Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गिफ्टिंगमध्ये नवा ट्रेंड! CoverSure कडून विमा भेटीचा पर्याय; 12 महिन्यांत 1 दशलक्ष कुटुंबांचे लक्ष्य

CoverSure Insurance Gift Cards: कव्हरशुअरने विमा वितरणासाठी कॉर्पोरेट, सामाजिक आणि वैयक्तिक गिफ्टिंग क्षेत्रात प्रवेश करत इन्शुरन्स गिफ्ट कार्ड्सची नवीन श्रेणी लॉन्च केली आहे. CoverSure आणि RBI-परवानाधारक PPI इश्यूअर Oxymoney यांच्या को-ब्रँडेड या कार्ड्सद्वारे विमा सुरक्षा ही अर्थपूर्ण भेट म्हणून देण्याचा नवा पर्याय ग्राहकांना

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 20, 2026 | 06:13 PM
गिफ्टिंगमध्ये नवा ट्रेंड! CoverSure कडून विमा भेटीचा पर्याय; 12 महिन्यांत 1 दशलक्ष कुटुंबांचे लक्ष्य
Follow Us
Follow Us:
  • गिफ्टिंगमध्ये नवा ट्रेंड
  • CoverSure कडून विमा भेटीचा पर्याय
  • 12 महिन्यांत 1 दशलक्ष कुटुंबांचे लक्ष्य
मुंबई: कव्हरशुअर या ग्राहकांना प्राधान्य देणारा विमा प्लॅटफॉर्म आणि आयआरडीएआय परवानाधारक कॉर्पोरेट एजंटने आज विमा वितरणाचा नवीन मार्ग म्हणून कॉर्पोरेट, सामाजिक आणि वैयक्तिक भेटवस्तू (गिफ्टिंग) क्षेत्रात प्रवेश केला आहे. कंपनीने इन्शुरन्स गिफ्ट कार्ड्सची श्रेणी लाँच केली आहे, जी सुरक्षा ही एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला दिलेली सर्वात अर्थपूर्ण भेट असू शकते या विश्वासावर आधारित आहे. हे कार्ड्स आरबीआय परवानाधारक प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) इश्यूअर ऑक्सिमनीसोबत को-ब्रँडेड आहेत.

Sugar Prices Hike: साखरेच्या दराने गाठला नवा उच्चांक! सणासुदीत गोडवा महागणार?

भारतातील भेटवस्तू देण्याची परंपरा आता मिठाईचे पारंपारिक बॉक्स आणि सामान्य भेटवस्तूंच्या पुढे गेली असून अधिक वैयक्तिक आणि अर्थपूर्ण पर्यायांकडे वळली आहे. विमा मूलतः संरक्षण आणि दीर्घायुष्याचे आश्वासन देणारा पर्याय असल्याने या बदलामध्ये नैसर्गिकरित्या बसतो; पण तरीही सोने किंवा सणासुदीला दिल्या जाणाऱ्या रोकडीप्रमाणे कधीही भारताच्या भेटवस्तू परंपरेचा भाग बनला नव्हता. सोप्या शब्दांत सांगायचे तर, इन्शुरन्स गिफ्ट कार्ड हे स्टोअर्ड व्हॅल्यू कार्ड आहे, ज्याचा वापर प्राप्तकर्ता स्वतःच्या आयुष्यासाठी सर्वोत्तम असलेल्या विम्याचे संरक्षण घेण्यासाठी करू शकतो. याचे निर्णय आणि वेळेची निवड भेट देणाऱ्या ऐवजी प्रत्यक्ष संरक्षण मिळवणाऱ्या व्यक्तीद्वारे केली जाते.

कव्हरशुअरने पुढील १२ महिन्यांत १०० कोटी रुपयांच्या विमा भेटवस्तूंचे मूल्य गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे, ज्याद्वारे १ दशलक्ष कुटुंबांपर्यंत पोहोचण्याची आकांक्षा व्यक्त केली आहे. कंपनीचा भेटवस्तू देण्याच्या या पद्धतीला केवळ एकवेळची मोहीम न ठेवता विमा वितरणाचा वाढणारा आणि अतिरिक्त मार्ग म्हणून स्थापन करण्याचा प्रयत्न आहे. “विमा नेहमी विकला गेला आहे, कधीही भेट म्हणून दिला गेला नाही. आम्हाला हे चित्र बदलायचे होते,” असे कव्हरशुअरचे संस्थापक आणि सीईओ सौरभ विजयवर्गिया म्हणाले. “भारतात आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांचा आनंद साजरा करताना सोने, मिठाई, आशीर्वाद यांसारख्या काळजी व्यक्त करणाऱ्या प्रत्येक गोष्टीला स्थान आहे. सुरक्षेलाही तेच स्थान मिळायला पाहिजे. आम्ही शब्दांत व्यक्त न करता हेच शक्य करण्याचे काम आज करत आहोत.”

कोणाच्यातरी वतीने आधीच निवडलेली पॉलिसी खरेदी करण्याऐवजी भेट देणारी व्यक्ती स्टोअर्ड व्हॅल्यू प्रदान करते, ज्याचा वापर प्राप्तकर्ता विम्यासाठी करू शकतो. प्राप्तकर्त्याला विमा कंपनी, पॉलिसीचा प्रकार, संरक्षणाचे स्वरूप आणि वेळेची निवड करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. तसेच या रकमेचा वापर नवीन पॉलिसी घेण्यासाठी किंवा सध्याच्या पॉलिसीच्या नूतनीकरणासाठी (रिन्युअल) केला जाऊ शकतो. यामुळे विमा भेट देण्यातील शांत, पण सातत्यपूर्ण अडचण दूर होते, ती म्हणजे भेट देणाऱ्या व्यक्तीला प्राप्तकर्त्याच्या आधीच्या पॉलिसी, आर्थिक जबाबदाऱ्या, विम्याची गरज किंवा नूतनीकरणाच्या तारखांची माहिती नसणे. त्यामुळे विम्याचा निर्णय, जसा असायला पाहिजे तसा, प्रत्यक्ष संरक्षण मिळवणाऱ्या व्यक्तीकडे राहतो.

इन्शुरन्स गिफ्ट कार्ड वेगवेगळ्या प्रसंगांसाठी आणि भेटवस्तूंच्या गरजांसाठी चार स्वरूपांत उपलब्ध आहे. कॉर्पोरेट क्लोज्ड-लूप गिफ्ट हे एक सानुकूलित कार्ड आहे, जे बचत आणि वेलनेस फायद्यांसह विविध विमा उत्पादनांवर केवळ कव्हरशुअरवर वापरले जाऊ शकते. हे कर्मचाऱ्यांचे रिवॉर्ड्स, सणासुदीच्या भेटवस्तू, ग्राहक प्रतिबद्धता आणि पार्टनर प्रोग्राम्ससाठी डिझाइन करण्यात आले आहे. १,००० रुपयांपर्यंतचे ओपन-एंडेड गिफ्ट कार्ड प्राप्तकर्त्यांना कव्हरशुअरवरील पात्र विमा किंवा बिगर-विमा पर्यायांसाठी ही रक्कम टप्प्याटप्प्याने वापरण्याची सुविधा देते, ज्यामुळे ते वैयक्तिक भेटवस्तू आणि कर्मचाऱ्यांच्या कौतुकासाठी योग्य ठरते. १,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेचे ओपन-एंडेड गिफ्ट कार्ड अतिरिक्त कव्हरशुअर फायदे आणि विमा व्यवस्थापन व संरक्षण सेवा उपलब्ध करून देते, ज्यामुळे ते कौटुंबिक भेटवस्तू आणि विशेष प्रसंगांसाठी योग्य बनते. डीआयवाय इन्शुरन्स गिफ्ट कार्ड भेट देणाऱ्या व्यक्तीला टर्म, हेल्थ, मोटर, ट्रॅव्हल आणि पर्सनल अॅक्सिडेंट विम्यामधील पर्यायांसह विम्याचा प्रकार, प्रसंग आणि संदेश निवडण्याची सुविधा देते. हे चारही प्रकार प्राप्तकर्त्याच्या विम्याच्या गरजांना पाठिंबा देण्याचे वेगवेगळे मार्ग देतात आणि अंतिम निर्णय त्यांच्यावर सोपवतात.

देशातील नागरिक दीर्घकालीन आरोग्याकडे ज्या दृष्टीने पाहतात, त्यातील मोठ्या बदलाच्या काळात हे कार्ड्स लाँच करण्यात आले आहे. जगाची मधुमेहाची राजधानी मानल्या जाणाऱ्या आपल्या देशात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी (सीबीएसई) शाळांना “शुगर बोर्ड” उभारण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामुळे मुलांना रक्तातील अतिरिक्त साखरेच्या धोक्यांविषयी शिक्षित करता येईल आणि निरोगी पर्यायांना प्रोत्साहन देता येईल. कव्हरशुअर याकडे एक संकेत म्हणून पाहत आहे की, राष्ट्रीय आणि कौटुंबिक अशा दोन्ही स्तरांवर आरोग्य व सुरक्षेकडे केवळ गृहीत धरण्याऐवजी जाणीवपूर्वक जतन करण्याच्या गोष्टी म्हणून पाहिले जात आहे. कंपनी भेटवस्तू देण्याच्या या पद्धतीला याच विचारांचा आपसूक मार्ग मानत आहे.

भारताने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ४१.८४ कोटी विमा पॉलिसी जारी केल्या, पण तरीही जागतिक सरासरी ७.३ टक्क्यांच्या तुलनेत विम्याची व्याप्ती जीडीपीच्या केवळ ३.७ टक्के राहिली. हा फरक अधिक उपलब्धतेची गरज निदर्शनास आणण्यासोबत व्यक्तींनी त्यांच्या सुरक्षेच्या गरजांवर कृती करण्यासाठी आणखी कारणांची गरज असल्याचेही स्पष्ट करतो.

या फरकामधून स्पष्टपणे दिसून येते की, दोन्ही उद्योग वेगवेगळ्या वेगाने वाढत आहेत. भारतातील गिफ्टिंग उद्योग सध्या सुमारे ७५ अब्ज डॉलर्सचा आहे, जो वर्षाला साधारण १४ टक्के दराने वाढत आहे. याच्या अगदी उलट चित्र विमा क्षेत्राचे आहे, जिथे पॉलिसींच्या संख्येत नकारात्मक ते अत्यंत कमी एकेरी अंकाची वाढ दिसून येत आहे. कव्हरशुअरच्या मते, ही परिस्थिती तेव्हाच बदलू शकते, जेव्हा विमा क्षेत्र केवळ एक आर्थिक उत्पादन म्हणून स्वतंत्र न राहता आधीपासूनच समृद्ध असलेल्या मोठ्या परंपरांशी जोडले जाईल.

“आम्ही भेटवस्तू देण्याच्या पद्धतीकडे एक अतिरिक्त मार्ग म्हणून पाहत आहोत, ज्याद्वारे विम्याचे विद्यमान ग्राहक म्हणजेच विम्याचे ब्रँड अॅम्बेसेडर नवीन व्यक्तींना विम्याची ओळख करून देऊ शकतात. आम्ही याकडे केवळ एक सणासुदीचे उत्पादन म्हणून पाहत नाही,” विजयवर्गिया पुढे म्हणाले. “एखादी कंपनी, कुटुंबातील सदस्य किंवा मित्र सुरुवातीची रक्कम प्रदान करतो, पण ती रक्कम आरोग्य, जीवन किंवा मोटर विम्यासह कधी आणि कुठे वापरायची, याचा निर्णय प्राप्तकर्ता स्वतः घेतो. ही एक लहानशी भेट आहे, जी आयुष्यभराच्या सुरक्षेची सुरुवात करू शकते.”

हा उपक्रम कव्हरशुअरची इंडिया पोस्टसोबत चालवलेली आधीची जनजागृती मोहीम #ChitthiAayiHai चा भाग आहे. या मोहिमेअंतर्गत १५ शहरांमधील कुटुंबांना १०,००० हून अधिक बारकोड-सक्षम अंतर्देशीय पत्रे पाठवण्यात आली होती, ज्याद्वारे पॉलिसीधारकांना त्यांच्या विम्याची माहिती अशा व्यक्तींशी शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले होते, ज्यांना भविष्यात त्याची गरज भासू शकते. हे गिफ्ट कार्ड्स त्याच विश्वासाला पुढे नेतात, तो म्हणजे विम्याचा प्रसार जाहिरातींमधून नाही, तर दृश्य स्वरूपात व्यक्त केलेल्या काळजीमधून होतो.

कव्हरशुअरला अपेक्षा आहे की, कॉर्पोरेट क्षेत्र या उपक्रमाचे मुख्य केंद्र असेल. कंपन्या हे कार्ड्स कर्मचाऱ्यांचे रिवॉर्ड्स आणि सन्मान उपक्रमांमध्ये समाविष्ट करू शकतात किंवा ग्राहक आणि चॅनेल भागीदारांपर्यंत पोहोचवू शकतात, ज्यामुळे अशा कुटुंबांपर्यंत पोहोचता येईल, जे अनेकदा गृहीत धरल्यापेक्षा अधिक आर्थिकदृष्ट्या असुरक्षित असतात. वैयक्तिक भेटवस्तूंचा विचार करता हे कार्ड्स सण, वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस आणि इतर महत्त्वाच्या प्रसंगांसाठी योग्य आहेत. हा उपक्रम कव्हरशुअरच्या क्लेम-फर्स्ट आणि कस्टमर-फर्स्ट मॉडेलअंतर्गत येतो, जिथे क्लेमचा अनुभव अटी-शर्तीमध्ये अडकवून ठेवण्याऐवजी सोपा आणि पारदर्शक ठेवण्यात आला आहे.

Jawa Yezdi Roadster Red Wolf ची ऑनलाइन एन्ट्री; Amazon-Flipkart वर विक्री सुरू

Web Title: Coversure insurance gift cards gifting india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Business News
  • Insurance

संबंधित बातम्या

Jawa Yezdi Roadster Red Wolf ची ऑनलाइन एन्ट्री; Amazon-Flipkart वर विक्री सुरू
1

Jawa Yezdi Roadster Red Wolf ची ऑनलाइन एन्ट्री; Amazon-Flipkart वर विक्री सुरू

‘देश का नमक’ मागचा चेहरा कोण? टाटांच्या १४ कंपन्यांची धुरा सांभाळणाऱ्या ‘या’ व्यक्तीची कहाणी थक्क करणारी
2

‘देश का नमक’ मागचा चेहरा कोण? टाटांच्या १४ कंपन्यांची धुरा सांभाळणाऱ्या ‘या’ व्यक्तीची कहाणी थक्क करणारी

3.3 कोटींची नोकरी सोडून घेतला मोठा निर्णय! Googleचा माजी कर्मचारी आता नेमकं काय करतोय?
3

3.3 कोटींची नोकरी सोडून घेतला मोठा निर्णय! Googleचा माजी कर्मचारी आता नेमकं काय करतोय?

US Debt Crisis: अमेरिकेचे कर्ज 40 ट्रिलियन डॉलर्स पार, प्रत्येक माणसाच्या डोक्यावर किती ओझं?
4

US Debt Crisis: अमेरिकेचे कर्ज 40 ट्रिलियन डॉलर्स पार, प्रत्येक माणसाच्या डोक्यावर किती ओझं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.