Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gaming News : १३ वर्षाची प्रतीक्षा संपली; GTA ६ अखेर गेमर्सच्या भेटीला जगातील सर्वात महागड्या गेमची चर्चा

Gaming News : १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 'GTA 6' गेम लॉन्च झाला आहे. न्यूझीलंडमध्ये पहिल्या खेळाडूंनी गेम खेळण्यास सुरुवात केली असून भारतात १९ नोव्हेंबरपासून तो उपलब्ध होणार आहे. प्रचंड बजेट आणि कमाईच्या अपेक्षांमुळे गेमिंग विश्वाचे लक्ष या लॉन्चकडे लागले आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 18, 2026 | 06:34 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • १३ वर्षानंतर GTA मालिकेचा नवा भाग
  • व्हाइस सिटीच्या नव्या जगात अनुभवता येणार थरार
  • जगातल्या सर्वात महाग गेम्सपैकी एक
Gaming News : तब्बल १३ वर्षाची प्रतीक्षा , दोन वेळा लांबलेली रिलीज तारीख आणि अनेक माहिती लीक झाल्यानंतर सुद्धा अखेर गेमिंग विश्वातील बहुप्रतीक्षित ग्रँड थेफ्ट ऑटो ६ ( GTA ) गेम खेळाडूंच्या भेटीला आला आहे . बुधवारी न्यूझीलंडमध्ये पहिल्या खेळाडूंना हा गेम खेळता येऊ लागला . भारतात १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पासून गेम उपलब्ध होणार आहे . रॉकस्टार गेम्सने विकसित केलेल्या या गेमकडे जगभरातील गेमर्सचे लक्ष लागले असून , आतापर्यंतच्या सर्वात महागड्या व्हिडीओ गेम्सपैकी एक म्हणून त्याची चर्चा सुरु आहे .

१३ वर्षानंतर GTA मालिकेचा नवा भाग

GTA ५ हा गेम २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता . त्यानंतर चाहत्यांना मालिकेच्या पुढील भागाची प्रतीक्षा होती . अखेर GTA ६ ची घोषणा झाल्यानंतर गेमर्समध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली . मात्र विकासातील अडचणीमुळे गेमची रिलीज तारीख दोन वेळा पुढे ढकलण्यात आली . त्यातच गेमशी संबंधित काही गोपनीय माहिती आणि व्हिडीओ ऑनलाईन लीक झाल्याने चर्चेला आणखी उधाण आले . आता अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा गेम लॉन्च होत आहे .

Google Drive ला टक्कर देणार! WhatsApp आणतंय भन्नाट फीचर, चॅट्सचा बॅकअप घेण्याची पद्धत बदलणार

व्हाइस सिटीच्या नव्या जगात अनुभवता येणार थरार

या नव्या गेमची कथा अमेरिकेतील फ्लोरीडापासून प्रेरीत असलेल्या लिओनिडा या काल्पनिक राज्यात घडते . त्यामध्ये व्हाईस सिटी हे प्रमुख ठिकाण आहे . लुसिया आणि जेसन या प्रमुख पात्रांभवती गेमची कथा फिरते . गुन्हेगारी विश्व , साहसी मोहीम , वाहन चालवणे आणि विस्तृत खुल्या जगाचा अनुभव अशा अनेक गोष्टींमुळे हा गेम खास ठरणार आहे . मागील काही भागांच्या तुलनेत अधिक वास्तववादी वातावरण आणि सुधारित ग्राफिक्सचा अनुभव खेळाडूंना मिळणार आहे .

दमदार कॅमेरा, पावरफुल बॅटरी अन् तगडा प्रोसेसर…. Xiaomi 18 Pro सिरीजच्या एंट्रीने सर्वांचीच उडाली झोप; डिझाईन आहे कमाल

जगातल्या सर्वात महाग गेम्सपैकी एक

GTA ६ हा आत्तापर्यंत विकसित झालेल्या सर्वात महागड्या व्हिडीओ गेम्सपैकी एक मानला जात आहे . त्याच्या निर्मितीवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे . गेमच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे लॉन्चपूर्वीच विक्री आणि कमाईबाबत मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत . यापूर्वी GTA ५ ने विक्रीचे अनेक विक्रम प्रस्थापित केले होते . त्यामुळे नव्या भागांकडूनही गेमिंग उद्योगाला मोठ्या अपेक्षा आहेत .

हा गेम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता गेमिंग बाजारपेठेतील कमाईचे नवे आणि मोठे विक्रम प्रस्थापित करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे . तसेच GTA ६ च्या निर्मितीवर तब्बल १ ते १.५ अब्ज डॉलर खर्च झाल्याचा दावा आणि अंदाज या उद्योगातील तज्ज्ञांचा आहे . भारतीय चलनात ही रक्कम सुमारे ८ हजार ते १२ हजार ५०० कोटी रुपयांच्या आसपास आहे . मात्र रॉकस्टार गेम्सने अद्याप अधिकृत बजेट जाहीर केलेले नाही . या प्रचंड खर्चामागे अनेक गेम डेव्हलपमेंट , हजारो काम , अत्याधुनिक ग्राफिक्स , गेममधील वास्तववादी आणि मोठ्या प्रमाणावरील तांत्रिक संशोधन आहे .

 

 

Web Title: Gaming news gta 6 finally launches after 13 year wait most expensive game cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 06:34 PM

Topics:  

  • Gaming
  • Marathi News
  • online games

संबंधित बातम्या

Akasa Air News : अकासा एअरची पंजाबमध्ये एंट्री; चंदीगडहून बेंगळुरू आणि गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरू होणार
1

Akasa Air News : अकासा एअरची पंजाबमध्ये एंट्री; चंदीगडहून बेंगळुरू आणि गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरू होणार

BIPF IDEATE 2026 : ग्रामीण जलसुरक्षेसाठी समुदायाच्या नेतृत्वावर भर; पाणी, हवामान आणि उपजीविकेच्या परस्परसंबंधांवर मंथन
2

BIPF IDEATE 2026 : ग्रामीण जलसुरक्षेसाठी समुदायाच्या नेतृत्वावर भर; पाणी, हवामान आणि उपजीविकेच्या परस्परसंबंधांवर मंथन

Tulsi Plant Care: तुळशीच्या रोपाला सुकण्यापासून कसे वाचवायचे? रोप अधिक वाढण्यास मदत करणारी ‘ही’ तीन गुपिते
3

Tulsi Plant Care: तुळशीच्या रोपाला सुकण्यापासून कसे वाचवायचे? रोप अधिक वाढण्यास मदत करणारी ‘ही’ तीन गुपिते

Nagpur News : दुर्बल घटकांच्या निधीवरून सभापती बॅकफूटवर; ५५ कोटींच्या प्रस्तावांना स्थगिती; सर्व पत्रे रद्द करण्याचे निर्देश
4

Nagpur News : दुर्बल घटकांच्या निधीवरून सभापती बॅकफूटवर; ५५ कोटींच्या प्रस्तावांना स्थगिती; सर्व पत्रे रद्द करण्याचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.