Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

HDFC Bank New CEO : एचडीएफसी बँकेला लवकरच मिळणार नवा सीईओ! शशीधर जगदीशन यांनी पुन्हा पद स्वीकारण्यास दिला नकार

HDFC Bank New CEO : देशामधील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेमध्ये मोठ्या नेतृत्त्व बदल होणार आहे. बँकेचे CEO शशीधर जगदीशन यांनी पुनर्नियुक्तीचा प्रस्ताव नाकार दिला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 30, 2026 | 12:25 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • एचडीएफसी बँकेला लवकरच मिळणार नवा सीईओ!
  • शशीधर जगदीशन यांनी पुन्हा पद स्वीकारण्यास दिला नकार
  • २६ ऑक्टोबरला होणार रिटायर
HDFC Bank New CEO : देशातील खाजगी क्षेत्रातली सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC बँकेबाबत मोठी बातमी समोर येत आहे. नुकतीच या बँकेमध्ये मोठ्या नेतृत्व बदलाची चिन्हे दिसू लागली आहेत. बँकेचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकार म्हणजे MD & CEO शशीधर जगदीधन यांनी पुनर्नियुक्तीचा प्रस्ताव नकारला आहे. बँकेने शनिवारी शेअर बाजारांना याबाबत माहिती दिली आहे. बँक नेमकं काय म्हणाली? त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार ? त्याचा काय परिणाम होणार सविस्तर जाणून घेऊयात. ( HDFC Bank New CEO ) 

Union Mutual Fund : ‘तुक्का नही, तरक्की चाहिये!’ युनियन म्युच्युअल फंडकडून गुंतवणूकदार जागृती मोहिमेची सुरुवात

बँकेने शशीधर जगदीधन यांच्या निर्णयाबाबत सांगताना पुढे म्हटले आहे की, बँकेचे संचालक मंडळ शशीधर जगदीशन यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या निवड आणि नियुक्तीची प्रक्रिया निर्धारित वेळेत वेगाने पूर्ण करेल.

२६ ऑक्टोबरला होणार रिटायर

जगदीशन २६ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. ६१ वर्षीय जगदीशन १९९६ मध्ये ते फाइनान्स डिवीजन म्हणून बँकेत रुजू झाले होते त्यांनतर १९९९ मध्ये ते फाइनान्स हेड बनले. त्यानंतर, २००८ मध्ये त्यांची एचडीएफसी बँकेचे चीफ फाइनानशियल ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली.

बँकेने काय म्हटले?

बँकेने याबाबत म्हटलंय की, जगदीशन यांनी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीसाठी अर्ज न करण्याचा आपला निर्णय कळवला होता. त्यानंतर संचालक मंडळाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न करूनही ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहेत. बँकेने म्हटले आहे की, “संचालक मंडळाने बँकेच्या वाढीसाठी आणि स्थिरतेसाठी त्यांची वचनबद्धता, नेतृत्व आणि योगदान, तसेच भारतीय कॉर्पोरेट जगतातील सर्वात मोठ्या विलीनीकरणांपैकी एक यशस्वीरित्या पूर्ण करण्यात त्यांच्या भूमिकेचे कौतुक केलं आहे.” संचालक मंडळाने जगदीशन यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहे.

सुरुवातीपासूनच बँकेचे व्यवस्थापन गोंधळात

बँकेच्या व्यवस्थापनाबाबत विचार केला तर या वर्षाच्या सुरुवातीपासूनच बँकेचे व्यवस्थापन गोंधळात आहे. बँकेच्या नैतिक आणि प्रशासकीय पद्धतींबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. गैर-कार्यकारी अध्यक्ष अतानु चक्रवर्ती यांच्या अचानक राजीनाम्यानंतर मार्च महिन्यात हा गोंधळ जास्तच वाढला. याचा महत्त्वाच मुद्दा म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये, बँकेतील व्यवस्थापनातील गोंधळ थेट दिसून आला. बँकेच्या प्रशासकीय पद्धतींचा अभाव दर्शवणारी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

एमएसआरडीसी प्रकरणात गैरवर्तनासाठी दोषी आढळल्यानंतर जगदीशन यांना ₹१,००,००० चा दंड ठोठावण्यात आला. बँकेत मोठी रक्कम ठेवल्याबद्दल एका ठेवीदाराला कार्डच्या व्याजदरापेक्षा जास्त रक्कम दिल्याचा आरोप करण्यात आला. यासगळ्यात गोंधळाचा परिणाम संपूर्ण बँक व्यवस्थेवर झालेला दिसून येत आहे.

RBI ची मंजुरी आवश्यक

बँकांचे संचालक मंडळ साधारणपणे CEO ची पुनर्नियुक्तीला मंजुरी देतं आणि भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सुमारे सहा महिने आधीच मंजुरी घेतली जाते. उदाहरणार्थ, जानेवारीमध्ये, प्रतिस्पर्धी आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाने संदीप बख्शी यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोन वर्षांच्या कालावधीसाठी पुनर्नियुक्तीला मंजुरी दिली. बख्शी यांचा सध्याचा कार्यकाळ ऑक्टोबरमध्ये संपत असून, आरबीआयने मे महिन्यात त्यांच्या पुनर्नियुक्तीला मंजुरी दिली. दरम्यान, एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने अंतिम मुदतीच्या तब्बल सात महिने आधीच, मार्च २०२३ मध्ये जगदीशन यांच्या सध्याच्या कार्यकाळाला मंजुरी दिली. त्यामुळे आता पुढे कशा पद्धतीने HDFC चा कार्यभार चालेल आणि कमान कोणाच्या हाती जाते हे पहावं लागेल.

FSSAI Big Decision Delhi : दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंट्सवर छापे पडणार नाहीत! FSSAI ची मोठी घोषणा, पण काय घेतला निर्णय?

Web Title: Hdfc bank new ceo sashidhar jagdishan declines reappointment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • Bank
  • HDFC Bank
  • HDFC Bank Share

संबंधित बातम्या

घर घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! लाखो रुपयांची होणार बचत; ‘या’ 12 सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त Home Loan
1

घर घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! लाखो रुपयांची होणार बचत; ‘या’ 12 सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त Home Loan

SBI मध्ये नोकरीची भारी संधी, मुंबईत 10 जागांसाठी भरती सुरू
2

SBI मध्ये नोकरीची भारी संधी, मुंबईत 10 जागांसाठी भरती सुरू

HDFC Bank चा मोठा निर्णय ग्राहकांसाठी झटका की दिलासा? Repo Rate वाढताच बँकेने बदलले नियम; काय होणार परिणाम?
3

HDFC Bank चा मोठा निर्णय ग्राहकांसाठी झटका की दिलासा? Repo Rate वाढताच बँकेने बदलले नियम; काय होणार परिणाम?

Bank FD Returns : छोट्या बँका की मोठ्या बँका? FD वर जास्त व्याज कोण देतं? जाणून घ्या कोणता पर्याय आहे बेस्ट?
4

Bank FD Returns : छोट्या बँका की मोठ्या बँका? FD वर जास्त व्याज कोण देतं? जाणून घ्या कोणता पर्याय आहे बेस्ट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.