
Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
सायूबर क्राईम कमी करण्यासाठी चेकमध्ये सुरक्षा वाढवण्यावर भर दिला जात आहे. बनावट चेक तयार करणे, चेकची नक्कल करणे किंवा त्यातील माहिती बदलणे असे प्रकार रोखण्यासाठी नवीन सुरक्षा पद्धती वापरली जाणारा आहे .
नवीन चेकमध्ये फक्त नंबरऐवजी काही ठिकाणी अक्षरे आणि नंबरचा एकत्र वापर केला जाऊ शकतो. याशिवाय वॉटरमार्क, मायक्रो-प्रिंटिंग आणि UV प्रकाशात दिसणारी सुरक्षा चिन्हे यांसारख्या सुविधा असू शकतात. यामुळे चेक खरा आहे की बनावट, हे तपासणं बँकेसाठी सोपं होईल. चेकची डिजिटल पद्धतीने तपासणी आणि क्लिअरिंगही अधिक वेगाने होण्यास मदत होईल.
तुमच्याकडे जुने चेकबुक असेल तर ते लगेच फेकून देऊ नका. तसेच तुमच्या बँकेने नवीन चेकबुक घेण्याबाबत सूचना दिली आहे का, हे आधी तपासा. प्रत्येक बँकेचे नियम वेगळे असू शकतात. नवीन चेकबुकसाठी काही बँका शुल्क आकारू शकतात, तर काही खात्यांमध्ये ठराविक पाने मोफत दिली जातात. त्यामुळे शुल्काची माहिती आपल्या बँकेकडून घेणं योग्य ठरेल.
चेक लिहिताना नाव, तारीख आणि रक्कम व्यवस्थित तपासा. रिकामा चेक कोणालाही देऊ नका. चेक हरवल्यास तातडीने बँकेला माहिती द्या. त्यांची तक्रार नोंदवा. थोडक्यात, नवीन सुरक्षा असलेले चेक ग्राहकांना फसवणुकीपासून अधिक संरक्षण देण्यासाठी तयार केले जात आहेत. मात्र, तुमचं जुनं चेकबुक बदलणं आवश्यक आहे की नाही, यासाठी बँकेची अधिकृत माहितीच अंतिम मानावी लागणार आहे.
Sugar Price Hike: इथेनॉलमुळे वाढतेय साखरेची किंमत? सरकारने अखेर सांगितलं कारण, सामन्यांना माहीत हवेच