Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG टंचाईचा घरगुती उद्योगांना ‘शॉक’! दादरमधील चपाती केंद्र संकटात; शेकडो महिलांवर बेरोजगारीची टांगती तलवार

आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा मुंबईतील महिला उद्योजिकांना मोठा फटका बसला आहे. दादरमधील प्रसिद्ध चपाती केंद्रांचे काम ठप्प झाले असून महिलांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 18, 2026 | 06:38 PM
LPG टंचाईचा घरगुती उद्योगांना 'शॉक'! दादरमधील चपाती केंद्र संकटात (Photo Credit- X)

LPG टंचाईचा घरगुती उद्योगांना 'शॉक'! दादरमधील चपाती केंद्र संकटात (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • LPG टंचाईचा घरगुती उद्योगांना ‘शॉक’!
  • दादरमधील चपाती केंद्र संकटात
  • शेकडो महिलांवर बेरोजगारीची टांगती तलवार
कौस्तुभ खातू । नवराष्ट्र मुंबई: आखाती देशातील युद्धाचे परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. कुठे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरसाठी लागलेल्या लांबच लांब रांगा तर, कुठे कर्मचाऱ्यांच्या कॅन्टीनमध्ये पदार्थांमध्ये झालेली कपात. हे चित्र संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे. मात्र, याचा फटका आता महिलांच्या रोजगारालाही बसण्यास सुरुवात झाली असून, घरातून चपात्या बनवून विकण्याच्या व्यवसाय करणाऱ्या अनेक महिलांचे काम आता ठप्प झाल्याने येथे मदतनीस म्हणून काम करणाऱ्या अनेक महिलांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.

22 वर्षांत पहिल्यांदाच व्यवसायाला ‘ब्रेक’

मागच्या 22 वर्षांपासून आम्ही हा चपात्यांचा व्यवसाय करतोय. इतक्या वर्षात एकादशी आमच्यावर काम बंद ठेवण्याची वेळ पहिल्यांदाच आली आहे. मागील एकही सिलेंडर मिळालेला नाही. सुमारे अडीच ते तीन हजार चपात्या आम्ही दररोज बनवितो. सोबतच सुमारे हजार भाकऱ्याही आम्ही रोज बनवतो. आता गॅसटंचाईमुळे हजार चपात्याही घरी बनत नाहीत. त्याचा फटका केवळ माझ्या व्यवसायावर नाही, मला मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलांच्या रोजगारावरही झाल्याची माहिती दादरच्या भोईवाडा येथे घरगुती चपात्यांचा व्यवसाय करणाऱ्या सीमा महिंद्रकर यांनी दिली.

मोठी बातमी! आता ‘या’ वाहनधारकांना भरावा लागणार दुप्पट कर! महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

या महत्वाच्या क्षेत्रांना बसतेय प्रचंड झळ

या कामातून मिळणाऱ्या पैशांतून महिलांच्या मुलांचे शिक्षण आणि इतर घरखर्च चालतो, परंतु या महिलांचा रोजगार ठप्प झाल्याने त्यांच्याही घरातील अडचणी वाढल्या आहेत. या महिलांनी बनविलेल्या चपात्यांचा पुरवठा नायर रुग्णालयाच्या कर्मचारी आणि विद्यार्थी उपाहार गृहात होतो. सोबतच नंतर दंत रुग्णालय आणि महाविद्यालयातही या महिलांच्या चपात्यांचा पुरवठा होतो. यांसह आजूबाजूच्या परिसरातील हॉटेल व्यावसायिकांनाही सीमा यांच्याच घरातून चपात्या पुरविल्या जातात. त्यामुळे सीमा यांचे काम बंद झाल्याचा परिणाम या सर्व क्षेत्रावर होणार आहे.

दादर येथील चपात्या व्यावसायिक, सीमा महिंद्रकर म्हणाल्या, याच व्यवसायावर आमचे घर आणि मुलाचे नोंदणीसाठी जातो तेव्हा 25दिवसाने सिलेंडर येईल आणि आम्हाला महिन्याला एकच सिलेंडर मिळणार असे सिलेंडर वितरण करणारे एजंट सांगत आहेत.

चिंता वाढली

सीमा यांना या व्यवसायात अन्य पाच महिला मदतनीस म्हणून सहाय्य करतात, या कामासाठी त्यांना दोन दिवसाला एक सिलेंडर लागतो. सिलिंडर मिळत नसल्याने या महिलांना ऑर्डर पूर्ण करता येत नाहीत. त्यामुळे त्यांचे व्यवहार ठप्प झाले आणि याचा परिणाम रोजगारावर झाला आहे. सीमा यांच्या कामात मदत केल्याने अन्य पाच महिलांनाही रोजगार मिळत होता. मात्र, स्वतःच्या हिमतीवर काम करणाऱ्या या पाच महिलांवर आता केवळ गृहिणी’ म्हणून काम करण्याची वेळ आली आहे.

गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सकडून ‘लार्ज कॅप क्वालिटी फंड’ लाँच; अवघ्या 10 रुपयांत गुंतवणुकीची सुरुवात

Web Title: Chapati centers in dadar face crisis hundreds of women face the looming threat of unemployment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • dadar
  • Mumbai

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
1

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
2

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
3

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना
4

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.