Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : लग्नसराईत सोने-चांदीचे भाव ‘धडाम; परिणाम लग्नसराईतील खरेदीवर

Nagpur News : लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोने प्रति १० ग्रॅम १,२४,५०० रुपये, तर चांदी प्रति किलो १,५५,१०० रुपयांवर आली आहे. मात्र, जुन्या दराने खरेदी केलेल्या साठ्याचे मूल्य घटल्याने सराफा व्यावसायिकांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 21, 2026 | 03:52 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • सोन्याच्या दरात सलग पाचव्या दिवशी घसरण
  • जुन्या साठ्यामुळे सराफा व्यावसायिकांची चिंता
  • विक्रमी दरापासून सोन्या-चांदीची मोठी घसरण
Nagpur News  : लग्नसराईचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विक्रमी महागाईमुळे सोन्याच्या खरेदीपासून दूर राहिलेल्या ग्राहकांना आता दागिने खरेदीची संधी मिळाली आहे.

सोने चौदा महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचले असून सराफा बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढू लागली आहे. मात्र, दरातील या घसरणीमुळे ग्राहक आनंदात असले तरी सराफा व्यावसायिकांसमोर जुन्या साठ्याच्या मूल्यांकनाचे नवे आव्हान उभे राहिले आहे.

सोन्याच्या दरात सलग पाचव्या दिवशी घसरण

देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी सलग पाचव्या दिवशी सोन्याचे दर कमी झाले. प्रति १० ग्रॅम सोन्याच्या किमतीत तब्बल ६,८०० रुपयांची घट होऊन भाव १,२४,५०० रुपयांवर आला. यापूर्वी हाच दर १,३१,३०० रुपये होता. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली.

प्रति किलो चांदीचा भाव १०,५०० रुपयांनी कमी होऊन १,५५,१०० रुपयांवर आला. मागील सत्रात चांदी १,६५,६०० रुपये प्रति किलो होती. या घसरणीमुळे बाजारात खरेदीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

Nagpur News : अधिवेशनापूर्वी अवैध होर्डिंग्जवर मनपाचा बडगा; विशेष मोहीम राबवणार

जुन्या साठ्यामुळे सराफा व्यावसायिकांची चिंता

सोन्याच्या दरातील घसरण ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत असली तरी दागिने व्यावसायिकांसाठी ती चिंतेचा विषय बनली आहे. सराफा व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा असतो. हा साठा आधीच्या महाग दराने खरेदी केलेला असतो. मात्र, बाजारभाव अचानक कमी झाल्यामुळे जुन्या साठ्याचे मूल्य घटते.

त्यामुळे सध्याच्या कमी दरात दागिन्यांची विक्री करताना व्यावसायिकांच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ग्राहकांची वाढती गर्दी आणि जुन्या मालाचे कमी झालेले मूल्य अशा दुहेरी परिस्थितीचा सामना सराफा बाजाराला करावा लागत आहे.

Nagpur News : ईडीकडून रेती माफियांची १६ कोटींची मालमत्ता जप्त; नागपूर-भंडाऱ्यात मोठी कारवाई

विक्रमी दरापासून सोन्या-चांदीची मोठी घसरण

जानेवारी महिन्यात सोन्याने प्रति १० ग्रॅम १,८३,००० रुपयांचा विक्रमी टप्पा गाठला होता. मात्र, त्यानंतर आतापर्यंत सोन्याच्या दरात सुमारे ५८,५०० रुपयांची घसरण झाली आहे. सध्या सोने १.२४ लाख रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. दुसरीकडे, चांदीनेही जानेवारीमध्ये प्रति किलो ४,११,००० रुपयांचा विक्रमी भाव गाठला होता.

त्यानंतर अकरा महिन्यांत चांदी तब्बल २,५५,९०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. सध्या चांदीचा भाव १,५५,१०० रुपयांवर आला आहे. त्यामुळे लग्नसराईत दागिने खरेदीचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Gold silver price fall wedding season relief cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • Gold Price
  • Marathi News
  • Nagpur News
  • Silver Price Today

संबंधित बातम्या

Nagpur News : अधिवेशनापूर्वी अवैध होर्डिंग्जवर मनपाचा बडगा; विशेष मोहीम राबवणार
1

Nagpur News : अधिवेशनापूर्वी अवैध होर्डिंग्जवर मनपाचा बडगा; विशेष मोहीम राबवणार

Nav Bharat Saaksharta Karyakram: शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक यश! देशाचा साक्षरता दर ८१.१ टक्क्यांवर; शर्यतीत ‘ही’ राज्ये आघाडीवर
2

Nav Bharat Saaksharta Karyakram: शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक यश! देशाचा साक्षरता दर ८१.१ टक्क्यांवर; शर्यतीत ‘ही’ राज्ये आघाडीवर

NCP Politics: फडणवीसांवरील आरोपांवर आदिती तटकरे यांनी सोडलं मौन; नेमकं काय म्हणाल्या? जाणून घ्या
3

NCP Politics: फडणवीसांवरील आरोपांवर आदिती तटकरे यांनी सोडलं मौन; नेमकं काय म्हणाल्या? जाणून घ्या

Raigad News: पेणच्या खारेपाटात पाणीटंचाई तीव्र; चार दिवसांतून एकदाच नळाला पाणी, नागरिक त्रस्त
4

Raigad News: पेणच्या खारेपाटात पाणीटंचाई तीव्र; चार दिवसांतून एकदाच नळाला पाणी, नागरिक त्रस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.