मुंबई : इलेक्ट्रिक वाहनांना अधिक पसंती मिळत आहे आणि म्हणूनच, ‘इलेक्ट्रिक मोबिलिटी इनोव्हेट फॉर इंडिया’ या थीमच्या अनुषंगाने यावर्षीचा एमजी डेव्हलपर प्रोग्राम स्टार्टअप्स, डेव्हलपर व इनोव्हेटर्ससाठी इनोव्हेशन प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करेल. हे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, फ्लीट मॅनेजमेंट, इलेक्ट्रिक घटक, इलेक्ट्रिक बॅटरी, ग्रीन एनर्जी सोल्यूशन्स, ईव्ही बॅटरी लाइफ सायकल मॅनेजमेंट, कनेक्टेड कार सोल्यूशन्स आणि बीएएएस यांसारख्या क्षेत्रांमध्ये सोल्यूशन्स आणि नाविन्यपूर्ण माहिती देईल, तसेच संपूर्ण ईव्ही इकोसिस्टममध्ये नवीन उपयेाजन आणि अनुभवांचा विकास सक्षम करेल.
या कार्यक्रमाने उद्योगातील विचारवंतांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मान्यवर होते स्टार्टअप इंडियाच्या प्रमुख श्रीम. आस्था ग्रोव्हर; एक्झीकॉमचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अनंत नाहटा; ऑटोमोटिव्ह रिसर्च अॅण्ड ट्रायबोलॉजी (सीएआरटी), आयआयटी दिल्लीच्या इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. बीके पाणिग्रही; कन्वर्जन्स एनर्जी सर्विस लिमिटेड (सीईएसएल)च्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महुआ आचार्य; मॅपमायइंडियाचे अध्यक्ष राकेश वर्मा; व्हिजन मेकॅट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राशि गुप्ता, इलेक्ट्रिक मोबिलिटी, जिओ-बीपी (रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड)चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप बंगिया आणि फोर्टम इंडियाचे अध्यक्ष संजय अग्रवाल.
एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, “एमजीडीपी सीझन ४ चे उद्दिष्ट देशभरातील ईव्ही नवोन्मेषकांसाठी सहकार्य आणि नवीन उपाय विकसित करण्याकरिता एक जागा निर्माण करून उद्योगात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे आहे. हे व्यासपीठ उद्योगातील सर्वोत्कृष्ट विचारवंतांना एकत्र आणण्याचा आणि ईव्ही लँडस्केप बदलण्याची क्षमता असलेल्या कल्पनांमध्ये नाविन्यता आणण्याचा प्रयत्न करते. आम्हाला आशा आहे की, या व्यासपीठामुळे उद्योगात अशाच प्रकारचे आणखी अनेक उपक्रम मार्गी लागतील, ज्यामुळे एक प्रभावी आणि ठोस ईव्ही-केंद्रित संवाद सुरू राहिल. आम्हाला विश्वास आहे की याद्वारे आम्ही एक अनुकूल वातावरण तयार करू शकू, जेथे प्रतिभा, नाविन्यता आणि तंत्रज्ञान या सर्वांचा एकत्रितपणे विकास होऊ शकतो.’’
एमजीडीपी हा कारमेकअरचा अद्वितीय उपक्रम आहे, जो मोबिलिटी विभागातील डेव्हलपर्सना उच्चस्तरीय मार्गदर्शन करत उदयोन्मुख तंत्रज्ञानांशी संलग्न राहण्यास प्रोत्साहित करण्याकरिता डिझाइन करण्यात आला आहे. हा उपक्रम उद्योगातील प्रमुख मार्गदर्शनपर उपक्रम म्हणून उदयास आला आहे, जो इनोव्हेटर्स आणि स्टार्टअप्सना प्रत्येकवेळी उत्साहवर्धक अनुभव देणाऱ्या नवोन्मेष्कारांसह ऑटो उद्योगाच्या भविष्याला उत्तम आकार देण्यासाठी एमजी आणि त्यांच्या समूह सहयोगींशी संलग्न होण्यास आवाहन करतो.