Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ethanol Procurement Policy : उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीला चाप! १ नोव्हेंबरपासून नवीन निर्बंध; कारखान्यांसमोर मोठे आव्हान

Ethanol Procurement Policy : केंद्र सरकारने २०२६-२७ या पुरवठा वर्षासाठी जाहीर केलेल्या इथेनॉल खरेदीच्या नव्या धोरणात मोठा बदल केला आहे. या नव्या निविदेत उसाचा रस, साखरेचा पाक आणि बी-हेवी मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा समावेश न करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 31, 2026 | 03:27 PM
मळी, पाकापासून तयार होणाऱ्या इथेनॉल खरेदीला ब्रेक ( सौजन्य - सोशल मीडिया )

मळी, पाकापासून तयार होणाऱ्या इथेनॉल खरेदीला ब्रेक ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • केंद्र सरकारचा मोठा निर्णय!
  • मळी, पाकापासून तयार होणाऱ्या इथेनॉल खरेदीला ब्रेक
  • साखर कारखानदार आणि शेतकरी संकटात?
Ethanol Procurement Policy : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने २०२६-२७ या पुरवठा वर्षांसाठी इथेनॉल खरेदीच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला आहे. ऊसाचा रस, साखरेचा पाक आणि बी-हेवी मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलसाठी नव्या निविदेत मागणी न ठेवल्याने उद्योगासमोर २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२७ या कालावधीसाठी होणाऱ्या निर्णयामुळे कारखान्यांना उत्पादनाचे नियोजन बदलावे लागू शकते. ( Ethanol Procurement Policy ) 

RBI Plastic Currency : मुहुर्त ठरला? ‘या’ तारखेपासून बाजारात येणार प्लास्टिक नोटा; 10-20 रुपयांच्या नोटांची छपाई सुरु

सुमारे ११०० कोटी लिटर इथेनॉल खरेदी करण्याचे नियोजन

केंद्र सरकारने १६ ऑक्टोबरला जारी केलेल्या निविदेनुसार, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणासाठी सुमारे ११०० कोटी लिटर इथेनॉल खरेदी करण्याचे नियोजन आहे. मात्र, या निविदेत उसाच्या रसापासून, साखरेच्या पाकापासून आणि बी-हेवी मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा समावेश नाही. त्यामुळे या कच्च्या मालावर आधारित इथेनॉल प्रकल्पांच्या उत्पादन आणि विक्री व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.

साखरेची पुरेशी उपलब्धता राखण्याचा उद्देश

देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची पुरेशी उपलब्धता राखणे आणि किमतींवरील दबाव नियंत्रित ठेवणे, हा या निर्णयामागील महत्त्वाचा उद्देश मानला जात आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रमुख ऊस उत्पादक राज्यांत साखर उत्पादनाबाबत व्यक्त होणाऱ्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर साखरेचा वापर इंधननिर्मितीकडे वळविण्याऐवजी मानवी वापरासाठी उपलब्ध ठेवण्यास प्राधान्य दिले जात आहे.

कारखान्यांच्या अर्थकारणावर परिणाम ?

उसाच्या रसापासून आणि बी-हेवी मळीपासून इथेनॉल तयार करण्यासाठी गुंतवणूक केलेल्या साखर कारखान्यांना पर्यायी उत्पादन व विक्री व्यवस्थेचा विचार करावा लागू शकतो. इथेनॉल प्रकल्पांचे उत्पन्न, कारखान्यांचे आर्थिक नियोजन आणि ऊस उत्पादकांना मिळणाऱ्या मोबदल्यावर अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे.

मका, तांदळापासून इथेनॉलला संधी

या निर्णयाचा अर्थ सरकारने सर्व प्रकारच्या इथेनॉलची खरेदी बंद केली, असा होत नाही. मका, तुटलेला तांदूळ, भारतीय अन्न महामंडळाकडील अतिरिक्त तांदूळ आणि सी-हेवी मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा निविदेत समावेश आहे. त्यामुळे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम सुरू असून धान्याधारित इथेनॉल उत्पादनाला अधिक संधी मिळू शकते.

तर कारखानदारी तोट्यात येईल

केंद्र सरकारच्या धोरणाने आम्ही साखर त्यासाठी बँकेकडून कोट्यावधीचे कर्ज घेतले. सरकार उसापासून इथेनॉल खरेदी करणार नसेल तर कारखानदारी तोट्यात येईल. बँकेच्या कर्जाचे हप्ते कसे भरणार? आधीच साखर कारखानदारी अडचणीत असून, यामुळे आणखी अडचणीत येईल. या निर्णयामुळे साखर कारखानदारी व शेतकरी उद्ध्वस्त होतील. केंद्र सरकारने निर्णयाचा फेरविचार करावा. आमचा या निर्णयाला विरोध आहे. – राजेंद्र नागवडे, अध्यक्ष, सहकारमहर्षी नागवडे सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदे.

सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह असला तरी 6 देशात दुातामुळे ताइक नका, महाद वाढलेले आहेत. सरकारने परदेशातून कच्चा माल पुरवल्यास धान्याधारित इथेनॉल खरेदीचे यावर्षीचे उद्दिष्टय पूर्ण करता येईल.
– दुवौक ढगे पाटील, संचालक, ढगे पाटील इथेनॉल प्रोजेक्ट लिमिटेड, श्रीगोंदे.

8th Pay Commission अहवालानंतर काय होणार? केंद्र सरकार घेऊ शकते हे 5 मोठे निर्णय; कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ?

💡

Frequently Asked Questions

  • Que: केंद्र सरकारच्या नव्या इथेनॉल धोरणात कोणत्या घटकांना वगळण्यात आले आहे?

    Ans: नवीन निविदेमध्ये उसाचा रस, साखरेचा पाक आणि बी-हेवी मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची मागणी नोंदवण्यात आलेली नाही.

  • Que: सरकारने हा निर्णय घेण्यामागचे मुख्य कारण काय आहे?

    Ans: देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची पुरेशी उपलब्धता राखणे आणि किमतींवरील दबाव नियंत्रित ठेवणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

  • Que: धोरणात आता कोणत्या प्रकारच्या इथेनॉल उत्पादनाला प्राधान्य दिले जात आहे?

    Ans: मका, तुटलेला तांदूळ, भारतीय अन्न महामंडळाकडील अतिरिक्त तांदूळ आणि सी-हेवी मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा निविदेत समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Ethanol procurement policy change molasses sugar ban marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • ethanol
  • Ethanol Petrol
  • Sugar Factory

संबंधित बातम्या

Washim: ‘श्री बालाजी’च्या १५ आजी-माजी संचालकांना नोटीस; ५ नोव्हेंबर रोजी होणार सुनावणी,  साखर कारखान्यातील गैरकारभार प्रकरण
1

Washim: ‘श्री बालाजी’च्या १५ आजी-माजी संचालकांना नोटीस; ५ नोव्हेंबर रोजी होणार सुनावणी, साखर कारखान्यातील गैरकारभार प्रकरण

आता 95% इथेनॉल आणि 5% टक्केच पेट्रोल? भारतात E100 फ्लेक्स-फ्युएल वाहनांचा मार्ग बेलगाम! सरकारने नियम बदलले, जनतेची पाचावर धारण
2

आता 95% इथेनॉल आणि 5% टक्केच पेट्रोल? भारतात E100 फ्लेक्स-फ्युएल वाहनांचा मार्ग बेलगाम! सरकारने नियम बदलले, जनतेची पाचावर धारण

E20 पेट्रोलविरोधातील आंदोलन ‘पेड कॅम्पेन’ असल्याचा नितीन गडकरींचा दावा! E100 इंधनाचा मार्गही मोकळा
3

E20 पेट्रोलविरोधातील आंदोलन ‘पेड कॅम्पेन’ असल्याचा नितीन गडकरींचा दावा! E100 इंधनाचा मार्गही मोकळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.