Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flight Fares : 60 हजारांचे तिकीट आता दीड लाखांच्या पार, विमान प्रवास आवाक्याबाहेर! New York- London चे दर दुप्पट

दिल्लीहून लंडन, दुबई आणि न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानांच्या तिकीट दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे पश्चिम आशियातील हवाई हद्द म्हणजेच airspace बंद करण्यात आल्या आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 04, 2026 | 02:31 PM
(फोटो सौजन्य-Gemini)

(फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • जागतिक स्तरावर युद्ध भडकलं
  • विमानांच्या तिकीट दरांमध्ये प्रचंड वाढ
  • आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले
Price Rise in Air Travel: जागतिक स्तरावर युद्ध भडकलं आणि त्या युद्धाचा भडका जगभर पसरला. सगळीकडे महागाई वाढली आणि परिणामी सगळ्याचे दर वाढले. त्याचा परिणाम हवाई विभागामध्येही झाला. दिल्लीहून लंडन, दुबई आणि न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानांच्या तिकीट दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे पश्चिम आशियातील हवाई हद्द म्हणजेच airspace बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांना आता अधिक लांबीच्या मार्गांवरून उड्डाणे करण्यास भाग पडत आहे. त्यात’एव्हिएशन टर्बाइन फ्युएल’च्या (ATF) किमतींनी आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून, याचा थेट परिणाम तिकीट दरांवर दिसून येत आहे. या किमती सध्या गगनाला भिडल्या आहेत. नेमका काय परिणाम झालाय?

Petrol Diesel Rate : पाकिस्तानमध्ये पेट्रोल 458 रुपये, मग भारतातही पेट्रोल-डिझेल खरंच महागलं? तपासा तुमच्या शहरातील आजचे दर

किमती कडाडल्या

तिकीट बुकिंग करणाऱ्या websites वर जाऊन दर पाहिले तर किमती अव्वाच्या सव्वा वाढल्या आहेत. दिल्लीहून लंडन हिथ्रोला जाणाऱ्या ‘नॉन-स्टॉप’ इकॉनॉमी क्लासच्या तिकिटाचा दर सध्या ₹१,४९,४७९ इतका झाला आहे. बिझनेस क्लासचे दर तर गगनाला भिडले असून ते ₹१,७९,३५४ पर्यंत पोहोचले आहेत. अगदी एका ठिकाणी stopover असलेल्या विमानांसाठीही, इकॉनॉमी क्लासचे दर ₹१,३२,३५३ पासून सुरू होत आहेत. पश्चिम आशियातील संघर्ष सुरू होण्यापूर्वी, दिल्ली-लंडन मार्गावरील इकॉनॉमी क्लासचे सरासरी तिकीट दर साधारणपणे ₹४५,००० ते ₹६५,००० च्या दरम्यान असायचे पण सध्याचे दर दुप्पटीपेक्षाही अधिक झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले

दिल्ली-दुबई हा विमान मार्ग आता पूर्वीसारखा सहज आणि परवडणारा राहिलेला नाही. ‘इंडिगो’च्या वेबसाईटवर चेक केलं तर स्पष्ट झालं की, दिल्ली-दुबई इकॉनॉमी क्लासचे तिकीट ₹२८,७६२ इतके झाले आहेत, तर बिझनेस क्लासचे दर ₹५५,८७९ पर्यंत पोहोचले आहेत. पश्चिम आशियातील तणाव वाढण्यापूर्वी, दिल्ली-दुबई मार्गावरील नेहमीचे तिकीट दर साधारणपणे ₹१२,००० ते ₹२०,००० च्या दरम्यान असायचे. इंडिगोच्या वेबसाईटवर, न्यूयॉर्क ते दिल्ली या मार्गावरील विमानांचे दर $२,३९० म्हणजेच सुमारे ₹२,०५,००० पासून सुरू होत आहेत. अगदी एका ठिकाणी थांबा असलेल्या विमानांसाठीही हेच दर लागू होत आहेत. दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानांची तिकिटे ₹१,२६,१८१ पासून सुरु होत आहेत, मात्र या प्रवासात दोन ठिकाणी थांबा घ्यावा लागतोय. सामान्य परिस्थितीत, दिल्ली-न्यूयॉर्क मार्गावरील तिकीट दर साधारणपणे ₹५५,००० ते ₹८०,००० च्या दरम्यान असायचे.

युरोपच्या दिशेने जाणाऱ्या विमानांचा प्रवास महागला; अनेक उड्डाणे रद्द

युरोपच्या दिशेने जाणाऱ्या विमान मार्गांवरील तिकीट दरांमध्ये मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या संघर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, ७०० हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. एव्हिएशन टर्बाइन इंधनाचे (ATF) दर प्रति बॅरल $८५–९० वरून झपाट्याने वाढत $१५०–२०० प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहे. ब्रेंट क्रूडचे दर, जे संघर्ष सुरू होण्यापूर्वी प्रति बॅरल $७२ होते, ते २६ मार्चपर्यंत वाढून $१०५ प्रति बॅरलवर पोहोचले. त्यामुळे एकंदरीत सगळी परिस्थिती पाहता युद्धाने सगळ्यांना पोळून काढलं आहे.

Todays Gold-Silver Price: सोनं पुन्हा चकाकलं, चांदीचे भाव स्थिर! आजचे दर वाचून तुम्हीही व्हाल हैराण

Web Title: Flight tickets more expensive following tensions in west asia for international flights skyrocketing marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • air travel
  • flight ticket
  • IndiGo
  • international news
  • iran

संबंधित बातम्या

Maharashtra Live breaking News in Marathi: आवाज घुमणार! कॉकरोच जनता पार्टीचा आज शिवार्जी पार्कात एल्गार
1

Maharashtra Live breaking News in Marathi: आवाज घुमणार! कॉकरोच जनता पार्टीचा आज शिवार्जी पार्कात एल्गार

Prakash Ambedkar : ‘सरकारचे परराष्ट्र धोरण अमेरिकेसमोर सरेंडर,’ प्रकाश आंबेडकरांचा घणाघात, मुंबईत वंचितकडून इराणच्या समर्थनार्थ जन
2

Prakash Ambedkar : ‘सरकारचे परराष्ट्र धोरण अमेरिकेसमोर सरेंडर,’ प्रकाश आंबेडकरांचा घणाघात, मुंबईत वंचितकडून इराणच्या समर्थनार्थ जन

Iran Trolls UN: इराण गॉट नो चिल! ‘या’ भन्नाट ‘शोले’मधील ‘ठाकूर’ च्या मीमने संयुक्त राष्ट्रांना सोशल मीडियावर केले जोरदार ट्रोल
3

Iran Trolls UN: इराण गॉट नो चिल! ‘या’ भन्नाट ‘शोले’मधील ‘ठाकूर’ च्या मीमने संयुक्त राष्ट्रांना सोशल मीडियावर केले जोरदार ट्रोल

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.