Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gold Silver दर आणखी कडाडणार? GST दरांबाबत होणार मोठा निर्णय; काय नेमकं संपूर्ण प्रकरण?

Gold Silver Price Hike : सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीच्या खरेदीवर GST चे दर बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने सोने आणखी महागण्याचे संकेत मिळत आहेत. GST Council आगामी बैठकीत सोने-चांदीवरील कररचनेत महत्त्वाचे बदल प्रस्तावित केले जाऊ शकतात याचा परिणाम थेट सोने चांदीच्या दरांवर होण्याची शक्यता आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 05, 2026 | 12:21 PM
Gold Silver दर आणखी कडाडणार? ( सौजन्य - सोशल मीडिया )

Gold Silver दर आणखी कडाडणार? ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • Gold Silver दर आणखी कडाडणार?
  • GST दरांबाबत होणार मोठा निर्णय
  • काय नेमकं पूर्ण प्रकरण?
Gold Silver Price Hike : जागतिक बाजारात सुरु असलेली हालचाल पाहता सध्या सोन्या चांदीच्या दरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर हालचाल दिसून येत आहे. येत्या काही दिवसांमध्ये आणखी मोठे बदल दिसून येऊ शकतात. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ७ ऑक्टोबर कारण यादिवशी GST परिषदेची बैठक आहे. यावेळी बँका आणि सरकारने नियुक्त केलेल्या संस्थांना सोने, चांदी आणि प्लॅटिनमबाबत मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे. नेमकी काय आहे ही चर्चा आणि याचा सोने चांदीच्या दराशी काय संबंध? ( Gold Silver Price Hike )

होणार 3 लाखांचं नुकसान? 8th Pay Commission लागू होण्यास उशीर झाला तर बसणार फटका; पण कसा? जाणून घ्या

GST परिषदेच्या बैठकीत आयातीवर मिळणारी IGST सवलत रद्द करण्याच्या प्रस्तावार चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. सध्या या धातूंच्या आयातीवर 3% IGST आकरला जातो. पण काही बँका आणि नियुक्त संस्थांना यातून सूट आहे. जर हा चर्चीत प्रस्ताव मंजूर झाला, तर या संस्थांनाही आयातीवर 3% GSTभरावा लागेल. पण याचा अर्थ असा नाही की दुकानांमधील सोने आणि चांदीच्या किमती दुसऱ्या दिवसापासून ३ टक्क्यांनी वाढतील. पण याचा काही प्रमाणात परिणाम दिसून येणार. पण नेमका कसा?

सध्या नेमके नियम काय आहेत?

सध्या, सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या आयातीवर ३% GST आकारला जातो. पण सरकारने नियुक्त केलेल्या बँका आणि नियुक्त संस्थांना या करातून सूट देण्यात आली आहे. ही सूट २०१७ मध्ये देण्यात आली होती, जेव्हा मौल्यवान धातूंची आयात आणि व्यापार अधिक नियमबद्ध प्रणालीअंतर्गत केला जात होता. सरकार आता ही प्रणाली बदलण्याचा विचार करत आहे.

या प्रस्तावाच्या उद्दिष्टांपैकी एक म्हणजे बँका, नियुक्त संस्था आणि सराफा बाजारांसाठी एकसमान करप्रणाली सुनिश्चित करणे हा आहे. याचा अर्थ असा की, व्यापाराचे मार्ग वेगवेगळे असले तरी, कर आकारणीमध्ये अधिक एकसमानता साधता येईल.

सरकार सूट रद्द करण्याच्या तयारीत का?

या सगळ्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे सोने आणि चांदीच्या आयातीमुळे देशाबाहेर जाणारा परकीय चलन साठा. भारतात सोन्याला मोठी मागणी आहे आणि यातील मोठा भाग आयातीद्वारे पूर्ण केला जातो. आकडेवारीनुसार, एप्रिल ते ऑगस्ट २०२६ दरम्यान भारताची सोन्याची आयात ३.३८ टक्क्यांनी वाढून १७.४७ अब्ज डॉलर झाली. दरम्यान, याच काळात चांदीची आयात ८.८१ टक्क्यांनी घटून १.७४ अब्ज डॉलर झाली. रुपयावर दबाव असताना सरकार मौल्यवान धातूंच्या आयातीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जास्त आयातीमुळे डॉलरची मागणी वाढू शकते आणि परकीय चलनाचा वापर वाढू शकतो.

सोने अधिक महाग होईल का?

जर IGST सूट रद्द झाली, तर आयात करणाऱ्या बँका आणि नियुक्त एजन्सींचा खर्च वाढू शकतो. याचा पुरवठा साखळी आणि किमतींवर दीर्घकाळात काही परिणाम होऊ शकतो. पण सोन्याच्या किमती केवळ ३ टक्क्यांनी वाढतील याची शक्यता कमी आहे. सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय किमती, डॉलर-रुपया विनिमय दर, आयात शुल्क, देशांतर्गत मागणी आणि बाजाराची परिस्थिती यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे, जरी प्रस्तावाला मंजुरी मिळाली तरी, बाजारावर होणाऱ्या त्याच्या परिणामाची व्याप्ती आणि गती या सर्व घटकांवर अवलंबून असेल.

कर आधीच वाढवण्यात आला आहे का?

सोन्या-चांदीची आयात कमी करण्यासाठी सरकारने आधीच पावले उचलली आहेत. मे २०२६ मध्ये, सोन्या-चांदीवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले, तर प्लॅटिनमवरील शुल्क ६.४ टक्क्यांवरून १५.४ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले.

CNG PNG Price Hike : आता CNG, PNG देखील महागणार… सरकारने नैसर्गिक वायूचे दर वाढवले! खिशावर किती पडणार भार?

Web Title: Gold silver price hike expected due to gst decision marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 12:21 PM

Topics:  

  • Gold Price
  • Gold-Silver Rate
  • Price Hike

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात किंचीत घसरण, 24 कॅरेट खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे
1

Todays Gold-Silver Price: ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात किंचीत घसरण, 24 कॅरेट खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

CNG PNG Price Hike : आता CNG, PNG देखील महागणार… सरकारने नैसर्गिक वायूचे दर वाढवले! खिशावर किती पडणार भार?
2

CNG PNG Price Hike : आता CNG, PNG देखील महागणार… सरकारने नैसर्गिक वायूचे दर वाढवले! खिशावर किती पडणार भार?

Todays Gold-Silver Price: सोन्याची चमक झाली कमी, चांदीचे भाव वाढले! जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती
3

Todays Gold-Silver Price: सोन्याची चमक झाली कमी, चांदीचे भाव वाढले! जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती

Petrol Diesel Price Hike : मोठा झटका… अचानक वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव! पेट्रोल ₹5 रुपयांनी तर डिझेल ₹3 रुपयांनी महाग
4

Petrol Diesel Price Hike : मोठा झटका… अचानक वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव! पेट्रोल ₹5 रुपयांनी तर डिझेल ₹3 रुपयांनी महाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.