आता मुंबईत 'ही' लॉजिस्टिक कंपनी इलेक्ट्रिक वाहनांद्वारे देणार डिलिव्हरीची सुविधा
फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन म्हणजेच फेडएक्स कंपनी, ही जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस ट्रान्सपोर्ट कंपनी मुंबईत लास्ट-माइल डिलिव्हरीसाठी अतिरिक्त इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) तैनात करून भारतभर आपल्या लॉजिस्टिक्सचे प्रमाण वाढवत आहे. अलीकडेच मुंबईत दाखल केलेल्या 13 टाटा एस ईव्हीसह दिल्ली, बेंगळूरु सहितच्या प्रमुख भारतीय शहरांत कंपनीसाठी कार्यरत असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांची एकूण संख्या 59 वर पोहोचली आहे. 2040 पर्यंत जागतिक स्तरावर कार्बन-न्यूट्रल ऑपरेशन्स साध्य करण्याचे फेडएक्सचे टार्गेट आहे.
ब्रॅंड सिनर्जीची सांगड घालण्याच्या प्रयत्नात फेडएक्सने मुंबई, दिल्ली आणि बंगळूर मध्ये फेडएक्स-सीएसके को-ब्रॅंडेड इव्ही सुरू केल्या आहेत.
पैसा तयार ठेवा, सेबीने ४ कंपन्यांच्या IPO ला दिली मंजुरी, गुंतवणूकदारांना देतील दमदार परतावा
सध्या आयपीएलची क्रेझ सगळीकडेच पाहायला मिळते. या क्रिकेट लीगमधील टीम चेन्नई सुपर किंग्ज फेडएक्सची अधिकृत पार्टनर बनली आहे. ही को-ब्रॅंडेड वाहने भारतातील कंपनीचा प्रेझेन्स वाढवतात आणि मार्केटमधील त्यांची सध्या असलेली गुंतवणूक अधिक मजबूत करतात.
फेडएक्सने केलेल्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की, 90% भारतीय उपभोक्ते अशा व्यवसायांना प्राथमिकता देत आहेत, ज्या व्यवसायांत Sustainable पद्धतींना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे इव्हीचा वापर करण्यात एक धोरणात्मक फायदा देखील दडलेला आहे. ईव्ही वाहनांचा ताफा वाढवण्याचे धोरण चालू ठेवून फेडएक्स कंपनी ग्रीन एनर्जीकडे आपली वाटचाल करत आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, पेन्शनमध्ये विलंब झाल्यास बँका देणार 8 टक्के व्याज
इलेक्ट्रिक वाहने स्मार्ट, स्वच्छ आणि ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन देतात. ज्यामुळे लॉजिस्टिक्स कंपनी जास्त इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देत आहे. कार्बन उत्सर्जन आणि हवेतील प्रदूषण कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.