Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Price Rise : युद्धानं मोडलं सर्वसामान्यांचं कंबरडं! सोफ्यापासून गाद्यांपर्यंत सर्व काही महागलं

भारताच्या फर्निचर उद्योगावरही हा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या वाढत्या किमती आणि पुरवठ्यातील कमतरतेमुळे, फर्निचरशी संबंधित जवळपास सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 03, 2026 | 01:22 PM
(फोटो सौजन्य-Gemini)

(फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • संघर्षाचा परिणाम भारताच्या फर्निचर उद्योगावरही
  • कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, फर्निचरच्या दरात वाढ
  • महागाईमुळे ग्राहक दुरावले
Price Rise in Furniture : इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील सध्या सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता हळूहळू सगळ्याच क्षेत्रात दिसून आला आहे. छोट्या मोठ्या प्रमाणात भारतातील प्रत्येक उद्योगांवर त्यांचा परिणाम होत आहे. आता भारताच्या फर्निचर उद्योगावरही हा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या वाढत्या किमती आणि पुरवठ्यातील कमतरतेमुळे, फर्निचरशी संबंधित जवळपास सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. गाद्या, पलंग, सोफे, डायनिंग टेबल्स, पडदे, प्लायवूड, कपाटे आणि अगदी घरांमध्ये ठेवल्या जाणाऱ्या छोट्या देव्हाऱ्यांपर्यंत सर्वच विविध प्रकारच्या वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

आता OTP ची कटकट संपणार! सिम बदलताच बँक खाते होणार ब्लॉक; जाणून घ्या ‘साइलेंट ऑथेंटिकेशन’ आहे तरी काय?

किती वाढल्या किमती?

सगळ्या फर्निचर वस्तूंच्या किमतींमध्ये २०% ते ५०% पर्यंतची भाववाढ नोंदवली गेली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, पूर्वी सुमारे १,८०० रुपयांना मिळणाऱ्या फोमच्या गादीची किंमत आता २,६०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे सुरुवातीला असलेली किमतीमध्ये आता सुमारे ५०% ची वाढ झाली आहे. दरम्यान, पडद्यांच्या किमतीतही सुमारे २०% वाढ झाली आहे. एकेकाळी ४०० रुपयांना मिळणारा पडदा आता ५५० रुपयांना विकला जात आहे. फर्निचर निर्मितीमध्ये वापरला जाणारा एक महत्त्वाचा कच्चा माल असलेल्या प्लायवूडची किंमतही ७०० रुपयांवरून १,२०० रुपयांपर्यंत वाढली आहे. त्याचप्रमाणे, ब्लँकेट्सच्या किमतीही १,६०० रुपयांवरून २,३०० रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.

कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे फर्निचरच्या दरात वाढ

विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, पॉलिइथिलीन, थिनर्स आणि फॉर्मल्डिहाइड यांसारख्या पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या वाढत्या किमतींमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम तयार फर्निचरच्या किमतींवर झाला आहे. एका डबल बेडची किंमत ८,००० रुपयांपर्यंत वाढली आहे, तर डायनिंग टेबल सेट्स ७,००० रुपयांनी आणि सोफा सेट्स ८,००० ते ९,००० रुपयांनी महाग झाले आहेत. इतर घरगुती वस्तूही यातून सुटल्या नाहीत; देव्हाऱ्यांच्या किमतीत सुमारे ४०% आणि कपाटांच्या किमतीत १०% ते १२% वाढ झाली आहे.

महागाईमुळे ग्राहक दुरावले

फर्निचर बाजाराशी संबंधित व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कच्च्या तेलाच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय किमतींमुळे पेट्रोकेमिकल उत्पादनांचा खर्च वाढला असला, तरी पुरवठा साखळीतील व्यत्ययांमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. वाढत्या किमतींमुळे बाजारात येणाऱ्या ग्राहकांची संख्या घटली आहे, ज्याचा व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. फर्निचर मार्केट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारकडे विनंती केली आहे की, या उद्योगाला दिलासा देण्यासाठी कर सवलती आणि इतर स्वरूपाची मदत पुरवण्यात यावी; जेणेकरून हा उद्योग या संकटावर मात करू शकेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा संघर्ष लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. तरीही भारतीय अर्थव्यवस्था आणि विशेषतः लघुउद्योग केवळ या काहीच आठवड्यांच्या कालावधीत मोठ्या नुकसानीला सामोरे जात आहेत, असे तज्ज्ञांचे म्हणणं आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरातील चढऊतार सुरुच… जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

Web Title: Impact of the iran war furniture becomes more expensive mattress prices soar by up to 50 percent marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • America
  • international politics
  • iran
  • Iran Israel Conflict
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

Cyber Warfare: ट्रम्प प्रशासनाचा राष्ट्रीय सुरक्षा आदेश जारी; परदेशी हॅकर्सचे सर्व्हर उडवण्याचे खाजगी कंपन्यांना अधिकार
1

Cyber Warfare: ट्रम्प प्रशासनाचा राष्ट्रीय सुरक्षा आदेश जारी; परदेशी हॅकर्सचे सर्व्हर उडवण्याचे खाजगी कंपन्यांना अधिकार

BRICS2026: अमेरिकेच्या डॉलरला थेट आव्हान! इराणचा ब्रिक्समध्ये मास्टरस्ट्रोक; रुपया, युआन अन् रुबलमध्ये होणार आंतरराष्ट्रीय व्यापार
2

BRICS2026: अमेरिकेच्या डॉलरला थेट आव्हान! इराणचा ब्रिक्समध्ये मास्टरस्ट्रोक; रुपया, युआन अन् रुबलमध्ये होणार आंतरराष्ट्रीय व्यापार

CENTCOM: सैनिक ‘USS Abraham Lincoln’ वरून समुद्रात उड्या मारून का करत आहेत आत्महत्या? पेंटागॉनने उघड केले सत्य
3

CENTCOM: सैनिक ‘USS Abraham Lincoln’ वरून समुद्रात उड्या मारून का करत आहेत आत्महत्या? पेंटागॉनने उघड केले सत्य

Arjun Aravind: ‘ChatGPT वर शोधल्या ‘हत्या करण्याच्या पद्धती’ अमेरिकेत 17 वर्षांच्या भारतीय मुलाने आई आणि भावाला संपवले
4

Arjun Aravind: ‘ChatGPT वर शोधल्या ‘हत्या करण्याच्या पद्धती’ अमेरिकेत 17 वर्षांच्या भारतीय मुलाने आई आणि भावाला संपवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.