Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!

Baramati News : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बारामती-निरा मार्गावरील शारदानगर ते राजहंस चौकदरम्यान सोमवार सकाळी ७ ते मंगळवार सकाळी ७ वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. वाहनचालकांनी के. व्ही. के. ट्रस्ट कॅनॉल रोड आणि पाहुणेवाडी मार्गाचा पर्यायी रस्ता म्हणून वापर करावा,असे आवाहन करण्यात आले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 11, 2026 | 08:41 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे विशेष नियोजन
  • शारदानगर ते राजहंस चौक मार्गावर २४ तास बंदी
  • वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर
Baramati News :श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बारामती परिसरातील वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. माळेगाव बुद्रुक येथील मतमोजणी केंद्रावर सोमवार (दि. १२) रोजी मतमोजणी होणार असल्याने माळेगाव पोलिसांनी विशेष वाहतूक नियोजन केले आहे.

त्यानुसार बारामती-निरा मार्गावरील शारदानगर ते माळेगाव राजहंस चौक या दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना २४ तास प्रवेशबंदी असणार आहे. सोमवार सकाळी ७ वाजल्यापासून मंगळवार सकाळी ७ वाजेपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे विशेष नियोजन

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, सोमेश्वरनगरच्या सन २०२६ च्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील मतमोजणी केंद्रावर होणार आहे. या प्रक्रियेसाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, उमेदवार, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या परिसरात वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. तसेच अपघात आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. माळेगाव पोलिसांकडून या काळात वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

Pune MLC Election : पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी भाजपचा शड्डू! रविंद्र चव्हाण मैदानात

शारदानगर ते राजहंस चौक मार्गावर २४ तास बंदी

वाहतूक नियोजनानुसार, सोमवार (दि. १२) सकाळी ७ वाजल्यापासून मंगळवार (दि. १३) सकाळी ७ वाजेपर्यंत बारामती-निरा मार्गावरील शारदानगर ते माळेगाव राजहंस चौक या दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे. या कालावधीत या मार्गावरून वाहनचालकांना प्रवास करता येणार नाही.

मात्र, शासकीय वाहने आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना या बंदीतून वगळण्यात आले आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी, तसेच परिसरातील वाहतुकीचे व्यवस्थापन योग्य प्रकारे व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्यास उद्याचे आंदोलन महागात पडेल; आमदार रोहित पवारांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे. त्यानुसार शारदानगर येथून के. व्ही. के. ट्रस्ट कॅनॉल रोडने माळेगाव राजहंस चौकात जाता येणार आहे. तसेच राजहंस चौक ते माळेगाव कारखाना मार्गे पाहुणेवाडी-शारदानगर-बारामती या पर्यायी मार्गाचा वापर करता येणार आहे.

या मार्गांवरून सर्व प्रकारची वाहने वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतूक बदलांची माहिती घ्यावी आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि माळेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Baramati news traffic disrupted due to vote counting at someshwar sugar factory the route from shardanagar to rajhans chowk is closedplease use alternative roadscp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 08:40 PM

Topics:  

  • baramati news
  • Marathi News
  • Traffic Issue

संबंधित बातम्या

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली
1

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ
2

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

India Business News : अंबानींच्या जिओला मस्क यांचे थेट आव्हान; भारतात स्वस्त स्टारलिंक आणण्याची तयारी!
3

India Business News : अंबानींच्या जिओला मस्क यांचे थेट आव्हान; भारतात स्वस्त स्टारलिंक आणण्याची तयारी!

Russia-Ukraine News : ट्रम्प यांची झेलेन्स्की यांना खुर्ची सोडण्याची सूचना; ‘आमचा नेता आम्हीच ठरवणार!’
4

Russia-Ukraine News : ट्रम्प यांची झेलेन्स्की यांना खुर्ची सोडण्याची सूचना; ‘आमचा नेता आम्हीच ठरवणार!’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.