Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: गुंतवणूकदारांनोsss आज हे शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर… बाजारातील तज्ज्ञांनी केली खरेदीची शिफारस

Share Market Update: भारतीय शेअर बाजार आज हिरव्या रंगात उघडणार असल्याचा अंदाज बाजारातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे. आठवड्याची सुरुवात सकारात्मक होणार असल्याने गुंतवणूकदारांमध्ये काहीसा उत्साह निर्माण झाला आहे. आज तज्ज्ञांनी खरेदी करण्यासाठी कोणत्या शेअर्सची शिफारस केली आहे, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 15, 2026 | 08:30 AM
Share Market Today: गुंतवणूकदारांनोsss आज हे शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर... बाजारातील तज्ज्ञांनी केली खरेदीची शिफारस

Share Market Today: गुंतवणूकदारांनोsss आज हे शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर... बाजारातील तज्ज्ञांनी केली खरेदीची शिफारस

Follow Us
Follow Us:
  • गिफ्ट निफ्टी जवळपास 300 पॉइंट्सच्या प्रीमियमवर ट्रेड होत असल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी सकारात्मक सुरुवात करू शकतात.
  • शुक्रवारी सेन्सेक्स 1,695 अंकांनी आणि निफ्टी 461 अंकांनी वधारून जोरदार तेजीसह बंद झाले होते.
  • बाजारातील तज्ज्ञांनी किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, रेमंड, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, आयओसी, जिंदाल स्टील आणि पॉलीकॅब इंडियासह अनेक शेअर्सची शिफारस केली आहे.
India Share Market Update: भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. भारतीय शेअर बाजारात आज १५ जून रोजी तेजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज सकारात्मक पातळीवर उघडतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-अप सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास ३०० पॉइंट्सच्या प्रीमियमवर, सुमारे २३,९८७ च्या पातळीवर ट्रेड करत होता.

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरात किंचीत घसरण! आता 24 कॅरेटसाठी मोजावे लागणार इतके पैसे

शुक्रवारी भारतीय शेअर बाजार मोठ्या तेजीसह बंद झाला, आणि बेंचमार्क निफ्टी ५० २३,६०० च्या पातळीच्या वर बंद झाला. सेन्सेक्स १,६९५.४० अंकांनी, म्हणजेच २.३० टक्क्यांनी वाढून ७५,५२७.९५ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५० ४६१.३० अंकांनी, म्हणजेच १.९९ टक्क्यांनी वाढून २३,६२२.९० अंकांवर स्थिरावला. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक १,६३८.०५ अंकांनी, म्हणजेच २.९७ टक्क्यांनी वाढून ५६,८१४.८० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest) 

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार वेदांत, ओएनजीसी, हिंदुस्तान पेट्रोलियम, केआयएमएस, जेएसडब्ल्यू एनर्जी, नेस्ले इंडिया, पॉवर ग्रिड, मीशो, एनएलसी इंडिया, डॉ. रेड्डीज या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज गुंतवणूकदार किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स, ग्रीव्हज कॉटन, ब्रिगेड एंटरप्रायझेस आणि रेमंड हे शेअर्स खरेदी करण्याचा विचार करू शकतात.

आता डॉलरची दादागिरी संपणार? रुपयाचा भाव वाढवण्यासाठी RBI ने कसली कंबर; काय आहे नेमका प्लॅन?

प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, एल अँड टी फायनान्स आणि आयओसी यांचा समावेश आहे. निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी आज गुंतवणूकदारांना ट्रेडिंगसाठी जिंदालस्टेल, व्हीटीएल आणि ब्लूजेट या तीन शेअर्सची शिफारस केली आहे. आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी सल्ला दिला आहे की, आज गुंतवणूकदार हिंदुस्तान युनिलिव्हर, इटरनल आणि पॉलीकॅब इंडिया हे शेअर्स खरेदी करण्याचा विचार करू शकतात.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Experts recommend these stocks as indian share market signal a strong opening

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Global Market Crash : नशीब… भारतातील शेअर बाजार आज बंद! शेजारील देशांच्या बाजारात हाहाःकार, काय नेमकी परिस्थिती?
1

Global Market Crash : नशीब… भारतातील शेअर बाजार आज बंद! शेजारील देशांच्या बाजारात हाहाःकार, काय नेमकी परिस्थिती?

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?
2

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?

छप्परफाड रिटर्न… Share Market कोसळलं, तरी या शेअर्सचा तुफान धमाका; अवघ्या 5 दिवसांत पैसे झाले दुप्पट
3

छप्परफाड रिटर्न… Share Market कोसळलं, तरी या शेअर्सचा तुफान धमाका; अवघ्या 5 दिवसांत पैसे झाले दुप्पट

आता रात्रीपर्यंत चालणार Share Market? SEBI चा नवा प्रस्ताव; वेळापत्रकात मोठ्या बदलाची शक्यता
4

आता रात्रीपर्यंत चालणार Share Market? SEBI चा नवा प्रस्ताव; वेळापत्रकात मोठ्या बदलाची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.