Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेचा गंभीर परिणाम; भारतीय फळे-भाजीपाल्याची निर्यात थांबली!

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कॉमट्रेड डेटाबेसनुसार, भारताने बांगलादेशला आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये तब्बल 11.25 अब्ज डॉलर मूल्याची निर्यात केली आहे. जी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 13.8 अब्ज डॉलर आणि 2021 में ये 14.1 अब्ज डॉलर मूल्याची नोंदवली गेली आहे. अर्थात मागील दोन ते तीन वर्षात भारतातून बांग्लादेशला होणाऱ्या निर्यातीत उत्तरोत्तर घट झाली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 08, 2024 | 02:47 PM
बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा गंभीर परिणाम; भारतीय फळे-भाजीपाल्याची निर्यात थांबली!

बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा गंभीर परिणाम; भारतीय फळे-भाजीपाल्याची निर्यात थांबली!

Follow Us
Follow Us:

बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा परिणाम भारतीय व्यापारावर दिसण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापार सध्याच्या घडीला पूर्णतः थांबला आहे. भारतीय निर्यातदारांना आशा आहे की बांगलादेशातील परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल. ज्यामुळे दोन्ही देशांतील व्यापार पुन्हा सुरळीत होण्यास मदत होईल. मात्र, बांग्लादेशमध्ये सध्या केवळ राजकीय संकट नसून, बांगलादेश आर्थिक गर्तेत देखील सापडला आहे. ज्यामुळे भारतीय वस्तूंची निर्यात आणखी काही काळ प्रभावित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारत-बांगलादेश सीमेवर सैन्याचा खडा पहारा

भारतातून बांग्लादेशला दररोज ट्रकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि फळे पाठवली जातात. मात्र, बांगलादेशात सोमवारी घडलेल्या घडामोडींनंतर आज बांगलादेश सीमेपलीकडून या मालाची वाहतूक थांबली आहे. त्यामुळे भाजीपाला, फळांसह नाशवंत माल सीमा ओलांडण्यात अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे हा माल भारतीय सीमेच्या आतच आतच असून, भारतीय सैन्य भारत-बांगलादेश सीमेवर खडा पहारा देत असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा : ‘या’ भारतीय कंपन्यांची चिंता वाढली; बांग्लादेशातील अस्थिरतेमुळे गुंतवणूक धोक्यात!

निर्यातदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता

परिणामी, आता सीमेवर अडकून पडलेला हा माल लवकरात लवकर बांगलादेशात पोहोचला नाही तर निर्यातदारांचे मोठे नुकसान होऊ शकते. भारतातून बांगलादेशात निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये फळे, भाज्या, कॉफी, चहा, मसाले, साखर, मिठाई, रिफाइंड पेट्रोलियम तेल यांचा समावेश होतो. रसायने, कापूस, लोखंड, पोलाद याशिवाय वाहनांचाही समावेश आहे. याउलट आता बांगलादेशातून भारतात मासे, प्लास्टिक, चामडे आणि कपडे आयात केले जातात. हा व्यापार देखील प्रभावित होणार आहे.

बांगलादेशात परकीय चलनाचा तुटवडा

बांगलादेश गेल्या काही काळापासून परकीय चलनाच्या कमतरतेचा सामना करत आहे. अर्थात बांग्लादेशात आधीच डॉलरची कमतरता आहे. ज्यामुळे बांग्लादेशच्या आयात व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. भारतासह काही देशांकडून बांगलादेशला होणाऱ्या निर्यातीत अलीकडील एक-दोन वर्षात घट झाली आहे. अशातच आता बांगलादेशात राजकीय अस्थिरतता निर्माण झाली आहे. ज्याचा दुहेरी परिणाम हा येत्या काळात भारतातून बांग्लादेशला होणाऱ्या निर्यातीवर होण्याची शक्यता होत आहे.

हेही वाचा : बांग्लादेशात राजकीय अस्थिरता; संकट मात्र भारतावर, वाचा… नेमका काय परिणाम होणार?

गेल्या काही वर्षात निर्यातीत घट

बांग्लादेश हा दक्षिण आशियातील भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारताच्या सर्व शेजारी राष्ट्रांमध्ये बांग्लादेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कॉमट्रेड डेटाबेसनुसार, भारताने बांगलादेशला आर्थिक वर्ष 2023-२४ मध्ये तब्बल 11.25 अब्ज डॉलर मूल्याची निर्यात केली आहे. जी आर्थिक वर्ष 2022-२३ मध्ये 13.8 अब्ज डॉलर आणि 2021 में ये 14.1 अब्ज डॉलर मूल्याची नोंदवली गेली आहे. अर्थात मागील दोन ते तीन वर्षात भारतातून बांग्लादेशला होणाऱ्या निर्यातीत उत्तरोत्तर घट झाली आहे.

Web Title: Export of indian fruits and vegetables stopped impact of political instability in bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2024 | 04:08 PM

Topics:  

  • Bangladesh Crisis
  • Bangladesh violence
  • sheikh hasina

संबंधित बातम्या

Sheikh Hasina : ‘मला मृत्यूची भीती नाही’ , हसीना यांचा विरोधकांना मोठा इशारा; बांगलादेशच्या Ex PM लवकरच मायदेशी परतणार?
1

Sheikh Hasina : ‘मला मृत्यूची भीती नाही’ , हसीना यांचा विरोधकांना मोठा इशारा; बांगलादेशच्या Ex PM लवकरच मायदेशी परतणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.