पर्यंत IT बजेटचा 20% हिस्सा AI कडे जाणार; सर्व्हिसनाऊच्या अहवालात काय?

Web Title: Cafe akasa ganesh chaturthi special menu details booking process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Airline
  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganesh Chaturthi news

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2026: पहिल्यांदाच घरच्या घरी गणपती बसवणार? बाप्पांची कृपा हवी असेल तर ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवा
1

Ganesh Chaturthi 2026: पहिल्यांदाच घरच्या घरी गणपती बसवणार? बाप्पांची कृपा हवी असेल तर ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवा

Mumbai Goa Highway Traffic: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार असाल तर महत्त्वाची बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी
2

Mumbai Goa Highway Traffic: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार असाल तर महत्त्वाची बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पांनी मूषकालाच का बनवले आपले वाहन? जाणून घ्या पौराणिक कथा
3

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पांनी मूषकालाच का बनवले आपले वाहन? जाणून घ्या पौराणिक कथा

गणपती बाप्पा मोरया! पण प्रवासाचे काय? कोकणकरांच्या आर्थिक लुटीविरोधात रत्नागिरीत आवाज बुलंद
4

गणपती बाप्पा मोरया! पण प्रवासाचे काय? कोकणकरांच्या आर्थिक लुटीविरोधात रत्नागिरीत आवाज बुलंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.