
Panama 7.6 magnitude earthquake Tsunami warning Panama Colombia Ecuador
मध्य अमेरिकेतील पनामा (Panama Earthquake) देशामध्ये शुक्रवारी सकाळी एकापाठोपाठ एक शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ७६ इतकी मोजली गेली. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या महाभूकंपाचा केंद्रबिंदू पनामाच्या दक्षिण टोकाजवळ, पिटालोसा अरिबाच्या नैऋत्येला अवघ्या १० किलोमीटर अंतरावर आणि जमिनीपासून १० किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाची खोली कमी असल्यामुळे त्याचे धक्के अत्यंत तीव्र स्वरूपात जाणवले आणि संपूर्ण पनामा सिटी हादरून निघाली.
राजधानी पनामा सिटीमध्ये इमारती मोठ्या प्रमाणात डोलू लागल्यामुळे नागरिक अत्यंत घाबरले आणि जीव वाचवण्यासाठी तातडीने रस्त्यावर व मोकळ्या जागेवर धावून आले. सोशल मीडियावर या भूकंपाचे अनेक थरारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये जमीन हादरत असल्याचे आणि जुन्या इमारतींचे भाग सुट्टे होऊन खाली पडत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पनामाच्या पानोनोम या मध्यवर्ती शहरात एका ऐतिहासिक इमारतीचा टॉवर आणि काही निवासी इमारतींच्या बाल्कनी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
MASSIVE 7.7 EARTHQUAKE HITS PANAMA 🇵🇦 Buildings shook in Panama City, people rushed into the streets, and tsunami warnings were issued after the powerful quake struck the country. Damage has been reported, but no confirmed deaths so far. https://t.co/d0cxBeEr3T — Shahid (@BinQasimRaja1) October 10, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia-Iran: ‘इराणची चूक नसतानाही…’, तुर्कमेनिस्तानमध्ये पुतिन-पेझेश्कियन यांची भेट; मध्य-पूर्वेतील युद्धावर रशियाची मोठी घोषणा
या अत्यंत शक्तिशाली भूकंपाची तीव्रता पाहता, अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेने आणि आंतरराष्ट्रीय यंत्रणांनी गंभीर पावले उचलली आहेत. पनामाच्या किनारपट्टीसह दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील अनेक देशांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने कोलंबिया, इक्वेडोर, निकाराग्वा आणि ग्वाटेमाला या देशांचा समावेश असून, किनारी भागातील नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Terrifying Earthquake in Panama
Hotel collapsed, in Playa Venao.
Massive destruction accross region triggered TSUNAMI… https://t.co/WO0acQPP8h — Lizard People’s Party🦎 (@1SanatanSatya) October 9, 2026
credit – social media and Twitter
भूकंपानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पनामाचे राष्ट्राध्यक्ष होजे राऊल मुलिनो यांनी नागरिकांना घाबरून न जाता संयम राखण्याचे आवाहन केले. त्यांनी सोशल मीडियावर स्पष्ट संदेश दिला की, “या दुर्दैवी घटनेचा वापर समाजात अफवा किंवा अनावश्यक घबराट पसरवण्यासाठी करू नये.” शिक्षण मंत्रालयाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि शैक्षणिक संस्था तात्काळ बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्कालीन पथके आणि सिनाप्रोकची टीम तातडीने मदतकार्यात जुंपली असून, बाधित भागांचा प्रत्यक्ष दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
Me encuentro recorriendo Penonomé y coordinando toda la ayuda posible de manera inmediata para los afectados. https://t.co/2JOiaMfgik — José Raúl Mulino (@JoseRaulMulino) October 9, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Russia Oil Deal : इंधनाचे दर विक्रमी वेगाने घटणार? रशिया आणि अमेरिकेने केली एका मोठ्या ‘तेल’ कराराची घोषणा
या भीषण नैसर्गिक संकटाच्या काळात लॅटिन अमेरिकेतील मित्र राष्ट्रांनी पनामाच्या मदतीसाठी तातडीने हात पुढे केला आहे. कोलंबिया, व्हेनेझुएला, मेक्सिको, कोस्टा रिका, ग्वाटेमाला, इक्वेडोर, चिली, डॉमिनिकन रिपब्लिक, पेरू, एल साल्वाडोर आणि होंडुरास यांसारख्या देशांनी पनामा सरकारशी संपर्क साधून मदतीची तयारी दर्शवली आहे. राष्ट्राध्यक्ष होजे राऊल मुलिनो यांनी या कठीण प्रसंगी मिळालेल्या जागतिक पाठिंब्याबद्दल आणि एकजुटीच्या संदेशाबद्दल सर्व मित्र राष्ट्रांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
Estoy en Penonomé, recorriendo junto a la ministra Montalvo, las zonas afectadas y para coordinar rápidamente ayuda y soluciones para los afectados del sismo que sufrió nuestro país. — José Raúl Mulino (@JoseRaulMulino) October 9, 2026
credit – social media and Twitter
सरकारकडून बाधित नागरिकांना तात्पुरते आश्रयस्थान, अन्न आणि वैद्यकीय मदत पुरवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पनामा प्रशासन कोणत्याही मोठ्या जीवितहानी टळल्याबद्दल सुटकेचा श्वास घेत असले, तरी त्सुनामीच्या इशाऱ्यामुळे किनारपट्टीवर अजूनही सतर्कतेचा पाहरा दिला जात आहे.
Agradezco los mensajes de apoyo y solidaridad de los mandatarios de países hermanos como Colombia, Venezuela, Mexico, Costa Rica, Guatemala, Ecuador Guatemala, Chile, República Dominicana, Perú, El Salvador, Honduras. También al Secretario de Estado de los Estados Unidos y a los cientos de alcaldes, organizaciones y ciudadanos que nos dan su apoyo. — José Raúl Mulino (@JoseRaulMulino) October 10, 2026
credit – social media and Twitter