Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gold Price Hike : साडेतीन महिन्यांच्या उच्चांकावर सोनं! तेजी कायम राहण्याची शक्यता, ऐन सणासुदीच्या तोंडावर भाव आणखी वाढणार?

Gold Price Hike : आगामी सणासुदीचा काळ जवळ येत असतानाच सोन्याच्या दरात जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या सोन्याने साडेतीन महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. जागतिक घडामोडी, अमेरिकन डॉलरमधील चढ-उतार आणि मध्यवर्ती बँकांची खरेदी या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. भारतातील सणासुदीच्या काळात दागिन्यांची वाढती मागणी महत्त्वाची ठरते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 24, 2026 | 05:30 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • साडेतीन महिन्यांच्या उच्चांकावर सोनं!
  • तेजी कायम राहण्याची शक्यता
  • ऐन सणासुदीच्या तोंडावर भाव आणखी वाढणार?
Gold Price Hike : सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. सोन्याच्या दरात अलीकडे लक्षणीय वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर, १४ मे नंतर प्रथमच प्रति औंस ४,७०० डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. डॉलरचे अवमूल्यन आणि चीनची खरेदी यांसारख्या अनेक घटकांनी सोन्याच्या दरातील या वाढीस हातभार लावला असल्याचं बोललं जात आहे. ( Gold Price Hike ) 

Foreign Direct Investment : सरकारचा मास्टस्ट्रोक! भारतात 4895 कोटींची परदेशी गुंतवणूक; FDI नियमांमधील बदलामुळे फायदा?

हे घटक कारणीभूत

आता आगामी सणासुदीचा काळ जसजसा जवळ येत आहे तसतशी सोन्याच्या दरातही तेजी पाहायला मिळणार आहे. आजचा आकडा हा मागील साडेतीन महिन्यांतील दरांमधील उच्चांक आकडा आहे. जागतिक स्तरावर सुरु असलेल्या घडामोडींचा परिणाम नेहमीच सोन्याच्या दरांवर दिसून येतो. त्याचबरोबर अमेरिकन डॉलरमधील चढ-उतार आणि मध्यवर्ती बँकांची खरेदी यांचाही मोठा परिणाम सोन्याच्या दरात दिसून येतो. आता भारतातील सणासुदीच्या काळात दागिन्यांना मिळणारी वाढती मागणी या तेजीला मोठा आधार देत आहे. यासगळ्याबाबत तज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

सोन्याच्या किमती आणखी जोर धरणार

काम ज्वेलरीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक कॉलिन शाह यांनी सोन्याच्या सध्याच्या कामगिरीबाबत बोलताना त्यांनी सध्याची परिस्थिती आणि कारणीभूत घटकांबाबत सांगितलं. सोन्याच्या किमती आणखी जोर धरणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

या घटकांचा दराच्या दिशेवर राहणार प्रभाव

सोन्याच्या सध्याच्या वर्तवणूकीबाबत बोलताना कॉलिन शाह म्हणाले, “सोन्याच्या दरातील तीव्र तेजी ही बदलत्या जागतिक आर्थिक परिस्थितीत सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून सोन्याचे असलेले महत्त्व अधोरेखित करते. यापूर्वी सोन्याच्या दरातील तेजीला अडथळा ठरलेल्या काही घटकांमध्ये बदल झाल्याने सध्याच्या तेजीला मोठा वेग मिळाला आहे. आगामी काळात अमेरिकेतील महागाईची आकडेवारी, डॉलरची हालचाल आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाबाबतची स्पष्टता यांचा सोन्याच्या दराच्या दिशेवर प्रभाव राहणार आहे. मात्र, मध्यम कालावधीत सोन्याला भक्कम आधार मिळत राहण्याची अपेक्षा आहे.”

ग्राहकांचा ओघ कशाकडे?

ग्राहकांच्या ओघाबाबत बोलताना त्यांनी पुढे स्पष्ट केलं की,“भारतात सोन्याच्या वाढलेल्या किमतींमुळे ग्राहक आपल्या खरेदीबाबत अधिक मूल्यकेंद्री आणि नियोजनबद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांकडून दागिन्यांची खरेदी पूर्णपणे कमी होण्याऐवजी हलके, आकर्षक डिझाइन असलेले आणि अधिक मूल्य देणारे दागिने खरेदी करण्याला प्राधान्य मिळू शकते. आगामी सणासुदीचा आणि लग्नसराईचा काळ दागिन्यांच्या मागणीला आधार देत राहील. भारतीय संस्कृतीत सोने हे उत्सवाबरोबरच दीर्घकालीन संपत्ती जतन करण्याचे साधन म्हणूनही महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी सांगितले.

मात्र, सोन्याच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीनंतर अल्पावधीत दरात स्थिरता किंवा चढ-उतार पाहायला मिळू शकतात, विशेषतः बदलत्या भूराजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, असेही शाह यांनी नमूद केले.

Online Onion Price : कांद्याचे भाव वाढले? ऑनलाईन मागवताना ‘या’ ॲपवर मिळेल चांगली ऑफर; Blinkit आणि Zepto मध्ये किती फरक?

Web Title: Gold price hike 3 half month high reasons behind surge ahead of festive season

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • Gold Price
  • Price Hike

संबंधित बातम्या

Gold Silver दर आणखी कडाडणार? GST दरांबाबत होणार मोठा निर्णय;  काय नेमकं संपूर्ण प्रकरण?
1

Gold Silver दर आणखी कडाडणार? GST दरांबाबत होणार मोठा निर्णय; काय नेमकं संपूर्ण प्रकरण?

CNG PNG Price Hike : आता CNG, PNG देखील महागणार… सरकारने नैसर्गिक वायूचे दर वाढवले! खिशावर किती पडणार भार?
2

CNG PNG Price Hike : आता CNG, PNG देखील महागणार… सरकारने नैसर्गिक वायूचे दर वाढवले! खिशावर किती पडणार भार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.