
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कंपनीने गेल्या दोन वर्षांत सरासरी १४ टक्के वाढ नोंदवली असून, याच कालावधीत निर्यातीमध्ये वार्षिक १९ टक्के वाढ झाली आहे. यावरून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील कंपनीचे भक्कम स्थान अधोरेखित होते.
गेल्या दोन वर्षांत देशांतर्गत व्यवसायाची वाढ जरी एक अंकी दराने झाली असली, तरी ‘फनस्कूल’ला ‘फनडो’ (कणिक) आणि ‘हँडीक्राफ्ट्स’ (कला व हस्तकला) यांसारख्या प्रमुख श्रेणींमध्ये उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे.
फनस्कूल इंडिया लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) के. ए. शबीर म्हणाले, “गेल्या वर्षी अमेरिकेने लादलेल्या शुल्कांमुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर आम्ही यशस्वीपणे मात केली आणि निर्यात तसेच देशांतर्गत व्यवसायाची वाढ कायम राखली. पश्चिम आशियातील सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सध्या १२ ते १५ टक्के मध्यम वाढीचा अंदाज धरून काम करत आहोत. परिस्थिती स्थिर झाल्यानंतर पहिल्या तिमाहीनंतर (Q1) आमच्या उद्दिष्टांचा फेरआढावा घेण्याची योजना आहे.
शबीर यांनी पुढे स्पष्ट केलं, “गेल्या वर्षभरात आम्ही ‘स्पिन मास्टर’ (कॅनडा), ‘मूस टॉईज’ (ऑस्ट्रेलिया), ‘मेलिसा अँड डग’ (अमेरिका) आणि ‘ॲस्मोडी’ (फ्रान्स) यांसारख्या जागतिक कंपन्यांसोबतच्या भागीदाऱ्या अधिक दृढ केल्या आहेत. तसेच ‘लर्निंग रिसोर्सेस’ आणि ‘बफेलो गेम्स’ (अमेरिका) यांच्याशी नवीन भागीदाऱ्या प्रस्थापित केल्या आहेत. गोवा येथील आमच्या प्रकल्पाचा विस्तार सध्या सुरू असून, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस तो पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.”