Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंडियन बॅंक आणि टाटा मोटर्समध्ये महत्वाचा करार ! व्यावसायिक वाहन खरेदीदारांना होणार लाभ

इंडियन बॅंकेने टाटा मोटर्ससोबत सामंजस्‍य करार केला आहे. या करारानुसार टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आणि डिलर्संना आकर्षक फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स देण्‍यात येणार आहेत.

  • By नारायण परब
Updated On: Oct 17, 2024 | 04:25 PM
इंडियन बॅंक आणि टाटा मोटर्समध्ये महत्वाचा करार ! व्यावसायिक वाहन खरेदीदारांना होणार लाभ
Follow Us
Close
Follow Us:

इंडियन बँक या देशातील आघाडीच्‍या सार्वजनिक क्षेत्र बँकेने भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील सर्वात मोठ्या  व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनी  टाटा मोटर्ससोबत सामंजस्‍य करार केला आहे.  या करारानुसार देशभरातील टाटा मोटर्स व्‍यावसायिक वाहन ग्राहक आणि अधिकृत डिलरशिप्‍सना आकर्षक फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स देण्‍यात येणार आहेत. इंडियन बँक या करिता स्‍पर्धात्‍मक व्‍याजदर आणि सुव्‍यवस्थित क्रेडिट प्रक्रियेसह सानुकूल फायनान्शियल पॅकेजेस् देणार आहे. हा सहयोग टाटा मोटर्सच्‍या संपूर्ण व्‍यावसायिक वाहन पोर्टफोलिओसह एलएनजी (लिक्विफाईड नॅच्‍युरल गॅस) आणि व्‍यावसायिक वाहनांच्‍या इलेक्ट्रिक श्रेणीसाठी सर्वोत्तम फायनान्शियल सोल्‍यूशन्‍स देईल. टाटा मोटर्स आणि इंडियन बँक डिलर फायनान्सिंगसाठी त्‍यांच्‍या सहयोगामध्‍ये अधिक वाढ देखील करेल.

सहयोगाने काम आणि ग्राहकांना ध्येय संपादित करण्यास मदत

या घोषणेबाबत बोलताना इंडियन बँकेचे कार्यकारी संचालक श्री. आशुतोष चौधरी म्‍हणाले, ”आम्‍हाला टाटा मोटर्ससोबत त्‍यांचे डिलरशिप्‍स आणि फ्लीट ऑपरेटर्सना सर्वोत्तम फायनान्शियल सोल्‍यूशन्‍स देण्‍यासाठी सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी करण्‍याचा आनंद होत आहे. आमचे फायनान्शियल पॅकेजेस् ग्राहक व डिलर्सना त्‍यांची व्‍यवसाय उद्दीष्‍टे संपादित करण्‍यास मदत करतील, तसेच एकूण आर्थिक कार्यक्षमता वाढवतील. आम्‍ही टाटा मोटर्ससोबत सहयोगाने काम करत त्‍यांच्‍या ग्राहकांना व्‍यवसाय ध्‍येये संपादित करण्‍यास मदत करण्‍यासाठी उत्‍सुक आहोत.”

बहुमूल्‍य ग्राहकांना अधिक सोयीसुविधा

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्सच्‍या ट्रक्‍स विभागाचे उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल म्‍हणाले, ”आम्‍हाला इंडियन बँकेसोबत सामंजस्‍य करार करताना  आनंद होत आहे. हा सहयोग ग्राहकांना सुलभ फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स देण्‍यामध्‍ये मदत करेल. सहजपणे क्रेडिट उपलब्‍ध करून देत आणि विनासायास फायनान्सिंग पर्याय देत आमचा आमच्‍या डिलर नेटवर्कसाठी फायनान्शियल इकोसिस्‍टम प्रबळ करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे त्‍यांना त्‍यांचे व्‍यवसाय अधिक दृढ करण्‍यास मदत होईल, तसेच बहुमूल्‍य ग्राहकांना अधिक सोयीसुविधा मिळतील.”

टाटा मोटर्सचा व्‍यापक व्‍यावसायिक वाहन पोर्टफोलिओ आहे, ज्‍यामध्‍ये सब-१-टन ते ५५-टन कार्गो वेईकल्‍स आणि १०-सीटर ते ५५-सीटर मास मोबिलिटी सोल्‍यूशन्‍सचा समावेश आहे. या प्रबळपणे डिझाइन केलेल्‍या व्‍यावसायिक वाहनांना सर्वसमावेशक वेईकल जीवनचक्र व्‍यवस्‍थापनासाठी त्‍यांच्‍या संपूर्ण सेवा २.० उपक्रमाच्‍या माध्‍यमातून मूल्‍यवर्धित सेवांच्‍या श्रेणीचे पाठबळ आहे. सानुकूल ताफा व्‍यवस्‍थापनासाठी टाटा मोटर्सचा कनेक्‍टेड वेईकल प्‍लॅटफॉर्म ‘फ्लीट एज’ ऑपरेटर्सना त्‍यांच्‍या वेईकल्‍सचा अपटाइम वाढवण्‍यास सक्षम करतो आणि एकूण मालकीहक्‍क खर्च कमी करतो, तसेच भारतातील सर्वात मोठ्या सर्विस नेटवर्ककडून २४x७ सपोर्ट देतो.

इंडियन बँकची स्थापना ही १५ ऑगस्‍ट १९०७ रोजी  करण्‍यात आली. ही  भारतातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्र बँक आहे, बॅंकेमध्ये भारत सरकारचे ७३.८४ टक्‍के शेअर्स आहेत (३० जून २०२४ रोजी). १९८९ मध्‍ये मद्रासमध्‍ये एटीएम इन्‍स्‍टॉल करणारी पहिली सार्वजनिक क्षेत्र बँक म्‍हणून ओळखली जाणारी इंडियन बँक विविध प्रांतांमध्‍ये ५८४६ शाखांचे (३ डिजिटल बँकिंग युनिट्ससह) कार्यसंचालन पाहते, ज्‍यापैकी १,९८३ शाख ग्रामीण भागात, १,५३१ शाखा अर्ध-शहरी भागात, १,१७३ शाखा शहरी भागात आणि १,१५९ शाखा मेट्रो भागात आहेत. बँकेच्‍या ३ ओव्‍हरसीज शाखा आणि १ आंतरराष्ट्रीय बँकिग युनिट (आयबीयू) देखील आहे.  बँकेच्‍या सप्‍लाय चेन फायनान्‍स उत्‍पादनाने अलिकडील काळात मोठी प्रगती केली आहे आणि ऑटोमोबाइल व इतर क्षेत्रांमधील अनेक आघाडीच्‍या कंपन्‍यांना ऑन-बोर्ड केले आहे.

 

Web Title: Important agreement between indian bank and tata motors commercial vehicle buyers will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2024 | 04:25 PM

Topics:  

  • Indian Bank
  • tata motors

संबंधित बातम्या

‘या’ कंपनीच्या वाहनांना तोडच नाही! विक्रीचे सगळे रेकॉर्ड मोडत बनली भारताची दुसरी सर्वात मोठी कार विक्रेता
1

‘या’ कंपनीच्या वाहनांना तोडच नाही! विक्रीचे सगळे रेकॉर्ड मोडत बनली भारताची दुसरी सर्वात मोठी कार विक्रेता

इथे GST कमी तिथे Tata च्या ‘या’ कारची किंमत 1.55 लाखांपर्यंत कमी, कोणता व्हेरिएंट खरेदी केल्यास किती होईल फायदा?
2

इथे GST कमी तिथे Tata च्या ‘या’ कारची किंमत 1.55 लाखांपर्यंत कमी, कोणता व्हेरिएंट खरेदी केल्यास किती होईल फायदा?

नवीन Tata Altroz चा Bharat NCAP मध्ये डंका! मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग
3

नवीन Tata Altroz चा Bharat NCAP मध्ये डंका! मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग

Tata Motors कडून Ace Gold + मिनी ट्रक लाँच, किंमत फक्त…
4

Tata Motors कडून Ace Gold + मिनी ट्रक लाँच, किंमत फक्त…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.