Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’

Paris Youth in Mumbai: पॅरिसमधील आरामदायी जीवन सोडून भारतात आलेल्या 23 वर्षीय निकोला मुंबईत राहून अवघे तीन आठवडे झाले आहेत. फायनान्स क्षेत्रात करिअर करण्याच्या उद्देशाने भारतात आलेल्या निकोला मुंबईतील गर्दी, गोंधळ आणि वेगवान जीवनशैलीचा सुरुवातीला अनुभव आला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 12, 2026 | 11:04 AM
Paris Youth in Mumbai: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Paris Youth in Mumbai: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 23 वर्षीय निको फायनान्स क्षेत्रात करिअर करण्यासाठी भारतात आला.
  • मुंबईतील गर्दी, गोंधळ आणि ऊर्जेने त्याच्या विचारांमध्ये बदल घडवला.
  • भारतीय खाद्यपदार्थांची विविधता आणि चव त्याला आवडली.
  • सुरुवातीला भीती वाटणारे शहर आता त्याला आपलेसे वाटू लागले आहे.
एखादा माणूस शांत, शिस्तबद्ध असलेल्या युरोपियन शहरात वाढला आणि थेट मुंबईच्या गर्दीत येऊन पडला तर त्याची काय हालत होईल? असाच काहीसा अनुभव पॅरिसहून आलेल्या 23 वर्षाच्या निकोला आला आहे. निको पॅरिसमधली आरामाची लाईफ सोडून भारतात आला. डोक्यात एकच होते की फायनान्समध्ये चांगले करिअर करायचे. पण मुंबईत पाऊल ठेवताच त्याचे सगळे विचारच बदलून गेले. इथली एनर्जी, गर्दी, गोंधळ याने त्याचे आयुष्यच बदलले. Paris Youth in Mumbai:

हा अनुभव सोशल मीडियावर शेअर

मुंबईत येऊन त्याला फक्त तीन आठवडे झाले आहेत, पण एवढ्या कमी दिवसात मुंबईने त्याला असे धडे दिले जे पॅरिसच्या कोणत्याही मोठ्या कॉलेजमध्ये शिकायला मिळाले नसते. त्याने त्याचा हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला त्यांने आपले अनुभव कॅप्शनमध्ये सांगितला आहे.

निकोल कॅप्शनमध्ये लिहितो की,

१. येथील खाद्यपदार्थ किती अप्रतिम आहेत.

भारतीय जेवण चविष्ट असते हे मला माहीत होते, पण त्यातील वैविध्य किती प्रचंड आहे आणि दररोज काहीतरी नवीन शोधण्यात मला किती आनंद मिळेल, याची मला कल्पना नव्हती. तसेच इथला तिखटपणा सहज सहन करण्यासारखा आहे.

२. लोकांना भेटणे किती सोपे आहे.

येथे आल्यावर माझी कोणाशीच ओळख नव्हती, पण येथील लोकांनी माझे खूप स्वागत केले आणि ते माझ्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक होते. कामाच्या ठिकाणी असो, बाहेर फिरताना असो किंवा शहराचा शोध घेताना. नेहमीच कोणीतरी नवीन व्यक्ती भेटते.

३. पाहण्यासारख्या आणि शोधण्यासारख्या किती गोष्टी आहेत.

केवळ मुंबईच इतकी विशाल वाटते की ती कधीच संपणार नाही असे वाटते. नवीन परिसर, रेस्टॉरंट्स, समुद्रकिनारे, बाजारपेठा, सण-उत्सव, वास्तुकला, नाईटलाइफ… प्रत्येक आठवड्याच्या शेवटी मला बाहेर पडण्याचे आणि नवीन काहीतरी शोधण्याचे एक नवीन कारण मिळते.

येथे येऊन तीन आठवडे झाले आहेत आणि या नवीन प्रवासातील मला सर्वात जास्त आवडलेल्या गोष्टी कदाचित या आहेत. यात काहीच शंका नाही की, पुढे अजून खूप काही अनुभवता येणार आहे. निकोलने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

पॅरिस सोडून मुंबईत का आलास?

निकोलच्या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रश्न विचारले की, एवढे सुंदर पॅरिस सोडून तू मुंबईत का आलास?त्यावर निकोने सांगितले की मला फक्त पगारासाठी भारतात यायचे नव्हते. मला भारताची संस्कृती, इथली माणसे जवळून बघायची होती. इथे भाषा येत नाही, गर्दी, त्रास आहे, पण तरीही हे शहर जितका त्रास देते त्यापेक्षा जास्त प्रेम पण देते. सुरुवातीला त्याला या शहराची भीती वाटत होती, पण आता हेच शहर त्याला आपले वाटायला लागले. आता तो पूर्णपणे मुंबईकर होऊन या शहराच्या गर्दीत मिसळून गेला आहे. निकोची ही स्टोरी अनेकांना आपलीच वाटते, कारण जो कोणी बाहेरून मुंबईत येतो त्याचा अनुभव असाच असतो.

Web Title: Paris youth nico mumbai experience three weeks rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • Marathi News
  • Mumbai News
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Mumbai News: ‘झोपु’ कायद्याचा घेतला आढावा! उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या पहिल्या बैठकीत प्रक्रियेला गती देण्याचे धोरण
1

Mumbai News: ‘झोपु’ कायद्याचा घेतला आढावा! उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या पहिल्या बैठकीत प्रक्रियेला गती देण्याचे धोरण

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली
2

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ
3

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!
4

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.