Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indapur News : तहसीलदारांच्या कारभाराविरोधात सर्वपक्षीय एल्गार; २५ नोव्हेंबरला इंदापुरात भव्य मोर्चा

Indapur News : इंदापूर तहसील कार्यालयातील कथित अनियमितता आणि नागरिकांची हेळसांड याविरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. तहसीलदारांच्या चौकशी व निलंबनाच्या मागणीसाठी २५ नोव्हेंबरला भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 18, 2026 | 07:03 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • सातबारा, फेरफार आणि दाखल्यांसाठी नागरिकांची फरफट
  • भाजप, काँग्रेससह विविध पक्षांची एकजूट
  • २५ नोव्हेंबरला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
Indapur News : इंदापूर तहसील कार्यालयातील कथित अनियमितता, भ्रष्टाचार आणि नागरिकांची होणारी हेळसांड याविरोधात तालुक्यातील सर्वपक्षीय नेते आणि सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. तहसीलदारांच्या कारभाराची सखोल चौकशी करून त्यांचे तातडीने निलंबन करावे, या मागणीसाठी २५ नोव्हेंबर रोजी इंदापूर येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

सातबारा, फेरफार आणि दाखल्यांसाठी नागरिकांची फरफट

तहसील कार्यालयात सातबारा, फेरफार, वारस नोंदी, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले आणि रेशनकार्डसारखी महत्त्वाची कामे प्रलंबित राहत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. या कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित सहकार्य मिळत नसून, कामांमध्ये टाळाटाळ केली जात असल्याचा दावाही करण्यात आला. या कथित अनियमिततेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

Bharat Taxi News: भारत टॅक्सी’च्या सारथी बनल्या ३०० महिला; पुण्यात सेवेला वाढता प्रतिसाद; चालकांची संख्या ६० हजारांवर

भाजप, काँग्रेससह विविध पक्षांची एकजूट

या आंदोलनात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना (शिंदे गट), रयत क्रांती सेना यांच्यासह विविध सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून जनतेच्या प्रश्नांसाठी एकत्र येण्याची भूमिका या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर यांनी समाजातील सर्व सज्जन शक्तींनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. हा कोणत्याही एका पक्षाचा प्रश्न नसून शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले.

Arrested ACB: लोकांचे रक्षण करणारा खाकीतला खाकीच विकला गेला! पीएसआय २० हजारांची लाच घेताना रंगेहात जेरबंद!

२५ नोव्हेंबरला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

भाजपचे प्रवीण माने यांनी तहसील कार्यालयाच्या कारभाराविरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्याची वेळ येणे ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त केले. नागरिकांची कामे वेळेत व्हावीत आणि प्रत्येकाला न्याय मिळावा, यासाठी हे आंदोलन उभारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेला प्रदीप गारटकर, प्रवीण माने, आकाश कांबळे, निवास शेळके, महारुद्र पाटील, राजेंद्र हजारे, नितीन शिंदे, महादेव सोमवंशी, निलेश देवकर, तानाजी धोत्रे, संतोष मोरे आणि शरद चितारे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

इंदापूर तहसील कार्यालयाच्या कारभारावर सर्वपक्षीय नाराजी

इंदापूर तहसील कार्यालयातील कथित अनियमितता, भ्रष्टाचाराचे आरोप आणि नागरिकांची होणारी गैरसोय यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. या प्रश्नावर वेगवेगळ्या राजकीय विचारांचे पक्ष एकाच व्यासपीठावर आले असून, २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मोर्चातून प्रशासनासमोर जनतेच्या समस्या मांडल्या जाणार आहेत. तहसीलदारांच्या कारभाराची सखोल चौकशी करून त्यांचे तातडीने निलंबन करावे, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे.

Web Title: Indapur news all party march against tehsildar november 25 cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • indapur news
  • Marathi News
  • Protest

संबंधित बातम्या

Gaming News : १३ वर्षाची प्रतीक्षा संपली; GTA ६ अखेर गेमर्सच्या भेटीला जगातील सर्वात महागड्या गेमची चर्चा
1

Gaming News : १३ वर्षाची प्रतीक्षा संपली; GTA ६ अखेर गेमर्सच्या भेटीला जगातील सर्वात महागड्या गेमची चर्चा

Akasa Air News : अकासा एअरची पंजाबमध्ये एंट्री; चंदीगडहून बेंगळुरू आणि गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरू होणार
2

Akasa Air News : अकासा एअरची पंजाबमध्ये एंट्री; चंदीगडहून बेंगळुरू आणि गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरू होणार

BIPF IDEATE 2026 : ग्रामीण जलसुरक्षेसाठी समुदायाच्या नेतृत्वावर भर; पाणी, हवामान आणि उपजीविकेच्या परस्परसंबंधांवर मंथन
3

BIPF IDEATE 2026 : ग्रामीण जलसुरक्षेसाठी समुदायाच्या नेतृत्वावर भर; पाणी, हवामान आणि उपजीविकेच्या परस्परसंबंधांवर मंथन

Tulsi Plant Care: तुळशीच्या रोपाला सुकण्यापासून कसे वाचवायचे? रोप अधिक वाढण्यास मदत करणारी ‘ही’ तीन गुपिते
4

Tulsi Plant Care: तुळशीच्या रोपाला सुकण्यापासून कसे वाचवायचे? रोप अधिक वाढण्यास मदत करणारी ‘ही’ तीन गुपिते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.