मोठी बातमी! आता ‘या’ वाहनधारकांना भरावा लागणार दुप्पट कर! महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर
या सुधारित कर रचनेमुळे राज्याला दरवर्षी सुमारे ₹१६० कोटींपेक्षा अधिक अतिरिक्त महसूल मिळणार असून हा निधी रस्ता सुरक्षा, आधुनिक परिवहन सुविधा, ATS प्रणाली आणि प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच, औद्योगिक क्षेत्राला दिलासा देत क्रेन वाहनांवरील मोटार वाहन करासाठी ₹३० लाखांची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
विधेयकामुळे नागरिकांना बीएस-६ आणि इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करण्यास प्रोत्साहन मिळणार असून राज्याच्या पर्यावरणीय धोरणाला बळकटी मिळेल. याशिवाय ग्रामीण आणि आदिवासी भागात दरवर्षी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, या विधेयकामुळे राज्याच्या एकत्रित निधीवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नसून उलट महसूल वाढीस मदत होणार आहे. सभागृहातील सर्व पक्षांच्या सदस्यांनी या विधेयकाचे स्वागत करत एकमताने मंजुरी दिली, त्यामुळे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
दरम्यान,महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) अधिनियम, २०२५ अंतर्गत कर दरांमध्ये सुधारणा केली. २०-३० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कार आणि सीएनजी वाहनांवरील करांमध्ये १% ते २% वाढ करण्यात आली आहे, जी १ जुलै २०२५ पासून लागू होईल. आता कर १० लाख रुपयांपर्यंत ११%, १०-२० लाख रुपयांसाठी १२% आणि २० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीसाठी १३% (डिझेलसाठी १५%) असेल.






