३१ डिसेंबरपूर्वी उरका 'ही' ३ महत्त्वाची कामे (Photo Credit- X)
कोणती आहेत ही ३ महत्त्वाची कामे:
१. वाहनांना HSRP नंबर प्लेट लावणे अनिवार्य
महाराष्ट्र परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या सर्व वाहनांना HSRP (High-Security Registration Plate) बसवणे अनिवार्य केले आहे. याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ आहे. जर नवीन वर्षात तुमच्या गाडीला ही नंबर प्लेट नसेल, तर वाहतूक पोलिसांकडून १,००० ते ५,००० रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो.
२. आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची संधी
केंद्र सरकारने पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत दिली आहे. १ जानेवारी २०२६ पासून तुमचे पॅन कार्ड ‘निष्क्रिय’ (Inactive) होईल. यामुळे बँकेचे व्यवहार करणे, नवीन खाते उघडणे किंवा आयटीआर फाइल करणे अशक्य होईल. पॅन पुन्हा सक्रिय करण्यासाठी १,००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त दंड भरावा लागू शकतो.
१. आयकर विभागाच्या e-Filing Portal वर जा.
२. तिथे ‘Link Aadhaar’ हा पर्याय निवडा.
३. पॅन आणि आधार नंबर टाकून व्हॅलिडेट करा.
४. मोबाईलवर आलेल्या OTP द्वारे पडताळणी पूर्ण करा.
लिंकिंग स्टेटस कसे तपासावे?
तुमचे पॅन-आधार आधीच लिंक आहे का, हे तपासण्यासाठी आयकर पोर्टलवर ‘Check Aadhaar Link Status’ या पर्यायावर क्लिक करून माहिती भरा. तिथे तुम्हाला तुमचे स्टेटस लगेच कळेल.
३. ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी e-KYC पूर्ण करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी शासनाने e-KYC पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण होणार नाही, त्यांचा दरमहा मिळणारा १,५०० रुपयांचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो. राज्यातील सुमारे ४० लाख महिलांचे केवायसी अद्याप प्रलंबित असल्याने प्रशासनाने हा इशारा दिला आहे.






