Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थायलंडमध्ये घुमणार मराठी संस्कृतीचा डंका! फुकेतमध्ये ‘दगडूशेट गणपती’ मंदिराची प्रतिकृती; भारतीयांसाठी गुंतवणुकीची सुवर्णसंधी

दुबईस्थित उद्योगपती आणि गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे ग्लोबल अध्यक्ष डॉ. सुनील व्ही. मांजरेकर यांच्या पुढाकारातून भारतीय विशेषतः महाराष्ट्रीयन नागरिकांसाठी फुकेतमध्ये घर खरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 29, 2026 | 06:02 PM
थायलंडमध्ये घुमणार मराठी संस्कृतीचा डंका! फुकेतमध्ये 'दगडूशेट गणपती' मंदिराची प्रतिकृती (Photo Credit- X)

थायलंडमध्ये घुमणार मराठी संस्कृतीचा डंका! फुकेतमध्ये 'दगडूशेट गणपती' मंदिराची प्रतिकृती (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • थायलंडमध्ये घुमणार मराठी संस्कृतीचा डंका!
  • फुकेतमध्ये ‘दगडूशेट गणपती’ मंदिराची प्रतिकृती
  • भारतीयांसाठी गुंतवणुकीची सुवर्णसंधी
मुंबई, (प्रतिनिधी) : थायलंडमधील निसर्गरम्य फुकेत येथे पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली असून, मराठी संस्कृतीचा जागतिक स्तरावर विस्तार करण्याचा एक अनोखा उपक्रम साकारला आहे. दुबईस्थित उद्योगपती आणि गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे ग्लोबल अध्यक्ष डॉ. सुनील व्ही. मांजरेकर यांच्या पुढाकारातून भारतीय विशेषतः महाराष्ट्रीयन नागरिकांसाठी फुकेतमध्ये घर खरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. त्यांच्या ‘एसक्युसीसी प्रॉपर्टीज एलएलसी’ ( SQCC Properties LLC) दुबई, (UAE) आणि ‘फुकेत ९ रियल इस्टेट डेव्हलपमेंट’, थायलंड (Phuket9 Real Estate Development, Thailand) यांच्या संयुक्त विद्यमाने फुकेतमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प विकसित करण्यात येत आहेत. फुकेतच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यालगत, शांत आणि निसर्गसंपन्न परिसरात उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे भारतीय गुंतवणूकदारांसाठी परदेशात स्वतःची प्रॉपर्टी घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

मुंबईतील सहार येथील JW Marriott हॉटेलमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात ‘Phuket9’ च्या संस्थापक सौमिस पापाचसॉर्न मीपा (Ms. Papachsorn Meepa “Kae”) यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रकल्पाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रिकल्चरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

फुकेतमध्ये उभारण्यात आलेल्या ‘दगडूशेट गणपती’ मंदिराच्या प्रतिकृतीमागील कथा देखील तितकीच प्रेरणादायी आहे. युरोपियन नागरिकांमध्ये लोकप्रिय असलेल्या या शांत आणि रम्य ठिकाणी भेट दिल्यानंतर डॉ. मांजरेकर यांनी या मंदिरातील शोडोपचार पूजा, आरती आणि भजन यामध्ये परदेशी नागरिकांचा सहभाग पाहून आश्चर्य व्यक्त केले. विशेष म्हणजे, या मंदिराची निर्मिती मिस पापाचसॉर्न मीपा (Ms. Papachsorn Meepa “Kae”) यांच्या वडिलांनी केली असून, त्या स्वतः या मंदिराची सेवा करतात. भारतीय संस्कृतीबद्दल असलेले त्यांचे प्रेम लक्षात घेऊन डॉ. मांजरेकर यांनी भारतीयांसाठी फुकेतमध्ये प्रॉपर्टी खरेदीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला.

Market Crash होणार? रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत होण्याचा ‘हा’ खास फॉर्म्युला; जाणून घ्या सविस्तर

‘Phuket9’ ही कंपनी 2004 पासून फुकेतमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असून, विकास, बांधकाम आणि व्यवस्थापन या सर्व क्षेत्रांत विश्वासार्ह नाव म्हणून ओळखली जाते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये हॉटेल्स, कॉन्डोमिनियम्स आणि लक्झरी व्हिला यांचा समावेश असून सर्व प्रकल्पांसाठी व्यावसायिक प्रॉपर्टी मॅनेजमेंट सुविधा दिल्या जातात.

या प्रसंगी बोलताना मिस पापाचसॉर्न मीपा (Ms. Papachsorn Meepa “Kae”) म्हणाल्या, “आमचे ध्येय म्हणजे आमच्या ग्राहक, भागीदार आणि आमच्या टीमसाठी एक मजबूत आणि स्थिर संस्था उभी करणे. या दृष्टीकोनामुळे अधिकाधिक सकारात्मक विचारांचे लोक आमच्याशी जोडले जात आहेत. आम्हाला आमच्या मुख्य कार्यालयात आपले वैयक्तिक स्वागत करण्यास नेहमीच आनंद वाटतो. फुकेत येथे आपले हार्दिक स्वागत आहे!”

यावेळी डॉ. सुनील व्ही. मांजरेकर म्हणाले, “फुकेत ही केवळ पर्यटनस्थळ नाही, तर भारतीयांसाठी सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीचे नवे केंद्र आहे. मराठी संस्कृतीची जोड आणि जागतिक दर्जाच्या सुविधांमुळे हा प्रकल्प गुंतवणूकदारांसाठी विशेष ठरेल.”

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक ही भांडवल सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यात सातत्याने वाढ करण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय मानली जाते. वाढता पर्यटन व्यवसाय, मर्यादित जमीन उपलब्धता आणि नियोजित विकासामुळे फुकेतमधील मालमत्ता बाजार सातत्याने बळकट होत आहे.

Phuket9 चा फुल-सायकल अ‍ॅप्रोच हा या प्रकल्पाचा मुख्य आधार असून, सखोल मार्केट रिसर्चपासून ते टर्नकी डेव्हलपमेंट आणि व्यवस्थापनापर्यंत सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे गुंतवणूकदारांना स्थिर आणि विश्वासार्ह परतावा मिळण्यास मदत होते. कंपनीकडून मोफत कन्सल्टेशन सेवा उपलब्ध असून, ग्राहकांना योग्य मालमत्ता निवडण्यासाठी तसेच वैयक्तिक प्रोजेक्ट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले जाते.

Credit Card Rule Change : क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांनो सावधान! 1 एप्रिलपासून बदलणार ‘हे’ महत्त्वाचे नियम

Web Title: Dagdusheth ganpati temple replica phuket thailand investment opportunity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • Business News
  • dagdusheth halwai
  • india
  • thailand

संबंधित बातम्या

व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन होणार स्वस्त? MDR नंतर आता TMR! वैद्यकीय उपकरणांवरील अवाजवी नफ्याला बसणार आळा
1

व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन होणार स्वस्त? MDR नंतर आता TMR! वैद्यकीय उपकरणांवरील अवाजवी नफ्याला बसणार आळा

काय सांगता… ऑनलाईन तणनाशक विक्री? Amazon, Flipkart अन् JioMart ला मोठा झटका! नियमांच्या उल्लंघनामुळे मोठी कारवाई
2

काय सांगता… ऑनलाईन तणनाशक विक्री? Amazon, Flipkart अन् JioMart ला मोठा झटका! नियमांच्या उल्लंघनामुळे मोठी कारवाई

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात
3

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

‘श्रीमंतां’चा थाटच न्यारा! ढोल-ताशांचा गजर, ‘मोरया’चा जयघोष अन्…; ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक
4

‘श्रीमंतां’चा थाटच न्यारा! ढोल-ताशांचा गजर, ‘मोरया’चा जयघोष अन्…; ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.