Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी ‘लक्झरी’ झाली! चक्क Diwali Bonus म्हणून मिळाली आलिशान कार

दिवाळीत अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देत असतात. मात्र, एका फार्मा कंपनीने चक्क त्यांच्या काही खास कर्मचाऱ्यांना आलिशान कार भेट म्हणून दिली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 21, 2025 | 05:32 PM
'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी 'लक्झरी' झाली!

'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी 'लक्झरी' झाली!

Follow Us
Follow Us:
  • चंदीगड मधील फार्मा कंपनीचा अनोखा दिवाळी बोनस
  • काही खास कर्मचाऱ्यांना आलिशान कार केली गिफ्ट
  • कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. खासकरून कर्मचारी वर्गात तर या सणाची विशेष वाट पहिली जाते. याचे कारण म्हणजे दिवाळी बोनस. पूर्ण वर्षभर नित्यनियमाने काम केल्यानंतर दिवाळीत बोनस मिळण्याचे सुख काही औरच असते. बोनससोबतच गिफ्ट म्हणून काही जणांना सोनपापडी मिळते तर काही जणांना वेगवेगळ्या भेटवस्तू मिळतात. मात्र, काही कंपन्या अशा असतात ज्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना असे गिफ्ट देतात, जे ते कधीच विसरू शकणार नाहीत. असेच एक खास गिफ्ट चंदिगढच्या फार्मा कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

या फार्मा कंपनीच्या गिफ्टमुळे संपूर्ण इंटरनेट तिचीच चर्चा आहे. चंदीगडमधील एका कंपनीने दिवाळीनिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क 51 आलिशान कार भेट दिल्या. ही भेट औषध कंपनी एमआयटीएसने दिली. कंपनीचे संस्थापक एमके भाटिया हे स्वतः कारच्या चाव्या देताना दिसले आहे. असे माहिती आहे की त्यांनी 51 कर्मचाऱ्यांना कार भेट दिल्या आहेत, ज्यात एक महिंद्रा स्कॉर्पिओ-एन आणि इतर अनेक एसयूव्हीचा समावेश आहे.

पैसे तयार ठेवा! गेम चेंजर्स टेक्सफॅबचा IPO 28 ऑक्टोबरपासून सुरू होईल; किंमत पट्टा 96–102

सर्वोत्तम परफॉर्मन्ससाठी कार भेट

माध्यमांच्या वृत्तानुसार, कंपनीने त्यांच्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या कार भेट दिल्या आहेत. या दिवाळी भेटीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, कंपनीने असे करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील वर्षांत, त्यांनी दिवाळीत कर्मचाऱ्यांना विविध वाहने भेट दिली आहेत. आता कंपनीमध्ये ही एक परंपरा बनली आहे.

मुहूर्त ट्रेडिंग 2025 मध्ये एथर एनर्जीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ! स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांकावर, कारण जाणून घ्या

गरिबीपासून ते व्यावसायिक यशापर्यंत

कंपनीचे हे पाऊल विशेषतः खास मानले जाते कारण त्यांची स्वतःची कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे. संस्थापक एमके भाटिया यांनी २००२ मध्ये एका मेडिकल स्टोअरपासून सुरुवात केली होती, परंतु त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. मात्र, त्यांनी यातून शिकत पुन्हा एकदा कंपनी उभारण्याचा निर्णय घेतला आणि 2015 मध्ये एमआयटीएस ग्रुप सुरू केला. आज, त्यांच्याकडे भारत आणि परदेशात कार्यरत असलेल्या 12 कंपन्यांचे मालक आहेत.

Web Title: Chandigad pharma company gifted luxury cars to their employees as diwali bonus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 05:32 PM

Topics:  

  • Business News
  • Diwali 2025

संबंधित बातम्या

Success Story : शाळेत नापास, 30 इंटर्व्ह्यूमध्ये रिजेक्शन… तरीही बनला अब्जाधीश! Jack Ma कसे बनले अलिबाबाचे बॉस?
1

Success Story : शाळेत नापास, 30 इंटर्व्ह्यूमध्ये रिजेक्शन… तरीही बनला अब्जाधीश! Jack Ma कसे बनले अलिबाबाचे बॉस?

Global Fintech Fest 2026 : जमीन-मालमत्तेचे होणार ब्लॉकचेन टोकनायझेशन; महाराष्ट्र सरकार उचलणार मोठे पाऊल
2

Global Fintech Fest 2026 : जमीन-मालमत्तेचे होणार ब्लॉकचेन टोकनायझेशन; महाराष्ट्र सरकार उचलणार मोठे पाऊल

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण;  १,००० कोटींचा नवोपक्रम निधी
3

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण; १,००० कोटींचा नवोपक्रम निधी

बांधकाम आणि इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी मोठी बातमी! गंज लागण्याची चिंता मिटणार; AM/NS ने लाँच केला Pelican ब्रँड
4

बांधकाम आणि इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी मोठी बातमी! गंज लागण्याची चिंता मिटणार; AM/NS ने लाँच केला Pelican ब्रँड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.