Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेत मोठा ट्विस्ट; समीर-अर्पिताच्या आयुष्यात येणार लग्नाचं नवं वळण

घरच्यांच्या सुखासाठी आणि कुटुंबाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी समीर आणि अर्पिता मनाविरुद्ध लग्न करण्यास तयार झाले आहेत, असा ट्विस्ट मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 06, 2026 | 06:36 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

सन मराठीवरील ‘तू अनोळखी तरी सोबती’ ही मालिका कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. मालिकेतील मुख्य पात्र समीर आणि अर्पिता यांच्या हळुवार फुलणाऱ्या मैत्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दोन अनोळखी लोक एकमेकांच्या आयुष्यात येणे आणि त्यांचा एकमेकांच्या सोबतीने होणारा प्रवास मालिकेत रंजकतेने दाखवला जातोय.सध्या अर्पिता आणि समीरची मैत्री घरातल्या इतरांना खटकत असल्यामुळे दोघेही एकमेकांशी बोलण्याचे टाळण्याचे ठरवतात. दरम्यान, अर्पिता आणि विराज, तसेच समीर आणि राजसी यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. घरच्यांच्या सुखासाठी आणि कुटुंबाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी समीर आणि अर्पिता मनाविरुद्ध लग्न करण्यास तयार झाले आहेत, असा ट्विस्ट मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामुळे मालिकेत नवीन नाट्यमय वळण येणार असून प्रेक्षकांच्या उत्सुकतेत वाढ झाली आहे.

नुकताच मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्यामध्ये लग्नाच्या तयारीची धामधूम दिसत आहे. रुखवताची तयारी, साड्यांचा बस्ता, पत्रिका अशा सगळ्या गोष्टींची लगबग सुरू असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. पण या लग्नामुळे अर्पिता खरंच आनंदी आहे का? नेहमीच घरच्यांचा विचार करणाऱ्या अर्पिताच्या नशिबात नक्की काय लिहिलं आहे? नियती अर्पितासाठी नेमकं काय ठरवणार?

Karanvir Bohra Father Death: ‘मी इथे सगळं सांभाळेन’, वडिलांच्या निधनानंतर बॉलीवूड अभिनेत्याची भावुक पोस्ट

मालिकेत अर्पिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री योगिता चव्हाण याबद्दल म्हणाली की, “मालिकेत खूप मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या अर्पिताचं लग्न पार पडणार आहे. स्वतःच सुख कशात आहे हे माहिती असूनही अर्पिता फक्त कुटुंबाचा विचार करते, त्यांचा आनंद पाहते. अश्या बऱ्याच मुली असतात ज्या स्वतःच्या मनाविरुद्ध कुटुंबाच्या सुखासाठी लग्नासाठी तयार होतात. पण आता अर्पितासाठी नियतीने काय ठरवलंय हे येत्या ८ मार्चला प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सध्या मालिकेच्या सेटवर प्रचंड आनंदच वातावरण, लगबग, लग्नाची तयारी सुरु आहे. त्यामुळे शूटिंग करताना आम्ही सगळे खूप धमाल करतोय. लग्नसोहळा मालिकेत दिसताना सुंदर वाटतो. पण त्या मागे खूप मेहनत असते. यासाठी मालिकेची टीम दिवसरात्र काम करत आहे.ही लग्नसराई संपूर्ण आठवडाभर सुरु असणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना अर्पिता म्हणून मी आग्रहाचं आमंत्रण देतेय. प्रेक्षकांशिवाय हे लग्न पार पडू शकत नाही.”

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस’ मराठीच्या घरात ‘जुली-खुली मंजुलिका’ ची टक्कर; नव्या Promo ने वाढला TRP

Web Title: Big twist in tu anolakhi tari sobati a wedding turn awaits in sameer and arpitas lives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi News
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Mohini marathi Serial: RK-मोहिनीच्या प्रेमकहाणीत नवा ट्विस्ट; रिसेप्शनमध्ये दीपाची एन्ट्री, पुराव्यांवरून होणार गोंधळ
1

Mohini marathi Serial: RK-मोहिनीच्या प्रेमकहाणीत नवा ट्विस्ट; रिसेप्शनमध्ये दीपाची एन्ट्री, पुराव्यांवरून होणार गोंधळ

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
2

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही
3

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
4

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.