
ट्रम्पच्या धोरणांना अमेरिकन शेतकरीही त्रस्त! ( सौजन्य - सोशल मीडिया )
शेतीचा वाढता खर्च पाहता, त्यांच्या मनात सरकारच्या धोरणांविषयी प्रश्नही निर्माण होऊ लागले आहेत. अमेरिकन वृत्तसंस्था एएफपीच्या अहवालानुसार, ओहायोमधील सोयाबीन शेतकरी डेव्हिड शॅक्ट यांना यावर्षी पीक काढणे महाग पडत आहे.
अमेरिकेतील शेतकऱ्यांसाठी शेतीचा खर्च वाढण्यामागे डिझेलच्या किमती हे एक प्रमुख कारण सध्या चर्चेत आहे. या महिन्यात सोयाबीन, मका आणि इतर पिकांची काढणी सुरू होणार आहे. यासाठी कंबाईन हार्वेस्टर आणि इतर शेती उपकरणे चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची गरज लागते. पण डिझेलच्या किंमती वाढल्याने आता शेतकऱ्यांवर भार पडत आहे. अहवालानुसार, फेब्रुवारीपासून डिझेलच्या दरात ६७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.
याव्यतिरिक्त, पुढील पिकाच्या पेरणीसाठी लागणाऱ्या काही खतांच्या किमती दुप्पट झाल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुढील पिकाची तयारी करणे आणि चालू पिकाच्या काढणीचा खर्च भागवणे हे एक आव्हान बनले आहे. जागतिक ऊर्जा आणि खत व्यापारासाठी महत्त्वपूर्ण आहे त्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे हा पुरवठा विस्कळीत झाला आहेत त्यात शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एएफपीच्या अहवालानुसार, इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षामुळे ऊर्जा बाजारावर दबाव वाढला असून, त्याचा परिणाम इंधन आणि खतांच्या किमतींवर झाला आहे.
शेतीचा खर्च वाढला असताना, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनातून पुरेसे उत्पन्न मिळत नाहीये. अहवालानुसार, यावर्षी कृषी मालाच्या किमती सुमारे २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. ही वाढ डिझेल आणि खतांच्या किमतीतील वाढीपेक्षा खूपच कमी आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, वाढत्या खर्चानंतरही त्यांना आपली पिके शेतातच सोडून देणे परवडत नाही. त्यांना कोणत्याही परिस्थितीत कापणी पूर्ण करावीच लागेल. परिणामी, वाढलेला खर्च सहन करण्याशिवाय त्यांच्याकडे मर्यादित पर्याय आहेत.
ट्रम्प प्रशासनाने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार वाढवला आहे आणि इतर अनेक आव्हानंदेखील निर्माण केली आहेत. मात्र, प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, शेतकरी रिपब्लिकन पक्षाला दिलेला आपला पाठिंबा काढून घेण्याचा अद्याप विचार करत नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आतामुळे व्यापारावर काय परिणाम होतोय हे पाहावं लागेल.
‘प्रधानमंत्री अंबानी…!’ Elon Musk चा Mukesh Ambani यांच्यावर हल्लाबोल! एका पोस्टने उद्योग जगतात खळबळ