बांग्लादेशात राजकीय अस्थिरता; संकट मात्र भारतावर, वाचा... नेमका काय परिणाम होणार?
भारताचा शेजारील देश असलेल्या बांग्लादेशात सध्या मोठा हिंसाचार उफाळला आहे. परिस्थिती ही टोकाला पोहचली आहे की, आंदोलकांनी थेट पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे त्यांनी बांगलादेश सोडून भारतात आसरा घेतला आहे. तसेच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, बांगलादेशात आता सत्ता लष्कराकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या सर्व राजनीतिक संकटाचा भारताला मोठा फटका आहे.
आतापर्यंत व्यापारिक संबंध राहिले चांगले
तुम्ही म्हणाल हिंसाचार बांग्लादेशात उफाळला असताना, भारतावर त्याचा काय परिणाम होणार आहे. व्यापारिकदृष्ट्या भारत आणि बांगलादेश यांच्यात मोठ्या प्रमाणात व्यापार चालतो. विशेष म्हणजे शेख हसीना या पंतप्रधान असल्याने, आतापर्यंत भारत आणि बांगलादेश यांचे व्यापारिक संबंध चांगले राहिले आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कॉमट्रेड डेटाबेसनुसार, भारताने बांगलादेशला आर्थिक वर्ष 2023-२४ मध्ये तब्बल 11.25 अब्ज डॉलर मूल्याची निर्यात केली आहे. जी आर्थिक वर्ष 2022-२३ मध्ये 13.8 अब्ज डॉलर आणि 2021 में ये 14.1 अब्ज डॉलर मूल्याची नोंदवली गेली आहे.
हेही वाचा : नोकरी सोडली, व्यवसायात उतरली; वर्षाला करतीये तब्बल 351 कोटींचा टर्नओव्हर!
भारत बांगलादेशला काय-काय निर्यात करतो? (आकडेवारी आर्थिक वर्ष 2023-२४)
– खनिज इंधन, तेल, डिस्टिलिशन उत्पादने – 2.19 अब्ज डॉलर
– कापूस 2.18 अब्ज डॉलर्स
– अन्न उद्योग, पशुखाद्य – 733.42 दशलक्ष डॉलर्स
– रेल्वे व्यतिरिक्त इतर वाहने, ट्रामवे – 593.97 दशलक्ष डॉलर्स
– यंत्रसामग्री, अणुभट्ट्या, बॉयलर – 552.41 दशलक्ष डॉलर्स
– भाजीपाला अन्य नाशवंत शेतमाल उत्पादने – 464.31 दशलक्ष डॉलर्स
– साखर आणि साखर कन्फेक्शनरी – 391.60 दशलक्ष डॉलर्स
– सेंद्रिय रसायने – 369.71 दशलक्ष डॉलर्स
– कॉफी, चहा, सोबती आणि मसाले 293.73 दशलक्ष डॉलर्स
– लोह आणि पोलाद – 287.42 दशलक्ष डॉलर्स
हेही वाचा : केंद्र सरकारचे चिनी कंपन्यांवर पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 400 कंपन्या सरकारच्या रडारवर!
व्यापारिकदृष्ट्या भारताचे मोठे नुकसान होणार
परिणामी, आता बांगलादेशात राजकीय स्थिरता निर्माण झाली आहे. ज्याचा थेट परिणाम हा भारतीय निर्यात आणि व्यापारावर होणार आहे. भारत आणि बांगलादेश हे शेजारी असल्याने, दोन्ही देशांमध्ये अनेक व्यापारी करार झाले आहे. त्यावर देखील आता थेट परिणाम होणार आहे. काही बाबींमध्ये भारत बांगलादेशकडून आयात करतो. मात्र, बांगलादेश ही भारतासाठी मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे आता बांगलादेशात राजनीतिक संकट उभे ठाकल्याने त्याचे मोठे नुकसान हे व्यापारिकदृष्ट्या भारताला सोसावे लागणार आहे.