
Shri Balaji Cooperative Sugar Factory
वाशिम: जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मसलापेन येथील अवसायात गेलेल्या श्री. बालाजी सहकारी साखर कारखाना मर्यादितच्या गैरकारभाराची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८३ अन्वये सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. या चौकशीकामी प्रादेशिक सहसंचालक (साखर) अमरावती यांच्या आदेशानुसार अॅड. तुलसीदास सारंगधर झोरे (अकोला) यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. या अनुषंगाने चौकशी अधिकारी अॅड झोरे यांनी कारखान्याशी संबंधित १५ व्यक्ती (आजी-माजी संचालक व पदाधिकारी) तसेच प्रकरणातील हरकतदार यांना अधिकृत नोटीस बजावली.
नोटीस बजावण्यात आलेले प्रमुख व्यक्ती या नोटीसमध्ये विठ्ठलराव कोंडूजी शिंदे (खंडाळा), परशुराम सिताराम गाडे (सवद), डॉ. भीमराव हैबती कांबळे (वसारी), बाबाराव साहेबराव खडसे (शेलु खडसे), सुनील केशवराव पाटील (अकोला), भगवानराव गणपत पवार (रिसोड), लक्ष्मण संभाजी कार्यदे (रिसोड), त्र्यंबक ग्यानबा बोंडे (व्याड), दामोदर यशवंत गोटे (तोंडगाव), बंदेसिंग रामदास राठोड (धुमका), भास्कर नागनाथ गुंडेवार (हिंगोली), नारायण सिताराम खेडकर (रावेगार), वैजाबाई भगवान गायकवाड (महागाव), यांचा समावेश आहे.
तसेच प्रकरणातील हरकतदार पांडूरंग ठाकरे (देवकृपा, अनसिंग) यांनाही माहिती व लेखी निवेदनासाठी बोलावण्यात आले.या चौकशीची प्रत साखर आयुक्त (महाराष्ट्र राज्य, पुणे), प्रादेशिक सहसंचालक (साखर, अमरावती) तसेच अवसायक बालाजी सहकारी साखर कारखाना (वाशिम) यांना माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली.
चौकशीचे ठिकाण जिल्हा विशेष लेखापरीक्षक-१, सहकारी संस्था, वाशिम (पुसद नाका, वाशिम कार्यालय सुनावणीची तारीख व वेळ दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजतापर्यंत या नोटीसमध्ये नमूद केलेल्या सर्व संबंधितांनी आणि हरकतदारांनी निश्चित केलेल्या दिवशी व वेळी लेखी जबाबासह आणि आवश्यक कागदपत्रेसह प्रत्यक्ष उपस्थित राहून आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चौकशी लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सर्व संबंधितांनी सहकार्य करावे, असेही यात स्पष्ट करण्यात आले.