Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Voter ID online Application: मतदान कार्ड काढणे झाले आणखी सोपे! आता घरबसल्या करा ऑनलाईन अर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Voter ID online News: राज्यात महापालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. मतदानासाठी आवश्यक असलेले 'वोटर आयडी' आता आधार ई-साइन (e-Sign) द्वारे घरबसल्या ऑनलाईन मिळवता येईल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 25, 2025 | 05:33 PM
मतदान कार्ड काढणे झाले आणखी सोपे! आता घरबसल्या करा ऑनलाईन अर्ज (Photo Credit- X)

मतदान कार्ड काढणे झाले आणखी सोपे! आता घरबसल्या करा ऑनलाईन अर्ज (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • महापालिका निवडणुकांचा बिगूल वाजला!
  • १५ जानेवारीला मतदान
  • अद्याप नाव नसेल तर घरबसल्या ‘असे’ मिळवा मतदान कार्ड
How to get Voter ID online: राज्यातल्या महापालिकां निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. नुकत्याच राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या असुन त्याचे निकालही लागले आहे. आता महानगरपालिका निवडणुकींचा धुरळा उडणार आहे. त्यानुसार १५ जानेवारीला मतदान होणार आहे. तर लगेचच 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे ‘मतदान कार्ड’ (Voting Card) असणे अनिवार्य आहे.

मतदान कार्डाची प्रक्रिया सोपी

तुम्ही १८ वर्षे पूर्ण केली असतील किंवा तुमचे नाव अद्याप मतदार यादीत नसेल, तर आता काळजी करण्याची गरज नाही. भारत निवडणूक आयोगाने (ECI) मतदान कार्डाची प्रक्रिया पूर्णपणे बदलली असून आता आधार आधारित ‘ई-साइन’ (e-Sign) पद्धत अनिवार्य केली आहे. यामुळे बनावट अर्जांना चाप बसणार असून प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे.

काय आहे ‘ई-साइन’ पद्धत?

पूर्वी अर्ज केल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होण्यास वेळ लागायचा. आता नवीन पोर्टलवर अर्ज सादर करताना शेवटी तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओटीपी (OTP) येईल. हा ओटीपी टाकून तुम्ही तुमच्या अर्जावर ‘डिजिटल स्वाक्षरी’ (e-Sign) करू शकता. यामुळे कोणत्याही फिजिकल सहीची किंवा प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची गरज उरलेली नाही.

नव्याने नाव नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे:

फोटो: अलीकडचा पासपोर्ट साईज फोटो (2MB पेक्षा कमी).

वयाचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा जन्म दाखला.

पत्त्याचा पुरावा: आधार कार्ड, बँकेचे पासबुक, वीज बिल किंवा रेशन कार्ड.

हे देखील वाचा: December Deadline: ३१ डिसेंबरपूर्वी उरका ‘ही’ ३ महत्त्वाची कामे; अन्यथा १ जानेवारीपासून बसणार मोठा आर्थिक फटका

असा करा ऑनलाईन अर्ज (स्टेप-बाय-स्टेप):

१. पोर्टलवर नोंदणी करा

सर्वात आधी voters.eci.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. जर तुमचे खाते नसेल, तर ‘Sign Up’ वर क्लिक करून मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून रजिस्ट्रेशन करा.

२. फॉर्म ६ (Form 6) भरा

लॉगिन केल्यानंतर ‘New Voter Registration’ या पर्यायावर क्लिक करून ‘Form 6’ निवडा. यामध्ये तुमचे राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ अचूक निवडा.

३. वैयक्तिक माहिती

तुमचे नाव, वडिलांचे/पतीचे नाव आणि पत्ता मराठी व इंग्रजीमध्ये भरा. तुमचा फोटो आणि रहिवासी पुरावा (उदा. आधार कार्ड) पीडीएफ किंवा जेपीईजी फॉरमॅटमध्ये अपलोड करा.

४. आधार आणि ई-साइन

अर्जामध्ये ‘Aadhar Details’ निवडा आणि तुमचा आधार नंबर भरा. अर्ज सबमिट करण्यापूर्वी शेवटी ‘e-Sign and Submit’ हा पर्याय दिसेल. तिथे आधार लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून व्हेरिफाय करा.

५. रेफरन्स नंबर जतन करा

अर्ज पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक ‘Reference ID’ मिळेल. या नंबरद्वारे तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस ट्रॅक करू शकता.

हे देखील वाचा: Income Tax Return: तुमचा आयटीआर परतावा अद्याप आला नाही का? नसेल आला तर जाणून घ्या प्रक्रिया

मतदान कार्ड कधी आणि कसे मिळेल?

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर बीएलओ (BLO) द्वारे तुमच्या पत्त्याची पडताळणी केली जाईल. साधारण १० ते १५ दिवसांत तुमचे नाव मतदार यादीत समाविष्ट होईल आणि तुमचे नवीन डिजिटल मतदान कार्ड (EPIC) स्पीड पोस्टाद्वारे थेट तुमच्या घरी पाठवले जाईल. तसेच ही अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.

तुमचे जुने मतदान कार्ड हरवले असेल तर काळजी करू नका, तुम्ही ‘e-EPIC’ डाऊनलोड करू शकता:

  • पोर्टलवर ‘Download e-Voter Card’ या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा EPIC नंबर टाका आणि राज्य निवडा.
  • मोबाईलवर आलेला OTP टाकून तुमचे डिजिटल मतदान कार्ड डाऊनलोड करा. याची कलर प्रिंट सर्वत्र ग्राह्य धरली जाते.

Web Title: Getting your voter id card online from home has become easy learn the complete process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 05:32 PM

Topics:  

  • Election News
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: भाकरी फिरणार अन् MVA तुटणार? ‘हा’ पक्ष बाहेर पडणार? तिसरी आघाडी…
1

Maharashtra Politics: भाकरी फिरणार अन् MVA तुटणार? ‘हा’ पक्ष बाहेर पडणार? तिसरी आघाडी…

Nashik Politics: शिवसेनेतून हकालपट्टी अन् भाजपने प्रवेश रोखला? नाशिकच्या दोन दिग्गज नेत्यांची झाली गोची
2

Nashik Politics: शिवसेनेतून हकालपट्टी अन् भाजपने प्रवेश रोखला? नाशिकच्या दोन दिग्गज नेत्यांची झाली गोची

या संस्थानिकांचे करायचे काय? स्वतःच्या निवडणुकीला धावपळ, नेत्यांसाठी मात्र मरगळ
3

या संस्थानिकांचे करायचे काय? स्वतःच्या निवडणुकीला धावपळ, नेत्यांसाठी मात्र मरगळ

Pune Municipal Elections 2026: ना महायुती ना MVA, शरद पवार आणि अजित पवार पुन्हा स्थापणार NCP? बैठकीनंतर हालचालींना वेग
4

Pune Municipal Elections 2026: ना महायुती ना MVA, शरद पवार आणि अजित पवार पुन्हा स्थापणार NCP? बैठकीनंतर हालचालींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.