
मुंबईत 'या' दिवशी Global Economic Cooperation 2026 होणार
ही परिषद फ्युचर इकॉनॉमिक कोऑपरेशन कौन्सिल (FECC) यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असून, भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र सरकारच्या पाठबळाने हा उपक्रम राबवला जात आहे. FECC ही ना-नफा संस्था असून, जागतिक आर्थिक सहकार्याला चालना देणे हा तिचा मुख्य उद्देश आहे.
या परिषदेचे मुख्य प्रवर्तक म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत. तर भाजपचे परराष्ट्र व्यवहार प्रभारी विजय चौथाईवाले आणि विश्वामित्र रिसर्च फाउंडेशनच्या संस्थापक प्रियम गांधी-मोदी हे संचालक आणि क्युरेटर म्हणून भूमिका बजावणार आहेत.
जागतिक अर्थव्यवस्थेत होत असलेल्या संरचनात्मक बदलांच्या पार्श्वभूमीवर GEC 2026 ची रचना करण्यात आली आहे. जागतिक व्यापार, गुंतवणूक प्रवाह, आर्थिक प्रशासन, पायाभूत सुविधा, वित्तपुरवठा, प्रगत उत्पादन, तंत्रज्ञान प्रणाली, ऊर्जा संक्रमण आणि लवचिक पुरवठा साखळी यांसारख्या विषयांवर सखोल चर्चा या परिषदेत होणार आहेत.
या मंचावर आर्थिक कॉरिडॉर, गुंतवणूक भागीदारी, डिजिटल कनेक्टिव्हिटी, ESG फ्रेमवर्क आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यावर विशेष भर देण्यात येणार असून, हे घटक आज जागतिक आर्थिक स्थैर्य आणि आर्थिक सार्वभौमत्वाचे केंद्रबिंदू ठरत आहेत.
NCLAT Approves Adani Power Takeover: NCLAT ने दिली अदानी पॉवरला विदर्भ इंडस्ट्रीज अधिग्रहणाची मंजुरी
परिषदेच्या तिसऱ्या दिवशी इमर्जिंग लीडर्स सर्कलचे उद्घाटन होणार आहे. हे व्यासपीठ जागतिक आर्थिक बदल, नवसंशोधन आणि नेतृत्वावर लक्ष केंद्रित करणारे असून, तरुण व्यावसायिक आणि भावी नेत्यांसाठी खास पॅनेल चर्चा आयोजित केल्या जातील. हा उपक्रम IIM आणि कोलंबिया विद्यापीठ यांसारख्या आघाडीच्या शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने राबवला जाणार आहे.
GEC 2026 अशा जगाची संकल्पना मांडते, जिथे आर्थिक कॉरिडॉर हे सहकार्याचे माध्यम ठरतील आणि व्यापार, कनेक्टिव्हिटी व समावेशकतेतील न्याय्य प्रवेशातून शांती, समृद्धी आणि सामायिक प्रगती साधता येईल.
हा वार्षिक मंच पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स, बंदरे, स्वच्छ ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), फिनटेक आणि प्रगत उत्पादन क्षेत्रातील जागतिक नेते आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणणार आहे. पहिल्या आवृत्तीचा उद्देश जागतिक आर्थिक सहकार्यासाठी नव्या दृष्टिकोनांचा पाया घालणे हा आहे.