नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नितेश राणे यांच्या वक्तव्यांवर टीका केली. मुस्लीम समाजाला वारंवार लक्ष्य करणे अयोग्य असल्याचे सांगत मदरशांबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सध्या राज्यातील मदरसे शासनाच्या अभ्यासक्रमानुसार चालत असून ते आधुनिक आणि सुसज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इंग्रजी, हिंदी आणि मराठी माध्यमातून शिक्षण दिले जात असून विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहातील शिक्षणाची संधी उपलब्ध होत असल्याचे ते म्हणाले.