(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
१ एप्रिल २०२६ पासून क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी सर्वात मोठा बदल हा असेल, जो या रकमेपेक्षा जास्त खर्च करणाऱ्यांसाठी असणार आहे. कारण मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर कठोरपणे नजर ठेवली जाणार आहे. या प्रस्तावानुसार, जर तुमचे क्रेडिट कार्ड पेमेंट एका आर्थिक वर्षात ₹१० लाख किंवा त्याहून अधिक खर्च करतंय, तर तुमची बँक आयकर विभागाला कळवू शकते. ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असलेल्या परदेशी खर्चावरही नजर ठेवली जाऊ शकते. जर तुमचा खर्च तुमच्या कर विवरणपत्रात दर्शविलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला स्पष्टीकरण मागवणारी नोटीस मिळू शकते.
क्रेडिट कार्डशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे १ एप्रिलपासून क्रेडिट कार्डसाठी पॅन नंबर अनिवार्य असणार आहे. १ एप्रिल २०२६ पासून, बँका पॅन क्रमांकाशिवाय क्रेडिट कार्ड जारी करणार नाहीत. सध्याच्या कार्डेना पॅनकार्ड क्रमांक जोडणे आवश्यक असणार आहे. याचा अर्थ असा की, तुमचे क्रेडिट कार्ड प्रभावीपणे तुमच्या कर ओळखीचा एक महत्त्वाचा भाग बनेल.
जर तुम्हाला तुमच्या कंपनीकडून क्रेडिट कार्ड दिले गेले असेल, तर हा तिसरा बदल तुमच्यासाठी आहे. नवीन मसुदा नियमांनुसार, १ एप्रिलपासून, तुमच्या कंपनीच्या कार्डने केलेला वैयक्तिक खर्च करपात्र लाभ मानला जाऊ शकतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, जर तुम्ही तुमच्या कंपनीचे कार्ड वैयक्तिक खरेदी, प्रवास किंवा मनोरंजनासाठी वापरले, तर ती रक्कम तुमच्या पगारात जोडली जाऊ शकते आणि त्यावर कर लागू होऊ शकतो. तो खर्च कामाशी संबंधित होता हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला बिले किंवा पुरावा सादर करण्याची आवश्यकता असणार आहे.
क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना आयकर भरण्यासाठी एक नवीन पर्याय दिला जाऊ शकतो. प्रस्तावित नियमांनुसार, आता नेट बँकिंग किंवा डेबिट कार्डऐवजी क्रेडिट कार्ड वापरून आयकर भरता येईल. कर भरण्याच्या वेळी तुमच्याकडे पुरेशी रोख रक्कम नसल्यास हे अत्यंत उपयुक्त ठरू शकते. येथे सावधगिरी बाळगणे देखील आवश्यक आहे, कारण कार्ड जारी करणारी बँक प्रक्रिया शुल्क आकारू शकते आणि क्रेडिट कार्ड बिल वेळेवर न भरल्यास व्याज देखील आकारले जाऊ शकते.
क्रेडिट कार्डशी संबंधित पुढील बदल म्हणजे, तुमचे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट पॅन कार्डसाठी पत्त्याचा पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते. जर स्टेटमेंट अलीकडील असेल आणि त्यात तुमचा अचूक पत्ता असेल, तर ते एक वैध दस्तऐवज म्हणून स्वीकारले जाईल. यामुळे पॅन कार्डसाठी अर्ज करणे किंवा तपशील अद्ययावत करणे देखील सोपे होईल, विशेषतः जर तुमच्याकडे विजेची बिले किंवा प्रमाणपत्रे नसतील. याव्यतिरिक्त, क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना पॅन कार्ड सादर करणे अनिवार्य होईल.






