Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉक्स ऑफिसच नाही शेअर बाजारावरही धुरंदर – 2 ची जादू! PVR Inox झाले मालामाल

OTT प्लॅटफॉर्मच्या युगातही चित्रपटाच्या प्रभावी कामगिरीने तज्ज्ञांनाही आश्चर्यचकित केले आहे. एखाद्या चित्रपटाने मोठ्या संख्येने प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्याची किमया झाली आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 20, 2026 | 01:31 PM
पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअर्समध्ये वाढ (फोटो सौजन्य - Social Media)

पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअर्समध्ये वाढ (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Follow Us:
  • धुरंधर २ मुळे पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअर्समध्ये उसळी
  • पहिल्यांदाच चित्रपटामुळे शेअरमध्ये वाढ 
  • पीव्हीआर आयनॉक्स शेअर 
बॉलिवूड चित्रपट ‘धुरंधर २’ इतका प्रभावी ठरला आहे की, त्याचा प्रभाव केवळ बॉक्स ऑफिसपुरता मर्यादित नाही, तर शेअर बाजारावरही स्पष्टपणे दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी १०० कोटींहून अधिक कमाई करून या चित्रपटाने एक महत्त्वपूर्ण विक्रम प्रस्थापित केला आहे. चित्रपटाच्या प्रभावी सुरुवातीनंतर, मल्टिप्लेक्स चेन पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअर्समध्येही मोठी वाढ दिसून आली. शुक्रवारी सकाळच्या सत्रात, कंपनीचा स्टॉक ३.५० टक्क्यांनी वाढून १,००० रुपयांच्या पुढे गेला.

धुरंधर – १ ची चर्चा अजूनही सुरूच होती दरम्यान त्वरीत धुरंधरचा दुसरा भागही आदित्य धर याने आणला आणि रणवीर सिंगच्या या चित्रपटाने सर्व बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्स पहिल्याच दिवशी तोडले आहेत. इतकंच नाही तर या चित्रपटाचा प्रभााव शेअर बाजारावरही दिसून येत आहे. पहिल्यांदाच चित्रपटामुळे एखाद्या शेअरचा भाव वधारला अशी स्थिती समोर येत आहे. यामुळे PVR चे शेअर्स बाजारात चांगलेच जम बसवत आहेत 

Stock Market Today: आनंदवार्ता! सकारात्मक पातळीवर उघडणार शेअर बाजार, ‘हे’ स्टॉक्स खरेदी करून तुम्हीही मालामाल

धुरंधर २ चा शेअर बाजारावरील प्रभाव

या वाढीमुळे, पीव्हीआर आयनॉक्सचे बाजार भांडवल (मार्केट कॅप) देखील ३६० कोटींहून अधिक वाढले. बाजार तज्ज्ञांच्या मते, ‘धुरंधर २’ चा प्रभाव कायम राहील आणि हा चित्रपट लवकरच कमाईच्या बाबतीत १,००० कोटींचा टप्पा ओलांडू शकतो. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या युगातही चित्रपटाच्या प्रभावी कामगिरीने तज्ज्ञांनाही आश्चर्यचकित केले आहे. त्यांच्या मते, बऱ्याच काळानंतर एखादा चित्रपट मोठ्या संख्येने प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यात यशस्वी झाला आहे.

PVR शेअर्समध्ये एका आठवड्यात ५.६% ची वाढ

१३ मार्चपासून BSE वर PVR Inox च्या शेअर्समध्ये अंदाजे ५.६० टक्क्यांची वाढ झाली आहे. शुक्रवारी, हा स्टॉक ३.७० टक्क्यांनी वाढून ₹१०२९ वर ट्रेड करत होता. यापूर्वी, सकाळच्या सत्रात तो १.३४ टक्क्यांनी वाढून ₹१००५.६० वर पोहोचला होता. कंपनीचे बाजार भांडवल (मार्केट कॅप) देखील आदल्या दिवशीच्या ₹९७४४.३८ कोटींवरून वाढून ₹१०,१०४.७८ कोटी झाले आहे. त्यामुळे, येत्या काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या धुरंधर याच चित्रपटाची सगळीकडे हवा आहे आणि प्रत्येक थिएटर सध्या हाऊसफुल्ल असून त्याचा चांगला परिणाम शेअर्सवरही होताना दिसून येत आहे. दरम्यान पीव्हीआरसाठी तर ही मोठी लॉटरी लागली असून चित्रपटासह पीव्हीआरच्या व्यवसायतही वाढ होताना दिसून येत आहे. 

शेअर बाजारात मोठी त्सुनामी, एका दिवसात बुडाले 13 लाख कोटी रुपये; गुंतवणुकदार हवालदिल

Web Title: Dhurandhar 2 box office collection making records as pvr inox share jumps with new records

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • Business News
  • Hindi Movie
  • PVR
  • share price

संबंधित बातम्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
1

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली
2

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
3

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ
4

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.